नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!केरळात पुन्हा एकदा निपा व्हायरसची दहशत पसरली आहे. केरळच्या ) कोझिकोड जिल्ह्यात निपा विषाणू संसर्गाने दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. निपा व्हायरसचा ( Nipah Virus ) वेरिएंट सर्वात खतरनाक आहे. आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की हा व्हायरस मानवाद्वारे मानवात पसरत असतो. याच्या पसरण्याचा वेग जरी कमी असला तरी हा सर्वात खतरनाक आजार आहे. गेल्या ऑगस्टमध्येही एकाचा केरळात या आजाराने मृत्यू झाला होता. हा आजार वघवाघळे आणि डुकरातून माणसात पसरला असल्याचे म्हटले जात आहे.

साल 2018 नंतर ही चौथी वेळ आहे जेव्हा केरळात निपा व्हायरस पसरला आहे. केरळात 2018 मध्ये प्रथम हा आजार पसरला होता. तेव्हा 23 संक्रमित 23 लोकांपैकी 21 जणांचा मृत्यू झाला होता. साल 2019 आणि 2021 मध्ये पुन्हा निपा व्हायरसच्या केस आढळल्या होत्या. हा व्हायरस वटवाघळे किंवा डुकरातून पसरतो. त्यामुळे तीव्र ताप, अंग दुखी, उलट्या अशी लक्षणे आढळतात.

खजूराच्या झाडाद्वारे प्रसार
बांग्लादेशात साल 2016 मध्ये निपा व्हायरसने अनेकांचे बळी घेतले होते. मेडीकल तज्ज्ञांच्या मते हा व्हायरस खजूरच्या झाडाला लागलेल्या फळांमधून पसरला आहे. खजूराच्या झाडावर वटवाघळांची वस्ती होती. ज्या लोकांनी या झाडाची फळे खाल्ली त्यांना या आजाराची लागण झाली असावी असे म्हटले जात आहे. बांग्लादेशातील हा निवा व्हेरीएंट केरळातील जनतेला घाबरवित आहे. केरळातील परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी तज्ज्ञांची टीम दिल्लीहून रवाना झाली आहे. ही टीम केरळातील परिस्थितीचा अंदाज घेत आहे.

लस किंवा औषधे नसल्याने धोका
निपाचा व्हायरस बद्दल किंवा त्याला रोखण्यासाठी लसींवर कोणतेही संशोधन झालेले नाही. तसेच त्यावर कोणतेही औषध आलेले नाही. हा व्हायरस थेट मेंदू आणि मज्जासंस्थेवरच हल्ला करीत आहे. या आजाराने संक्रमित रुग्ण कोमात जाऊ शकतात. निपा विषाणूचा शोध सर्वप्रथम साल 1999 मध्ये मलेशिया आणि सिंगापूरमध्ये लागला होता.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *