नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!स्वामी समर्थांनी समाजातील दुष्ट प्रवृत्ती नाहीशी करून तेथे सतविचारांची पुनर्स्थापना केली. दुःखी, पिडीत लोकांवर कृपेचा वर्षाव केला. इच्छुक भक्तांना स्मरणात राहील असा अनुभव देऊन प्रेमबंधनाने आपलेसे केले. स्वामी समर्थांना श्रीमंत व गरीब सारखेच मानीत. त्यांना साधा भोळा भक्तीभाव आवडत असे. त्यांच्या अंतरी जनसामान्यांविषयी अपार प्रेम होते. स्वामी समर्थ अतिशयतेजःपुंज होते. कोटी सूर्याचे तेज त्यांच्या मुखावर विलसत असे. डोळ्यात अपरंपार कारुण्य होते. भक्तांवर संकट कोसळले तर ते दूर करीत.

एकदा स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटचे महाराज मालोजीराजे हत्तीवर बसून आले होते. जेव्हा त्यांनी स्वामी समर्थांच्या चरणावर मस्तक ठेवले, तेव्हा त्यांनी मालोजीराजे यांच्या श्रीमुखात दिली व म्हणाले, ”तुझे मोठेपण तुझ्या घरात. ते येथे कशाला पाहिजे ?आम्ही असे राजे पुष्कळ बनवतो.” तेव्हापासून मालोजी राजे स्वामी समर्थांच्या दर्शनाला पायीच येत असत.

अक्कलकोट संस्थानातील मानकरी सरदार तात्या भोसले यांचे मन संस्थानातून, संसारातून विटले, तेव्हा ते स्वामी समर्थांच्या चरणी राहून त्यांची भक्तिभावे सेवा करू लागले. एकदा ते स्वामी समर्थांजवळ बसले असता ते तात्या भोसले यांना म्हणाले, ”तुझ्या नावाची चिट्ठी आली आहे.” तेव्हा तात्या भोसले यांनी स्वामी समर्थांना प्रार्थना केली की, ”मला अजून आपली सेवा करावयाची आहे !” तात्या भोसले यांनी त्या यमदूताला पाहिले, ते घाबरले. आपल्या भक्ताची तळमळ पाहून स्वामी समर्थांनी यमदूताला सांगितले की, ”हा माझा भक्त आहे. याला स्पर्श करू नकोस. त्या पलीकडच्या बैलाला घेऊन जा !” त्या बैलाचे प्राण गेले व तो जमिनीवर कोसळला.

श्री स्वामीसमर्थ हे भक्तकाम कल्पद्रुम आहेत, चिंतामणी आहेत. त्यांच्या हृदयात करुणेचा सागर हेलावतो आहे. त्यांना हाक मारा, ते सदैव तुमच्या जवळच आहेत. स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या कल्याणा बाबत सदोदित जागरूक राहून त्यांची भयानक संकटातून मुक्तता करतात.

अक्कलकोटला मोरोबा कुलकर्णी नावाचा एक स्वामीभक्त होता. त्याच्या अंगणात श्री स्वामी समर्थ आपल्या सेवेक-यांसह झोपले होते. मोरोबाच्या पत्नीस रात्री पोटदुखीचा त्रास होऊ लागला. हा त्रास तिला असह्य झाला. ती तशीच विहिरीत जीव द्यायला निघाली. स्वामी समर्थ एकदम जागे झाले व सेवेक-यास म्हणाले, ”अरे, विहिरीवर कोण जीव देतेय पहा बर .त्या व्यक्तीस माझ्याकडे घेऊन ये !” सेवेकरी विहिरीजवळ गेला तो मोरोबाची पत्नी विहिरीत उडी मारण्याच्या तयारीत दिसली. त्याने तिला स्वामी समर्थांपुढे आणले. त्यांनी तिच्याकडे कृपा दृष्टीने पाहिले. तिची पोटदुखी नाहिशी झाली.

स्वामी समर्थांनी आपल्या रूपाने आणि मग भक्ताला त्याच्या इच्छित देवतेचे त्याच रुपात दर्शन घडविल्याचे अनेक कथांतून आढळते. द्वारकापुरीत त्या वेळी सूरदास नावाचे महान कृष्णभक्त राहात होते. हे सूरदास जन्मांध होते. आपणास सगुण साकार असे श्रीकृष्ण दर्शन व्हावे अशी त्यांची फार इच्छा होती. स्वामी समर्थ सूरदासांच्या आश्रमात येऊन उभे राहिले. त्यांनी सूरदासाला हाक मारली. म्हणाले, ”तू ज्याच्या नावाने हाका मारीत आहेस तो मी, बघ इथ तुझ्या दारात येऊन उभा आहे. सूरदास, पहा जरा. ”इतक बोलून समर्थांनी त्यांच्या दोन्ही डोळ्यांना हस्तस्पर्श केला. त्याबरोबर सूरदासाला दिव्यदृष्टी प्राप्त झाली. आणि त्यांना शंख, चक्र, गदाधारी असे श्रीकृष्णाचे सगुणरूप दिसू लागले. सूरदास सद्गदित झाले. थोड्या वेळाने भानावर आल्यावर त्यांना स्वामी समर्थांनी आपले वास्तव रूपाचे दर्शन घडविले. सूरदास भारावून गेले आणि स्वामी समर्थांना म्हणाले, ”मला दिव्यदृष्टी दिलीत. आता मला जन्ममरणाच्या या तापा पासूनमुक्त करा !” स्वामी समर्थांनी सूरदासाला ”तू ब्रह्मज्ञानी होशील!’ ‘असा आशीर्वाद दिला.

स्वामी समर्थांचे अगणित भक्त जागो जागी आहेत. १८७८ साली स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे आपल्या पार्थिव देहाचा त्याग केला असला तरी ”हम गया नही, जिंदा है l” हे त्यांचे वचन भक्तांना आधार आहे. ज्या ज्या वेळी त्यांचे स्मरण केले जाते, त्या त्या वेळी श्री स्वामी समर्थ आपणापाशीच असतात, हे निश्चित.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *