नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!सध्या अनेकांची जीवनशैली खूप व्यस्त झाली आहे. ऑफिस, घर या सगळ्यात माणूस गुंतून गेला आहे. अनेकांना स्वतःकडे लक्ष द्यायला जमत नाही. कामाच्या तणावामुळे अनेक लोकं एंजायटीला बळी पडत आहे. या सगळ्या कारणामुळे लोकांचे शरीरही सुस्त झाले आहे. वेळेवर काम आटोपण्यासाठी एनर्जेटिक राहणं गरजेचं आहे. अनेकदा समोर काम भरपूर असते, पण कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही. जर आपली सुस्तपणामुळे वर्क प्रॉडक्टिव्हिटी कमी झाली असेल तर, आहारात या ४ पदार्थांचा समावेश करा. अनेकदा काम करताना थकवा, झोप, किंवा सुस्तपणा येतो. अशा स्थितीत आपण जंक फूड किंवा प्रोसेस्ड फूड खातो. या पदार्थांमुळे वजन तर वाढतेच, यासह आरोग्यासाठी देखील हानिकारक ठरते. त्यामुळे हे पदार्थ खाणे टाळून ४ प्रकारच्या हेल्दी पदार्थ खाऊ शकता

1 ) बदाम :
ऑफिसमध्ये काम करत असताना जेव्हा आपली प्रॉडक्टिव्हिटी कमी होते, सुस्तपणा जाणवतो, तेव्हा उलट सुलट खाण्यापेक्षा बदाम खा. बदामामध्ये प्रथिने, अँटी-ऑक्सिडंट्स असतात. शिवाय कॅलरीचं प्रमाण कमी असतं. ज्यामुळे आपल्या काम करण्याची उर्जा मिळते. त्यातील प्रोटीन्समुळे थकवा कमी होतो.

2) केळं
शरीरातील प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी रोज एक केळं खावं. यामुळे शरीर अ‍ॅक्टिव्ह राहते. शरीरात आवश्यक प्रमाणात ग्लुकोज राहते आणि केळी फोकस आणि एनर्जी वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. यामध्ये असलेल्या कार्बोहाइड्रेटमुळे पोट बराच काळ भरलेले राहते.

3)मखाना
मखाना खाण्याचे अनेक फायदे आहेत. मखानामध्ये कमी कॅलरी असल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे कामाच्या वेळी जर छोटी भूक लागत असेल तर, कुरकुरीत मखाना खा.

4) सोया नट्स
कुरकुरीत आणि स्वादिष्ट सोयानट्स सोयाबीनपासून तयार केले जाते. सोयानट्स फायबर आणि प्रोटीनचे उत्तम स्त्रोत आहे. सोय नट्स खाल्ल्याने हृदय आणि हाडांच्या आरोग्य उत्तम राहते. स्नॅक्सऐवजी आपण सोयानट्स खाऊ शकता.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *