नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!मित्रांनो आजच्या या युगात इतके आजार निघाले आहेत की केव्हा कोणता आजार होईल हे सांगता येत नाही. पूर्वी असे काही आजार होते की ते फक्त वृध्द लोकांनाच होत असत परंतु आज असे नाही ये आज तरुण वर्ग देखील या आजारांना बळी पडत आहे. आजच्या काळात तरुणपणीच रक्तदाब, शुगर, मधुमेह, थायरॉईड, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांना लोक बळी पडत आहेत.

मित्रांनो, आहाराकडे योग्य लक्ष देऊन तुम्ही या घातक आजारांपासून दूर राहू शकता. योग्य आहार घेतला तर वेळीच आपण या आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकतो.आज आम्ही तुम्हाला रक्तातील साखरेबद्दल सांगणार आहोत, कोणत्या वयात साखरेची पातळी किती असावी याची माहिती घेऊयात.

मित्रांनो वयानुसार साखरेची पातळी किती असावी- वयवर्ष 18 किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या रक्तातील साखरेची पातळी जेवणानंतर कीव जेवणाच्या 1 ते 2 तासांनंतर 140 मिलीग्राम असते. जर तुम्ही उपवास केला असेल तर ते 99 mg प्रति डेसीलिटर असावे. तसेच वयाची चाळिशी ओलांडल्यानंतर, लोकांनी नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे.

ज्या लोकांचं वयवर्ष 40 ते 50 मध्ये आहेत आणि जे मधुमेहाचे रुग्ण आहेत, त्यांची जेवणानंतर 140 mg/dl आणि रात्रीच्या जेवणानंतर 150 पेक्षा कमी असणे चांगले मानले जाते. तसेच जर उपवास असेल तर त्या दरम्यान 90 ते 130 mg असणं हा अधिक चिंतेचा विषय बनतो. या प्रकरणात, ताबडतोब डॉक्टरांना भेटले पाहिजे.

रक्तातील साखर कशी नियंत्रित करावी?
मित्रांनो जर तुम्ही साखरेचे रुग्ण असाल आणि तुम्हाला जर मधुमेह असेल तर तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींपासून ते झोपेपर्यंत खाण्याची पद्धत बदलली पाहिजे. तुम्ही तुमच्या शारीरिक हालचाली वाढवाव्यात. व्यायाम हा आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनवला पाहिजे. रोज सकाळी आणि संध्याकाळी फिरायला गेले पाहिजे. .

जर तुमच्या र’क्तातील साखर नियंत्रणात नसेल तर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत आणि आहारात बदल करणे आवश्यक आहे. आपण निरोगी अन्नासह शारीरिक हालचाली वाढवाव्यात. यासोबतच जास्त साखर, मीठ, कोल्ड्रिंक्स, मिठाई खाणे टाळावे. जास्त कर्बोदके असलेले पदार्थ खाऊ नका. याशिवाय रोजच्या आहारात सॅलडचा समावेश करा.

जेवल्यानंतर रक्ताच्या पातळीत फरक- शरीरातील साखरेची पातळी आपल्या आहार आणि दिनचर्यानुसार ठरते. वयाच्या बाबतीतही फरक आहे. जर तुम्ही जेवले आणि तुमच्या र’क्तातील साखरेची पातळी वेगळी असेल आणि उपवासात ती वेगळी राहते. तसेच वाढत्या वयात साखरेची पातळी वाढणे हे सामान्य आहे, परंतु त्यावरही नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *