नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे खूप महत्त्वाचे आहे. या वर्षीचे पहिले चंद्रग्रहण ५ मे रोजी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाले होते. हे ग्रहण जगाच्या अनेक भागात दिसले पण भारतात हे ग्रहण दिसले नाही. पण, वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण केव्हा होईल आणि सुतक कालावधीची वेळ काय असेल ते जाणून घेऊया.

चंद्रग्रहणाची तारीख आणि वेळ

वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आश्‍विन पौर्णिमेला म्हणजेच २८ आणि २९ ऑक्‍टोबरच्‍या मध्यरात्री संपूर्ण भारतभर खंडग्रासच्‍या रुपात दिसणार आहे. चंद्रग्रहण मध्यरात्री १ वाजून ५ मिनिटांनी सुरू होईल आणि अर्धरात्रौ २ वाजून २४ मिनिटापर्यंत चालेल. हे चंद्रग्रहण भारतातील सर्व शहरांमध्ये दिसणार आहे. वर्षातील दुसरे चंद्रग्रहण हे खंडग्रास चंद्रग्रहण असेल. याला आंशिक चंद्रग्रहण असेही म्हणतात. हे खंडग्रास चंद्रग्रहण मेष आणि अश्विनी नक्षत्रात लागेल.
दिवाळीच्या दहा दिवसाआधी संपेल मंगळ-केतूची अशुभ युती; ‘या’ ५ राशींवर लक्ष्मी होईल प्रसन्न, कमाई वाढेल

चंद्रग्रहणाचा सूतक काळ

चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी ९ तास आधी सुरू होतो. तसेच, सुतक काळात कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा केली जात नाही. २८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री होणाऱ्या चंद्रग्रहणाचा सुतक काळ २८ ऑक्टोबरला संध्याकाळी ४ वाजून ५ मिनिटांनी सुरू होणार आहे.
भारतासह या देशात चंद्रग्रहण दिसणार

भारतासह इतर देशातही चंद्रग्रहण दिसणार आहे. हे चंद्रग्रहण ऑस्ट्रेलिया, संपूर्ण एशिया, यूरोप, अफ्रीका, दक्षिण-पूर्व अमेरिका, उत्तर अमेरिकाच्या उत्तर पूर्व क्षेत्रात, हिंद महासागर, दक्षिणी प्रशांत महासागर या सर्व ठिकाणी दिसणार आहे.
ग्रहण काळात काय करावे आणि काय करू नये

सुतक काळात आणि ग्रहण काळात तुम्ही चंद्राशी संबंधित मंत्रांचा जप करू शकता. २८ ऑक्टोबरच्या ग्रहण काळात सूर्यास्तानंतर आपल्या क्षमतेनुसार आणि ब्राह्मणाच्या सल्ल्यानुसार दान धर्म करावे आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर स्नान करून ब्राह्मणास दान द्यावे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *