नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो, आजकाल खूप जणांना केस पांढरे होण्याची समस्येने हैरान केले आहे. आपण आज पांढरे केस कायमचे काळे करण्याचा एक आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत या उपायाने तुमचे पांढरे केस काळे होतील. एकही पांढरा केस शिल्लक राहणार नाही. केस गळणे, टक्कल पडणे, केस रुक्ष होणे, केसात कोंडा होणे इत्यादी केसांच्या सर्व समस्यांवर हा उपाय रामबाण ठरतो. चला तर पाहूया काय आहे हा उपाय.

मित्रांनो केस पांढरे होण्याची समस्या खूप लोकांना भेडसावत आहे. कारण अगदी शाळकरी मुलांपासून कॉलेजच्या मुला मुली पर्यंत केस पांढरे होण्याचे सुरू होते. अशा वेळी शाळेतील मुलं आणि कॉलेजचे मुलं मुली गांगरून जातात. त्यांना काय करायचं कळत नाही. अशा वेळी बऱ्याच वेळा केमिकलयुक्त डायचा वापर केला जातो.

पण मित्रांनो या डायमुळे तात्पुरते केस काळे होतात. पुन्हा आठ ते दहा दिवसांनी पुन्हा सगळे केस पांढरे दिसतात .याशिवाय याचा दुष्परिणामही दिसतो. केस गळायला सुरू होतात, पांढरे केस होण्याचे प्रमाण वाढते. टक्कल पडते. इत्यादी सर्व समस्या पासून दूर करणारा एक आयुर्वेदिक उपाय आपण पाहणार आहोत. यामुळे तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही. शिवाय तुमचे पांढरे केस काळे होतील आणि हा उपाय लहान मुलांपासून कोणत्याही वयोगटातील पर्यंतचे मुलं-मुली, महिला, पुरुष करू शकतात.

केसांना मेंदीचा चांगला रंग कसा आणायचा? मेहंदी लावल्यानंतर केस केव्हा धुवावे? मेंदी लावली तर काही जणांचे केस ड्राय होतात. कोरडे होतात. केसात खाजवते. केसांना तेल केव्हा लावावे? शाम्पू केव्हा लावायचा असतो. याबद्दल पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, या सर्व समस्यांसाठी आपण हेअर पॅक बनवणार आहोत. या हेयर पॅक चा रिझल्ट खूप चांगला असेल. केसांसाठी मेहंदी खूप फायदेशीर ठरते. केसांना कंडिशनिंग करू शकता जर तुमचे केस ड्राय असतील तरी तुम्ही हा हेअर पॅक लावू शकता. जर तुम्ही कलरिंगसाठी हेअर पॅक लावणार असाल, पांढरे केस कलर करायचे असतील तरी तुम्ही हा पॅक लावू शकता.

मित्रांनो, या हेअर पॅक साठी आपल्याला मेहंदी, चहापावडर, लिंबू, खोबरेल तेल या गोष्टी लागणार आहेत. मेहंदीत मिक्स करण्यासाठी आपल्याला चहा पावडरचे पाणी लागणार आहे. यासाठी एका भांड्यात दीड ग्लास पाणी घ्यायच आहे. जितकी मेहंदी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचे प्रमाण घ्या. दीड ग्लास पाण्यात दोन-तीन चहा पावडर टाका. हे पाणी पाच ते आठ मिनिटे चांगले उकळून घ्यायच आहे. त्यामुळे चहाचा रंग पाण्यात उतरेल. पाण्याचा रंग डार्क झाला पाहिजे. त्यानंतर गॅस बंद करून व हे पाणी थोडे थंड करत ठेवा. हा पॅक बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला लोखंडी कढई किंवा लोखंडी तवा किंवा कोणतेही लोखंडी भांडे घ्यायच आहे. खास करून ज्यांना केसांना कलर आणि कंडिशनिंग सुद्धा करायचा आहे. त्यांनी मेहंदी भिजवण्यासाठी लोखंडी भांडच घ्यायची आहे. जर तुम्हाला केसांना फक्त कंडिशन करायचे आहे तर त्यांनी कोणतेही भांडे वापरले तरी चालते.

मित्रांनो आता आपल्याला चहाच्या पाण्यात शंभर ग्रॅम मेहंदी पावडर टाका. जर हर्बल मेहंदी पावडर असेल तर अजूनच चांगली गोष्ट आहे त्यामुळे केसांना चांगले पोषण मिळते. जितकी चांगले मेहंदी असेल तेवढा केसांना चांगला कलर येईल व कंडिशनिंग सुद्धा चांगले होईल.

मित्रांनो मेहंदीत चहाच पाणी थोडे थोडे टाकून मेहंदी चांगली मिक्स करून घ्या. साध्या पाण्याऐवजी आपण चाय पत्तीचे पाणी घेतले आहे जे केसांना कलर करण्यासाठी मेहंदी लावतात. त्यांच्यासाठी चाय पत्तीचे पाणी जास्त कलर देईल. चहा पावडर खूप चांगल्या प्रकारे केसांना कंडिशनिंग देण्याचे काम करते. चाय पत्ती केसांना चमक आणण्याचे म्हणजे शाईन देण्याचे काम करते.

त्यानंतर मेहंदीत आपण एक चमचा खोबरेल तेल टाकायचेत आहे. मेहंदी मध्ये चाय पत्तीचे पाणी लिंबूचा रस व खोबरेल ते टाकले आहे. हे चांगले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. मेहंदी रात्रभर झाकून ठेवायची आहे आणि सकाळी लावायची आहे. मेहंदी नीट झाकून ठेवा यामध्ये हवा जाता कामा नये. यामुळे मेंदीच्या काठाला चांगला काळा कलर येईल.

जर तुम्ही कंडिशनिंग साठी पॅक लावणार असाल तर रात्रभर मेहंदी भिजत ठेवण्याची गरज नाही. फक्त एक तास तुम्ही मेहंदी भिजून लावू शकता. पण जर तुम्हाला कंडिशनिंग पण पाहिजे व केसांना रंग सुद्धा द्यायचा असेल तर तुम्ही रात्रभर मेहंदी भिजत ठेवावी लागेल.

मेहंदी लावण्यापूर्वी तुम्हाला यामध्ये पूर्ण एक अंड मिक्स करायचा आहे. पांढरा व पिवळा भाग दोन्ही मेहंदीमधे टाका. जर तुम्हाला अंड वापरायच नसेल तर यामध्ये तुम्ही तीन ते चार चमचे दही टाकू शकता. अंड घातल असेल तर चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचे आहे. अंडे किंवा दही तुमच्या केसांना मेहंदी लावण्यापूर्वी अंडे किंवा दही मिक्स करायच आहे. त्यानंतर तुम्ही हा पॅक जास्त वेळ ठेवायचा नाही. लगेच आपल्या केसांना पॅक लावून घ्यायचा आहे.

केसांना हा पॅक लावल्यानंतर जर तुम्ही कंडिशनिंग करणार असाल तर अर्धा तास किंवा एक तास ठेवा. यामुळे तुमचे केस मऊ चमकदार होतील आणि जर तुम्हाला केस कलर करणार असाल तर कमीत कमी तीन तास ते पाच तास ठेवू शकता.

मेहंदी किती वेळ केसांना लावून ठेवायची हे लक्षात घ्या. तुमची मेहंदी केसावर सुकली नाही पाहिजे. तुम्ही कितीही तास मेहंदी केसावर ठेवू शकता पण जर मेहंदी केसावर सुकली तर केस कोरडे होतात. मेहंदी पूर्ण सुकण्यापूर्वी केस धुऊन टाका. मेंदी लावण्या अगोदर केस शाम्पूने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत. जर केसांना तेल लावले असेल तर मेहंदी केसांना व्यवस्थित लागणार नाही. त्यामुळे केसांना व्यवस्थित रंग पण येणार नाही. मेहंदी मध्ये तेल मिक्स असणे आणि आणि केसांना तेल लावून त्याच्यानंतर मेहंदी लावणे या दोन गोष्टी वेगळ्या आहेत.

आपण केसांना मेहंदी कितीही दिवस लावू शकतो जर तुमचे केस पांढरे असतील व तुम्हाला केसांना कलर करायचा आहे तर आठवड्यातून एकदा केसांना मेहंदी लावू शकता. जर वेळ नसेल तर पंधरा दिवसातून एकदा मेहंदी केसांना लावली तरी चालेल. यामुळे केसांना आलेला कलर व्यवस्थित राहतो. कंडिशनिंग साठी सुद्धा आठवड्यातून एकदा केसांना मेहंदी लावा.

केसांची मेहंदी धुण्यासाठी पाणी जास्त थंड किंवा गरम नको साध्या पाण्याने केस धुवायचे आहे. केस धुण्यासाठी शाम्पू किंवा साबणाचा वापर करायचा नाही. फक्त साध्या पाण्याने केस धुवायचे आहे. जर तुम्ही शाम्पू किंवा साबण लावला तर केसाचा कलर लवकर निघून जाईल. केसांना सहजपणे सुकू द्या जास्त कडक उन्हात किंवा ड्रायरने केस सुकवू नका. केसांना व्यवस्थित पुसून घ्या. ज्या दिवशी तुम्ही केसांना मेहंदी लावाल त्या दिवशी रात्री केसांच्या मुळाशी तेल चांगल्या प्रकारे लावा.

तेल लावल्यामुळे केस खाजवत नाहीत. केसांच्या टोकापर्यंत चांगले तेल लावा म्हणजे केस ड्राय होणार नाहीत. रात्री तेल लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही शाम्पू करू शकता. केस स्वच्छ धुवा त्यामुळे खूप चमकतील व रंगही चांगला येईल. सौम्य प्रकारचा शाम्पू असावा किंवा हर्बल असावा. जर तुम्ही स्ट्रॉंग शाम्पू वापरला तर त्यामध्ये केमिकल्स केसांवरती परिणाम करू शकतात. काही जणांना वाटते की, मेहंदी केसांना लावली तर केस कोरडे होतात. पण जर तुम्ही योग्य प्रकारे मेहंदी केसांना लावली तर केस कोरडे होत नाहीत.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *