नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!मित्रांनो, पूर्वीपासून आपल्या घरातील वृद्ध माणसे आप ल्या लहान असणाऱ्या बाळाला करदोडा बांधण्याचा आग्रह करतात आणि आपण ही तो बांधतो. पण तो का बांधतात यामगील कारण तुम्हाला माहित नसेल. तो बांधावा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण महाराष्ट्रात काही भागात बहीण भावाला भाऊबीजेच्या दिवशी करदोडा देते. पण हा करदोडा का बांधला जातो यामागे बरीच कारणे आहेत. गेल्या शतकात हिं’दू ध’र्मा तील मुले व पुरुषांच्या दृष्टीने आवश्यक असलेली महत्वाची गोष्ट म्हणजे ‘करदोडा’ त्या काळात हिं’दू संस्कृतीतील प्रत्येक पुरुषास करदोडा वापरणे अनिवा’र्य होते.

करदोडा म्हणजे कमरेभोवती बांधावयाचा दोरा किंवा गोफ. हा गोफ आर्थिक परिस्थितीनुसार चांदीचा, रेशमाचा किंवा साधा काळा दोरा बांधला जात असे. अनेकदा काळ्या रंगाचा रेशमी गोफ कमरेभोवती बांधला जात असे. यालाच ग्रामीण भाषेत ‘करदोडा’ किंवा ‘कडदोरा’ असे म्हणतात. कडदोऱ्याप्रमाणेच याला ‘कटदोरा’ किंवा ‘करगोटा’ असेही संबोधले जात असे. काही श्रीमंत मुले करदोडा म्हणून चांदीची बारीक साखळी कमरेला बांधतात. पूर्वी हा करदोडा केवळ एक शोभेची वस्तू म्हणून वापरला जात नव्हता तर धार्मिक आणि सांस्कृतिक,अर्थ प्रकट करणारे प्रतीक म्हणून वापरला जात होता.

या शब्दासाठी तीन व्युत्पत्ती सांगितल्या जातात. ‘कटि’ या संस्कृत शब्दाला ‘दोरा’ हा प्राकृत देशी शब्द लागून ‘कटिदोरा’ शब्द तयार झाला व पुढे ‘कडदोरा’ बनला. हा दोरा कमरेवरच बांधला जात असल्याने ही व्युत्पत्ती ठीक वाटते. दुसरी व्युत्पत्ती अशी की संस्कृतातील ‘कटिग’ पासून ‘कडदोरा’ शब्द निर्माण झाला.आणि तिसरी व्युत्पत्ती अशी की ‘कटिसूत्र’ शब्दापासून हा शब्द निर्माण झाला. संतश्रेष्ठ तुकोबांनी या शब्दाचा वापर केला आहे. “पायी घागरिया सरी। कडदोरा वाकी।।” असा उल्लेख एका अभंगात केला आहे. कमरेला करदोडा बांधला नाही तर सं’बंधित व्यक्तीला मुलबाळ होत नाही, असा एक समज वा गैरसमज लोकमानसात आजही आढळतो.

त्यामुळे भीतीमुळे का असेना कमरेला करदोडा बांधला जातो. पहिली गोष्ट म्हणजे कंबर हा शरीराचा सर्वात मोठा आणि पसरट भाग आहे त्या भागात हा करदोडा बांधला जातो. तो कोणत्याही रंगाचा असतो म्हणजे कोणी सतरंगी बांधतो तर कोणी काळा तर कोणी लाल रंगाचा करगोटा बांधतो. काळया रंगाचा करगोटा बांधण्यामगील खरे कारण कोणाचीही वाईट नजर लागू नये असे असते.
पूर्वीच्या काळी या करदोडाचा उपयोग कमरेच्या पट्ट्या सारखा होत होता. म्हणजे जर पँट सैल असेल तर ती पँट करदोडा मध्ये अडकवून घातली जात होती. तुम्हालाही तुमच्या लहानपणी या गोष्टीची जाणीव असेल. अस म्हणतात की, ज्यावेळी एखादे वि’षारी जीवाने दंश केल्यास ते विष पूर्ण शरीरभर पसरू नये म्हणून दंश केलेल्या ठिकाणा पासून एक इंच ठिकाणी धागा किंवा पट्टी बांधले जायचे, पूर्वीची लोक कधी जंगलात काम करायची किंवा शेतात त्यांना अशा विषारी जनावरांचा जास्त धोका होता.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *