नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये मनुष्याचे आयुष्य सोपे आणि सुखी करण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांच्या नीती जगप्रसिद्ध आहेत. अनेक राजकारणी, व्यावसायिक त्यांच्या नीतींचे अनुकरण करतात. चाणक्य हे एक प्रसिद्ध अर्थतज्ज्ञसुद्धा होते. चाणक्य यांच्या मते माणसाची खरी संपत्ती म्हणजे पैसा किंवा सोने नाही. मग चाणक्य नीतीनुसार माणसाची खरी संपत्ती कोणती? आज आपण त्याविषयीच जाणून घेऊया.

माणसाची खरी संपत्ती कोणती?
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतीमध्ये धन-संपत्तीचा उल्लेख केला आहे. संपत्ती किंवा धन जमा करण्याच्या नादात माणूस अनेकदा पैसा आणि सोन्याच्या मागे पळतो; पण चाणक्य सांगतात की पैसा किंवा सोने खरी संपत्ती नाही.
माणसाची खरी संपत्ती ही ज्ञान आणि इच्छाशक्ती आहे. जो व्यक्ती अज्ञान आहे, तो श्रीमंत बनू शकत नाही. याशिवाय चाणक्य पुढे सांगतात, ज्या व्यक्तीकडे ज्ञान आणि प्रबळ इच्छाशक्ती आहे, ते कोणत्याही कठीण संकटातून मार्ग काढू शकतात.

ज्यांच्याकडे ज्ञान आणि इच्छाशक्तीसारखी संपत्ती आहे, असे लोक प्रत्येक कठीण प्रसंगाचा सामना करू शकतात. बुद्धिमान व्यक्ती ही त्यांच्या ज्ञानामुळे सगळीकडे नावलौकिक कमावते.
ज्ञानाने परिपूर्ण असणाऱ्या बुद्धिमान व्यक्ती नेहमी चांगले कर्म करतात आणि इतरांनाही चांगले काम करण्यासाठी प्रेरित करतात. चाणक्य नीतीनुसार असे लोक कधीही वाईट संगतीमध्ये दिसून येत नाही.
जो व्यक्ती खरोखर ज्ञानी आहे, त्याला कधीही कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसतो. अज्ञानी लोकांमध्ये नेहमी मोह, लोभ आणि राग दिसून येतो.
चाणक्य सांगतात की, व्यक्तीने सतत ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ज्ञान मिळवण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसते. माणसाने नियमित नवनवीन गोष्टी शिकायला पाहिजे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *