नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!!श्री स्वामी समर्थ महाराजांच्या लेखमालेमध्ये तुमचे स्वागत आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीची शक्ती संपूर्ण जगाला कळावी हीच इच्छा जर तुम्हाला जर लेख आवडला असेल आणि स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास असेल तर लेखाला जरूर शेअर करा. यापुढील लेख हा स्वामींच्या सेवेकर्‍याच्या शब्दात, श्री स्वामी समर्थ !!

नमस्कार मित्रांनो मी अनुप, मिरजेचा रहिवासी. मी 2014 मध्ये बीकॉमला प्रवेश घेतला होता. त्याच वर्षी माझ्या बाबांना कर्करोगाचे निदान झाले. हे दुखणे सुरवातीच्या स्टेजला असल्याने आणि महाराजांचा आशीर्वाद सोबत असल्याने बाबांनी दुखण्यावर मात केली पण माझे दुर्दैव संपलेले नवते.

वर्षदेखील झाले नसेल तरच बाबांना हृदयविकारचा झटका आला. डॉक्टरांनी केलेल्या तपासणी मध्ये असे आढळून आले की बाबांच्या शिरा संपूर्णपने ब्लॉक आहे. ज्यावेळी त्यांना दवाखान्यात नेले तेव्हा डॉक्टरांनी त्यांना रक्त पातळ होण्याचे 42 हजार रुपये किमतीचे औषध दिले होते पण तरीदेखील त्यांची परिस्थिती सुधारलेली नवती. त्यांना दहा पावले देखील चालणे शक्य नवते.

आम्ही बाबांना केईएल बेळगाव येथे उपचारासाठी हलवले. मी त्याआधी कधी दवाखाना केलेला नवता आणि माझ्या बहिणी तर माझ्यापेक्षा लहान. लोकांनी इतका खर्च लागेल तितका खर्च लागेल असे सांगून आम्हाला घाबरवून टाकले होते. खिशात वीस हजार रुपये होते आणि मी बेळगाव गाठले, रेल्वेमधून बेळगावला जात असताना मी स्वामींना हात जोडले आणि म्हटले की, महाराज बाबांना ऑपरेशनची गरज भासू देऊ नका.

बेळगावला दिक्षित डॉक्टरांशी माझे भेट झाली, त्यांनी ऑपरेशन करायचे ठरवले आणि सोबत भलमोठा खर्चाचा आकडा सांगितला. मी माझ्याकडचे सगळे पैसे भरले, मला खूप भीती वाटत होती, मी भाऊजींना तिथे थांबवून मिरजेला परत आलो. दुसर्‍या दिवशी दवाखान्यात सगळी तयारी झाली आणि वडिलांना आत घेणार पण डॉक्टरांनी त्यांच्या तपासणीची सीडी पहिली आणि नकार दिला.

डॉक्टरांनी संगितले की त्यांच्या अनुभवानुसार या ऑपरेशनचा काहीही उपयोग नाही, हा माणूस वाचणार नाही असे त्यांनी संगितले. भाऊजींचा मला फोन आला आणि त्यांनी हा प्रकार मला सांगितलं, मला माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले होते.

मित्रांनो कदाचित तुम्हाला पटणार नाही पण जेव्हा मी स्वामींच्या पुढे गेलो तेव्हा सकाळी मी त्यांना वाहिलेले फूल पडले. मी स्वामिनवर खूप जास्त रागत होतो पण मित्रांनो बाबांनी कसलीही गोळी घेतली नाही की काहीही केले नाही पण आज बाबा 2 किलोमीटर चालत जातात आणि परत त्यांना कसलाही त्रास झालेला नाहीये मी आणि बाबा रोज स्वामींची पुजा करतो.

माझ्या घरात आई बाबा दोन्हीही सेवेकरी आहेत. मी वर्षानुवर्षे त्यांनी केलेली सेवा पाहतो आहे. मी कधीही स्वामी भक्ति केली नाही पण संकटाच्या काळात मी स्वामींकडे धाव घेतली आणि स्वामी माझ्या हाकेला धावून आले. मला एक गोष्ट नक्की सागावीशी वाटते ‘आपले कर्म आणि नियत ही निर्मळ असेल ना तर स्वामी आपल्यासाठी नक्की धावून येतात’ श्री स्वामी समर्थ !!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *