नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!आपण आज अशा काही स्वप्नां बद्दल बोलणार आहोत जी स्वप्न आपण श्रीमंत बनण्यापूर्वी किंवा धनवान बनण्यापूर्वी आपल्याला नक्की पडतात. ही स्वप्न बघितल्यानंतर आपण पुन्हा झोपी जावू नका. किंवा या स्वप्नांबद्दल इतर कोणालाही बोलू नका. स्वप्न का पडतात? जेव्हा आपण झोपतो ऐच्छिक स्नायू काम करणे बंद करतात. हे अनैच्छिक इंद्रिय असतात जसं की हृदय, पचनेंद्रिय, मज्जासंस्था यांचे कार्य चालूच असतात.

आपल मन हे जागृत अवस्थेपेक्षा निद्रीत अवस्थेत जलद गतीने फिरत असतं. आपले विचार चक्र जोरात चालू असतात. आता पर्यंत जे काही वाचलं आहे, अनुभवलेले आहे. मान, अपमान, राग, लोभ आपल्या वाट्याला आलेलं आहे या बद्दल मन याचा विचार करतं. आणि त्याचे हे संस्कार असतील दिवसा निद्रिस्त असतात मन त्यांना दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतं. हे सर्व उफाळून येतात झोपल्यानंतर आणि या संस्काराची मोडतोड करून रूप बदलवून एक चित्रपट मन तयार करतं.

यालाच आपण स्वप्न असे म्हणतो. या स्वप्नांचा विचार फल शास्त्रात केलेला आहे. तुम्हाला स्वप्न नक्की कधी पडलं आहे केव्हा पडलं आहे यावर सुद्धा त्या स्वप्नांचं फळ अवलंबून असतं. जसकी रात्रीच्या पहिल्या प्रहरात पडलेले स्वप्न एका वर्षात त्याच फळ देत. दुसऱ्या प्रहरात पडलेलं स्वप्न हे सहा महिन्यात फळ देत. तिसऱ्या प्रहरातील स्वप्नांचं फळ तीन महिन्यात चौथ्या प्रहरात पडलेल्या स्वप्नांचं फळ एका महिन्यात आणि सकाळीच पडलेल्या स्वप्नांचं फळ हे तात्काळ मिळत. आता पर्यंतचा या शास्त्राचा अभ्यास आहे. जाणून घेऊया धनवान बनण्यापूर्वी आपल्याला कोणती स्वप्ने पडतात.

पहिलं स्वप्न स्वप्नात अशोकाच, चाफ्याच, चंदनाच, गुलबक्षी, सुपारी, नारळ किंवा अक्रोडाचे झाड दिसल्यास तुम्ही लवकरच धनवान व्हाल. हे स्वप्न पाहिल्यानंतर पुन्हा झोपी जावू नका. आणि या स्वप्न बद्दल कोणालाही सांगू नका. तुमची योग्य वेळ अगदी जवळ आलेली आहे. या संधीचा अचूक फायदा घ्यायला विसरू नका. कष्ट आणि परिश्रम मध्ये मागे पडू नका.

आपण स्वप्नात लवंग, जायफळ, वेलची, कापूर हे पदार्थ पाहत आहोत किंवा खात आहोत असं स्वप्न हे स्वप्न सुद्धा धनलाभ सूचक आहे. गुलाब, बकुळ, केवडा, जुई, बेला यांची फुल स्वप्नात पाहणं हे सुद्धा श्रीमंत होण्याचं सूचक आहे. आपले केस गळत आहेत आणि डोक्याला टक्कल पडलेले दिसणे म्हणजे १००% धनलाभ होण्याचे संकेत आहेत. मात्र कुठेही वाच्यता करू नका.

विड्याची पानं म्हणजे नागवेलीची पानं ज्याला म्हणतो ती दिसणे किंवा स्वतः ला ऊस खाताना पाहणं तर श्रीमंत व्हायला जास्त वेळ लागत नाही. जर तुम्ही स्वतः ला हत्तीवर चढताना पाहिलं आणि तुम्हाला जर त्याची भीती वाटली नाही आणि लगोलग तुम्हाला जाग आली तर लक्षात घ्या माता लक्ष्मी चे आगमन हे तुमच्या घरात होणार आहे. सात पिढ्यांना पुरेल इतका पैसा नक्की येणार आहे. स्वतः ला नदी मध्ये स्नान करताना पाहणं हे सुद्धा अत्यंत चांगलं स्वप्न आहे.

तुम्ही जर स्वतः स्वप्नात फुले किंवा फळे खात आहात हे सुद्धा लक्ष्मी प्राप्तीचे खूप मोठे लक्षण आहे. जर तुम्ही स्वतः एखाद्याची निंदा करत आहात किंवा त्याची हत्या करत आहात. किंवा साखळीने बांधत असल्याचं जर पाहिलं तर याने सुद्धा लवकरच धनलाभ होणार आहे. या स्वप्नांबद्दल वाच्यता कृपया करू नका. स्वप्न मध्ये तलाव दिसणे पुष्कळ धन प्राप्ती. स्वप्नात ध्वज पताका म्हणजे झेंडा फडकताना पाहणे पहिली गोष्ट म्हणजे धनलाभ होऊ शकतो. किंवा संतती प्राप्त होऊ शकते.

स्वतः वर जल अभिषेक होताना पाहणे म्हणजे स्वतः च्या डोक्यावर पाणी पडताना पाहणे याचा अर्थ भूमिगत धनाची प्राप्ती होणार आहे. स्वतः ला पूर्व दिशेला चालताना पाहणे. धनलाभ चा संकेत आहे. स्वप्नात स्वतः ला युद्ध करताना पाहणे. धनलाभ चा सूचक आहे. स्वप्नात पर्वत किंवा मंदिरावर किंवा महलावर चढताना पाहणे कोणत्या ना कोणत्या मार्गाने अचानक मोठं धन, पैसा तुम्हाला प्राप्त होणार आहे.

आकाशात पक्षी उडत आहेत. हे स्वप्न सुद्धा धनलाभ चे सूचक आहे. पांढऱ्या रंगाचा बैल पाहणे अत्यंत शुभ आहे. अशा बैलाची पूजा करताना जर तुम्हाला स्वप्न पाहिले तर गुप्त धन हाती लागतं. बैला बरोबर तुम्ही खेळत आहात असे जर स्वप्न पडलं तर त्याचा लाभ हा खूप कमी दिवसात पाच दिवसात धन लाभ होतो. बैलावर स्वतः ला बसून जाताना पाहिल्यास मोठी धन प्राप्ती होते.

स्वप्नात मासे पाहिल्यास शुभ असते. मासे विकणारा जो कोळी आहे त्या कोळ्या जवळील मासळी पाहिल्यास धनलाभ होतो. आणि मासळी घेवून जाणारा माणूस पाहिल्यास कोणत्याही कार्यात यश मिळते. स्वतः च्या शरीरातून रक्तस्त्राव होत आहे. असे स्वप्न पाहिल्यास धन धान्यात वाढ होते. परंतु दुसऱ्या कोणाच्या शरीरात रक्तस्त्राव होताना पाहिल्यास कार्य सिध्दीस जातं. मात्र त्यासाठी रक्तपात करावा लागेल. शत्रुत्व ओढवून घ्यावं.

स्वप्नात अगदी धुंवाधार पाऊस पडत असताना जर चित्र दिसलं तर तुमच्या घरात भांडणे होऊ शकतात. जवळची माणसे दुरावतील पण व्यापारात मोठं यश मिळू शकते. धन प्राप्ती होऊ शकते. स्वप्नात समुद्र दिसला किंवा समुद्राच्या लाटा दिसल्या तर हा लक्ष्मी प्राप्ती चा मोठा योग आहे. असे समजून जा.

स्वप्नात खरतर साप दिसणे ही मृत्यूची सूचना आहे. परंतु साप तुम्हाला चावत आहे दंश करत आहे असं दिसल्यास लवकरच धन लाभ होणार आहे याचे संकेत आहेत. स्वप्नांचा अर्थ जाणून घेण्यास किंवा याच फळ नक्की कधी मिळणार आहे. तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा प्रहर आहे तो लक्षात घ्या..

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *