नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शरीर सृष्टीचं वर्णन जाणून घेणार आहोत आपण सर्व नेहमी श्री स्वामी समर्थ केंद्रा जातो स्वामींच्या मठात जातो. आपण महाराजांना मुजरा करतो. महाराजांची आरती करतो आणि आपापल्या मार्गाला लागतो. पण कधी आपण महाराजांच्या फोटो कडे लक्ष देऊन पाहतो का की या फोटो मध्ये नक्की किती शक्ती लपलेली आहे? तर आज आपण श्री स्वामी महाराजांच्या फोटोतील शक्ती पाहूया.

श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज हे श्री दत्तात्रेयांचे तिसरे अवतार म्हणून ओळखले जातात.अक्कलकोट चे श्री स्वामी समर्थ महाराज हे आज ही लक्षावधी अर्थ जिज्ञासू आणि मुमुक्षू यांचे आश्रयस्थान आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार ही भगवंता ची सर्वात मोठी लिला आहे. स्वामी समर्थांना समाधिस्थ होऊन आज 125 हून अधिक वर्षे उलटून गेली. परंतु त्यांचा महिमा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या सगुण ब्रह्माची उपासना अगदी श्रद्धेने प्रेमाने आणि भक्ति ने महाराष्ट्रातील घराघरातून नित्यप्रमाणे सुरू आहे. आणि त्याच्या अस्तित्वाच्या आणि कृपेचे अनंत चमत्कार हजारो भक्त नित्य अनुभव करत आहेत.

भगवंत असा हा अवतार महाराष्ट्र झाला ही केवढी तरी भाग्याची गोष्ट आहे. परंतु या अवताराला सर्व प्रांत आणि देश सारखेच असतात. संपूर्ण विश्वाच्या आणि मानववंशाच्या कल्याणासाठी मानवाच्या उद्धारासाठी भगवान भूतलावर अवतार धारण करत असतो. म्हणूनच आपल्या स्वामी महाराज हे ब्रह्मांडनायक आहेत. स्वामी चिदंबर आणि दिगंबर आहेत.

स्वामी दीप्ती श्रीपती, पृथ्वी पती, यक्ष जप्ती व देवाधिपती म्हणजे सर्व देवतांचे देव आणि सर्व सरकारांचे सरकार आहेत. स्वामी पुढें कोणाचीही सत्ता नाही.स्वामीची सेवा केली तर तेतीस कोटी देवांची सेवा केल्याचे पुण्य प्राप्त होते. म्हणूनच जर का आपण स्वामी महाराजांचे मस्तक पाहिले तर त्यांच्या मध्य भागाला ब्रह्मरंध्र म्हणतात. ब्रह्मरंध्र म्हणजे महाराजांनी भगवान शिवांना धारण केलेले एक स्थान आहे. आपण जर महाराजांच्या छाती चे वर्णन केले.तर ते स्त्री स्वरूपात आहे कारण तें आधीं माया आदिशक्ती आईसाहेब स्थापित आहेत. जर महाराजांचे पोट बघितले तर ते भगवान गणपती चे स्थान आहे.

जर आपण पाहिले तर महाराजांचा डावा खांदा, वरती आणि उजवा खांदा खाली आहे. महाराजांच्या शरीराच्या उजव्या भागात भगवान रुद्र व डाव्या भागा माता शक्ती चे प्रतीक आहे. महाराजांच्या डोक्यावर पाहिले तर आपल्याला तीन वलय दिसतात. ते तीन वलय म्हणजे सत्त्व रज तम या गुणांचे प्रतीक आहे.

जर महाराजांचा चेहरा पाहिला तर त्यात आपल्याला भगवान मारुती यांचे रूप दिसते. म्हणूनच आपल्या स्वामी महाराज हें त्रिगुणांचें अंश आहेत आणि कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. सर्व देवता आणि रिद्धी सिद्धी स्वामीची पूजा करतात. महाराजांच्या उजव्या पायाचा अंगठा बाहेर आहे. कारण त्याची पूजा करणे म्हणजे तेतीस कोटी देवांची पूजा करणे असे आहे.
मग विचार करा की आपण कोणत्या शक्ती चे भक्त आहोत? म्हणूनच महाराजांना आनंद होईल असेच वागा. कारण आपले स्वामी ब्रह्मांडनायक आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *