नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!ज्योतिषशास्त्रामध्ये 12 राशींचा उल्लेख करण्यात आला आहे. पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीचं, जन्मस्थळ आणि जन्मवेळेनुसार एक रास असते.

प्रत्येक नक्षत्र राशीच्या एका चिन्हाशी संबंधित आहे आणि प्रत्येक राशीचं चिन्ह काही नक्षत्रांशी संबंधित आहे. ग्रह आणि देवताही प्रत्येक राशीशी संबंधित असतात. तुमच्या राशीची देवता तुमच्या राशीची स्वामी असते. कोणत्या राशीच्या व्यक्तींनी कोणत्या देवतेची पूजा करावी, याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे.

मेष:
मंगळ हा मेष राशीचा स्वामी ग्रह आहे. मेष राशीच्या व्यक्तींनी श्रीराम आणि हनुमान यांची पूजा केली पाहिजे. भगवती तारा, नील-सरस्वती आणि माता शैलपुत्री या मेष राशीच्या देवी आहेत.

वृषभ:
शुक्र ही वृषभ राशीची ग्रहदेवता आहे. या व्यक्तींनी श्रीहरि विष्णूची पूजा केली पाहिजे. लक्ष्मी देवी आणि षोडशी-श्री विद्या या वृषभ राशीच्या देवी आहेत.

मिथुन:
बुध हा मिथुन राशीचा स्वामीग्रह आहे आणि गणेश व विष्णू या मिथुनेच्या मुख्य देवता आहेत. मिथुन राशीच्या व्यक्तींनी दुर्गा, भुवनेश्वरी आणि माता चंद्रघंटा देवींची पूजा केला पाहिजे.

कर्क:
चंद्र हा कर्क राशीचा स्वामीग्रह आहे. या राशीच्या व्यक्तींनी शिव आणि विष्णू यांची पूजा केली पाहिजे. माता कमला आणि माता सिद्धीदात्री या कर्क राशीच्या देवी आहेत.

सिंह:
सूर्य हा कर्क राशीचा स्वामी आहे तर श्रीहरि विष्णू आणि हनुमान या मुख्य देवता आहेत. या राशीच्या व्यक्तींनी माता गायत्री, पितांबरा आणि माता कालरात्री यांची पूजा केली पाहिजे.

कन्या:
कन्या राशीचा स्वामीग्रह बुध असून मुख्य देवता गणेश आहे. या राशीच्या व्यक्तींनी दुर्गा, भुवनेश्वरी आणि माता चंद्रघंटा या देवींची पूजा केली पाहिजे.

तूळ:
शुक्र हा तूळ राशीचा स्वामीग्रह आहे. या राशीच्या व्यक्तींनी श्रीहरि विष्णू, माता लक्ष्मी, ब्रह्मचारिणी आणि षोडशी-श्री विद्या यांची पूजा केली पाहिजे.

वृश्चिक:
मंगळ हा वृश्चिक राशीचा स्वामीग्रह आहे. श्रीराम आणि हनुमान या वृश्चिक राशीच्या मुख्य देवता आहेत. भगवती तारा आणि माता शैलपुत्री या राशीच्या देवी असून त्यांची पूजा करणं अपेक्षित आहे

धनू:
गुरू हा धनू राशीचा स्वामीग्रह आहे. या राशीच्या व्यक्तींनी मुख्य देवता श्रीहरि विष्णू, माता लक्ष्मी, कमला आणि माता सिद्धीदात्री यांची पूजा केली पाहिजे.

मकर:
शनी हा मकर राशीचा स्वामीग्रह असून, मुख्य देवता हनुमान आणि शंकर आहेत. मकर राशीच्या व्यक्तींनी हनुमान आणि शंकराबरोबरच माता काली आणि माता सिद्धीदात्री यांचीही पूजा केली पाहिजे.

कुंभ:
शनी हा कुंभ राशीचा स्वामीग्रह आहे. या राशीच्या व्यक्तींनी हनुमान आणि शंकराची पूजा केली पाहिजे. माता काली आणि माता सिद्धीदात्री या कुंभ राशीच्या देवी आहेत.

मीन:
मीन राशीचा स्वामीग्रह गुरू असून आणि मुख्य देवता श्रीहरि विष्णू आहे. मीन राशीच्या व्यक्तींनी माता लक्ष्मी, कमला आणि माता सिद्धीदात्री या देवींची पूजा केली पाहिजे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *