नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! बहुतेक स्त्रिया त्या काही दिवसांना घाबरतात आणि मनोमन मासिकपाळीचे चार दिवस आले नाहीतर किती बरं होईल. असं म्हणत असतात पण मासिकपाळी नियमित येणे हे स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक गोष्ट असते. ते दिवस आले नाहीतर किती बरं होईल म्हणतात आणि मासिकपाळी वेळत आली नाहीतरी घाबरतात.

खरंतर रजोनिवृत्तीच्या वया आधी अनियमित मासिकपाळी हे काळजी करण्यासारखीच बाब असते. नियमित मासिकपाळी येणे म्हणजे एकदा मासिकपाळी आल्यानंतर 28 दिवसांनी पुन्हा मासिकपाळी येणे होय. काही स्त्रियांना 29,30,32 दिवसांनी मासिकपाळी येते ही काळजी करण्यासारखी बाब नाही.

परंतु ज्या स्त्रियांना 45,50 दिवसांनी किंवा दोन किंवा तीन महिन्याने जर मासिकपाळी येत असेल तर डॉक्ट्रांनाच सल्ला घेणे आवश्यक असते.तसेच मासिकपाळी नियमित येण्यासाठी काही घरगुती उपाय देखील आहेत त्यामुळे मासिकपाळी येण्यास मदत होत आणि नियमित होते. हे घरगुती उपाय कोणते ते आपण पाहणार आहोत

हळद : हळदीमुळे आपल्या शरीरातील हार्मोन्स संतुलित करून आपल्या मासिक पाळीत नियमित होण्यास मदत होते .तसेच मासिकपाळीच्या वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक गुणधर्म देखील हळदीमध्ये असतात आहेत. आपल्या डॉक्टराच्या सल्ल्याने हळदीचा वापर रोज केला जाऊ शकतो. हळद तुम्ही दुधातून, मध बरोबर किंवा गुळाबरोबर घेऊ शकता

कोरफड : मासिक पाळी अनियमिततेवर उपचार करण्यासाठी कोरफड पान त्याचा गर हा उपयुक्त ठरतो. थोडा कोरफडीच्या गरामध्ये एक चमचा मध घालून हे मिश्रण दररोज सकाळी नाश्त्याच्या आधी घ्या असे एक महिना केल्यावर याचा परिणाम दिसू लागेल. पण जर हे घेताना काही त्रास वाटला तर मात्र हे घेणे बंद करा. तसेच मासिकपाळी चालू असताना मात्र हे मिश्रण घेऊ नका

कच्ची पपई : मासिकपाळीची तारीख निघून गेली असले आणि गरोदर नसल्याची खात्री करूनच कच्च्या पपईचे योग्य प्रमाणात सेवन करा. तुम्ही पपईचे बारीक तुकडे करून गोड दह्या बरोबर खाऊ शकता.हा प्रयोग एकदा किंवा दोनदाच करावा सतत करू नये. कारण कच्ची पपई ही अति उष्ण असते त्यामुळे मूळव्याध किंवा गर्भपात होण्याची शक्यता असते. त्यामुळे या उपायाचा वापर काळजीपूर्वक करणे आवश्यक असते

आलं : आले हे फक्त अनियमित मासिकपाळी नियमित करण्यासाठी उपयुक्त नसून मासिकपाळीदरम्यान येणारे पेटके कमी करण्यास मदत करते, अर्धा चमचा किसलेले आले घ्या आणि पाण्यात काही काळ उकळा आणि त्यात थोडी साखर घाला आणि असे मिश्रण हे दिवसातून एकदा तरी घ्या.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *