नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!आपलं वैवाहिक जीवन सुखी असावं असं प्रत्येक पती पत्नीला वाटते. आपल्या घरी समृद्धी, समाधान, ऐश्वर्य नांदेल यासाठी तुम्ही हे 5 उपाय नक्की करा. पत्नीने आपल्या पतीच्या यशासाठी, घराच्या सुखासाठी या गोष्टी करायला काही हरकत नाही. या गोष्टी केल्यास तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील व जर काही त्रास होत असेल नक्कीच तो दूर होईल.

घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी, दोष दूर करण्यासाठी हा उपाय केला जातो. घरात सारखे वाद, चिडचिड होत असेल तर तुम्ही हे पाच उपाय नक्की करू शकता. आपल्या घराच्या सुखासाठी कोणत्याही स्त्रीने केलेले प्रभावी उपाय हे सफल होतात, देवाचा आशीर्वाद घरच्या लक्ष्मी वरती नेहमी असतो आणि म्हणूनच घरच्या स्त्रियांनी त्यांच्या कुटुंबासाठी हे उपाय नक्की करा.

घरातील विवाहित स्त्रीने प्रत्येक शनिवारी एक खोबऱ्याची वाटी व त्यामध्ये थोडी साखर घालून ती वाटी पिंपळाच्या झाडाखाली ठेऊन पिंपळाच्या झाडाला नमस्कार करून या, यामुळे तुमच्या आयुष्यातील दोष नक्की दूर होतील व काही अडचणी असतील तर त्या सुटतील.

तसेच स्त्रियांनी महागौरी पार्वतीची पूजा जरूर करा. त्यांना सेंदूर लावायला विसरू नका. तसेच शंकर पार्वती मातेची पूजा, नाम जप, भजन केल्याने देखील वै वाहिक जीवन सुखी होते तसेच तुमच्या घरातील वाद, विवाद दूर होतात.

शनीचे दोष दूर करण्यासाठी तुम्ही शनिवारी बेसनाचे भजी जे तिखट न करता त्यामध्ये साखर किंवा गुळ घाला व त्यामुळे दोष कमी होतील व ते गोड भजी गरिबाला दान करा, भुकेल्या माणसांना खायला द्या. रोज सकाळी माता तुळशीची पूजा करा, तिची पूजा सकाळी लवकर उठून अंगण झाडून, स्नान करून सूर्य देवतेला नमस्कार करून करा.

तुळशीचे रोप नसेल तर नक्की आणा आणि कुंडीत लावा व तिचे पूजन करून तुमच्या घरासाठी प्रार्थना करा. तसेच सायंकाळी तुळशीत दिवा लावून नमस्कार रोज करत जा, अस नित्य केल्याने माता लक्ष्मी व त्यांना प्रिय असणारे भगवान विष्णू सुद्धा प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात त्यामुळे कोणत्याही कामात विघ्न येत नाहीत व घरात वाईट, नकारात्मक ऊर्जा येत नाही.

किन्नर म्हणजेच हिजडयाना ते जिथे दिसतील तिथे काही न काही दान नक्की द्या. त्यामुळे तुम्हाला त्यांचा पवित्र आशीर्वाद नक्की मिळेल त्यामुळे तुमची इच्छा पूर्ण होईल. असे केल्याने घरातील सदस्य सुखी राहतात, तुमच्या कामातील अडथळे दूर होतात व तुम्ही यश मिळवू शकता.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *