नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!!!मित्रांनो तारक मंत्र या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे जो आजाराने त्रासलेला आहे जो चिंतेने ग्रासलेला आहे. यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतातच. स्वामींनी आपल्याला ही अनमोल भेट दिली आहे तारक मंत्र देऊन तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी तुम्ही आणि आपण कोणीच विचार सुद्धा करू शकत नाही.

शेवटी ती स्वामींची शक्ती आगम्य शक्ती. हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरात एक मानसिक बळ येते की नाही. आणि हो जरा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर खूपच बळ शक्ती अंगात संचारते. हा माझा आणि आपलाच स्वामी भक्तांच्या अनुभव आहे. या मंत्रात एक कडवे आहे. की अदरक अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी.

फक्त आणि फक्त या वचनावर स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा या जगातील कितीही मोठी गोष्ट असूद्या ती तुम्ही सहजच मिळवाल. आणि नंतर तुमच्या आजूबाजूचे मित्र म्हणा किंवा नातेवाईक म्हणतील. असे तू काय करतो रे की तुझी प्रगती एकदम झपाटाने होते ती. तेव्हा मनातल्या मनात स्वतःलाच बोला की माझ्यामागे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत. या जगाचा जो एकच मालक आहे.

या जगात झाडाची पाने सुद्धा जो हलवतो. सर्वांचे रक्षण करतो. असे स्वामी महाराज माझ्या मागे आहेत. आणि राहतीलच. तर मी एक परत विनंती करतो की सर्वजणांनी हा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करावी. हा म्हणत असताना एका वाटीत पाणी घ्यावे ते पाणी समोर ठेवावे. आणि तारक मंत्र बोलून झाल्यावर ते पाणी प्रसाद स्वरूप घरातल्या सगळ्यांनी थोडे थोडे प्यावे.

याने एक शक्ती सगळ्यांच्या अंगात संचारेल. सकारात्मक शक्ती येईल सकारात्मक ऊर्जा येईल. आणि आजार रोग सगळे आपल्या घरापासून दूर राहील. स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतातच पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही.
कुठल्या आणि कुठल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमी असतात. फक्त आपणही लक्षात आणले पाहिजे की स्वामी सदैव माझ्या बरोबर आहेत.

ते म्हणतात ना भगवंताला माझ्या आपल्या स्वामींना बघायला तशी दृष्टी असावी लागते. तर मित्रांनो तुम्ही ही तारक मंत्र बोलायला सुरुवात करा. आणि हे दिवस जे दिवस वाईट सुरू आहेत त्यात तर तारक मंत्र खूप चमत्कारी शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. मित्रांनो तारक मंत्र तुम्हाला युट्युबवर भेटेल. तुम्ही तो तिथून वाचून म्हणू शकतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *