नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!!घरातील स्त्री ही नेहमीच तिची कर्तव्य पूर्ण करत असते, घरातील सर्व कामे करत असते. तिच्या पतीच्या दीर्घायु साठी सुदधा धार्मिक कार्य करते. पतीला यश, कीर्ती मिळावी म्हणून ती नेहमी तत्पर असते. पतीला प्रत्येक कार्यात साथ देण्यास ती समर्थ असते. विवाहानंतर सासरच तिचं घर मानते.

सासरी गेल्यावर तेथील सर्वांना आपलं मानते व यासाठी ती प्रत्येक जो खी म, संकट पेलत असते. याचबरोबर अशीही काही कामे आहेत, जी विवाहित स्त्रियांनी केल्यास त्यांच्या पतीला धन प्राप्तीचे जास्तीत जास्त स्रोत मिळतात. स्त्री ही पुरुषाची ताकद असते, ती लग्न करून घरात येताना सोबत भाग्य घेऊन येते व काही पुरुषांच्या बाबतीत हे खरं सुद्धा होते.

तसेच घरातील ज्या गोष्टी स्त्रिया करतात त्याचा परिणाम तिच्या कुटुंबातील सदस्यांवर होत असतो. तसेच घरातील आनंद, दुःख, संकटे सर्व परिस्थिती मध्ये धीराने सामोरी जाणारी स्त्री खरंच भाग्यवान पुरुषालाच मिळते. ज्या स्त्रिया घरात नेहमी स्वच्छता ठेवतात, घर सुंदर, नीटनेटके ठेवतात अशा स्त्रियांच्या घरी लक्ष्मी पाणी भरते, कारण जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी वसते.

अशा स्त्रियांवर माता लक्ष्मीचा वरदहस्त राहतो, त्यामुळे या स्त्रियांच्या पतीबद्दलच्या इच्छा निश्चितच पूर्ण होतात. या स्त्रियांच्या पतीला नेहमी यश, संपत्ती मिळते. ज्या स्त्रिया या घरातील लोकांशी नेहमी चांगल्या वागतात, प्रेमाने वागतात अशा स्त्रियांच्या घरी वाद, भांडण होत नाहीत व नेहमी सुख, शांती, समाधान राहते.

अशा स्त्रिया त्यांच्या सासरचे भाग्य उजळून टाकतात. ज्या स्त्रिया धार्मिक असतात, देवावरती विश्वास ठेवून पूर्ण श्रद्धेने ज्या पूजापाठ करतात अशा स्त्रियांना त्यांच्या पतीच्या कामात नेहमी यश आलेले दिसते, अडचणींवर मात करण्याचं ब ळ यांच्याकडे असते. ज्या स्त्रिया रोज पतीचे पाय दाबून देतात जसे की माता लक्ष्मी भगवान विष्णूचे पाय दाबत असते,

अशा स्रीयांच्या पतीला भरपूर धनलाभ होतो. यानंतर ज्या स्त्रिया अतिशय चांगल्या स्वभावाच्या असतात, नेहमी हसमुख, मधुर वाणी असणाऱ्या स्त्रियांच्या पतीची हीच खरी ताकद असते. त्यामुळे त्यांचे पती नेहमी त्यांच्यावर खुश असतात व प्रगती करत राहतात. ज्या स्त्रिया जास्त अपेक्षा ठेवत नाहीत, समाधान असतात

अशा स्त्रियांच्या पतीचे आयुष्य समाधानी असते व त्यांचा संसार अतिशय सुखकारक होतो. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने हे गुण अवलंबले पाहिजेत जेणेकरून तुम्ही नक्कीच तुमच्या पतीची घरची, तुमची प्रगती, यश, कीर्ती, सन्मान मिळवू शकता.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *