नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!आपल्या प्रत्येकाच्या घरात कुलदेवतेचा एकतरी कळस असलाच पाहिजे आपल्या प्रत्येकाच्या घराण्याची कुळाची कुलदेवी किंवा कुलदेव असतात त्यांचे फोटो तस्वीर किंवा मूर्ती आपल्या देवघरात असायलाच पाहिजे फोटो मूर्ती नसेल तर कुलदेवतेचा टाक किंवा कळस आपल्या घरात असायलाच पाहिजे

तरच आपले कुलदैवत आपल्यावर प्रसन्न होतात आज आपण जाणून घेणार आहोत कुलदेवतेचा कळस कसा भरावा कधी भरावा आणि कोणी भरावा कळस कसा भरावा कळस हा साध्या सोप्या पद्धतीने जसा आपण इतर पूजेसाठी कळस भरत असतो तसाच हा कळस भरायचा असतो उदाहरणार्थ एक तांब्याचा तांब्या घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पाणी भरायचे त्या पाण्यामध्ये हळदीकुंकू अक्षद टाकायचे

एक रुपयाचे नाणे टाकायचे एक पुजेची सुपारी टाकायची फुले टाकायची आणि त्यावर पाच विड्याची पाने किंवा पाच आंब्याची पाने लावायची आणि त्यावर संपूर्ण नारळ पुजेचा नारळ ठेवायचा त्यानंतर तो कळस आपल्या देवघरात एक मुठ तांदूळ किंवा एक मूठ गहू ठेवून त्यावरच स्थापन करायचा अशा रीतीने तुम्ही हा कळस भरू शकता आता हा कळस केव्हा भरायचा

जर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचा वार माहित असेल मंगळवार शुक्रवार गुरुवार जो हि तुमच्या कुलदेवतेचा वार असेल या वारी तुम्ही हा कळस भरू शकतात जर कुलदेवतेचा वार माहीत नसेल तर मंगळवारी कळस भरावा मंगळवारच्या दिवशी जर कळस तुम्ही भरला असेल तर दर मंगळवारी त्या कळसाचे पाणी आणि तिथे लावलेले आंब्याची किंवा विड्याची पान बदलायची आहेत

दर मंगळवारी म्हणजे दर आठवड्याला कळसाचे पाणी बदलायचे आहे जुने पाणी तुम्ही तुळशीला किंवा घराच्या बाहेर कोणत्याही कोपऱ्यात टाकू शकतात आणि विड्याची आणि आंब्याची पान नवीन आणून तुम्हाला बदलायची आहेत आणि जुनी पानं पाण्यात विसर्जित करावीत अशा रीतीने तो कळस भरायचा आहे आता प्रश्न येतो की कोणी भरावा तर हा कळस महिला पुरुष कोणीही भरू शकतात

पण घरातल्या सौभाग्यवती महिलेने म्हणजेच घरातल्या मुख्य महिलेने हा कळस भरला तर त्याचा जास्त शुभ परिणाम होतो तसं तर घरातील कोणतेही व्यक्ति कळस भरू शकतात पण घरातल्या मुख्य महिलेने कळस भरला तर त्याचा लाभ संपूर्ण घराला होतो आणि कुलदेवता सुद्धा प्रसन्न होतात तर असा एक कळस तुम्हीसुद्धा तुमच्या देवघरामध्ये नक्की स्थापन करा तुमचेही कुलदैवत तुमच्यावर प्रसन्न होतील..

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *