नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!! मित्रांनो, अक्कलकोट म्हणजे स्वामींची कार्यशाळा. स्वामींकडे जो तो कधीही रिकाम्या हाताने गेला नाही. ज्याला जे हवे होते त्यांना स्वामीनी ते भरपूर दिले. कारण भरपूर हा स्वामींचा गुण आहे. अक्कलकोट गावाच्या बाहेर एक रामाचे मंदिर आहे. तेथे एक हरि बाई म्हणून एक विद्वान स्त्री श्रीरामांची उपासना करत असे. ती अनेक ग्रंथाचे पठण, मनन, श्रवण करत असे.

या ठिकाणी बाबा सबनीस वेदांताचे पठण करत असत. या वेदांत पटना ला स्वामी महाराज ही कधी कधी येत असत. एक दिवस काशिनाथ व बाबा फडणीस जन्मले यांची मंडळी जमली होती. स्वामींचे स्वामित्व समजून घेण्यासाठीही पुण्य लागते आणि कदाचित हेता लोकांकडे नव्हते. म्हणून त्यांनी मुद्दामून स्वामींची निंदा करण्यास सुरुवात केली. आणि म्हणू लागले,” हे स्वामी वेडे आहेत! लोक उगाचच ह्यांच्या नादी लागले आहेत.. चतुर्था श्रम रघेऊन हे भ्रष्ट झाले आहेत आणि ह्यांच्या नादाने हे बाबा सुद्धा पोथ्या उलट्या पुलट्या करत बसले आहे.”

त्यांचे हे बोलणे चालू असताना अचानक एक घटना घडते त्यांच्यातील एका माणसाला सर्प चावतो. सर्व घाबरून जातात. काय करायचे हे कोणालाही सुचत नाही. तेव्हा ते सगळे जण त्यांना स्वामींकडे घेऊन जाऊया असा आग्रह करतात आणि सर्वांच्या आग्रहामुळे काशिनाथ हे त्या गृहस्थाला उचलून स्वामींकडे नेतात. स्वामींच्या समोर जाऊन त्याला ठेवतात.

तेव्हा स्वामी म्हणतात, “अरे! आम्ही वेडे भ्रष्ट झालो तर तुमच्या बापाचे काय गेले.. बसून भोजन मिळते म्हणून चेष्टा आठवल्या काय? तुमच्या सर्वांचे सर्व घोटाळे आम्हाला ठाऊक आहेत. तुमचे टिळा मळा सोहळे अंतर ब्रह्मा वीटालेले आहेत.” स्वामींचे बोलणे एकूण काशिनाथ आणि बाबा यांना खूप दुःख झाले. त्यांनी पश्चाताप पूर्व अंतकरणाने स्वामींची माफी मागितली.

आणि म्हणू लागले, “स्वामीराया आम्ही अनंत अपराधी आहोत. त्यामुळे आमच्या कडून खूप मोठी चूक झाली आहे. याचे प्रायश्चित आम्हाला मिळाले आहे” हे बोलणे ऐकून स्वामींना खूप दया आली. त्यांनी सर्प चावलेल्या गृहस्थाकडे एक नजरेने बघितले आणि बघताच तो उठून बसला. हा चमत्कार बघून सगळे जण चकित झाले. सर्वांनी स्वामींचा जय जयकार केला.

यालिलेमध्ये स्वामींचे वागणे बघून लोकांना वेडे वाटत होते. परंतु खरोखर ते परब्रम्ह आहेत. याची प्रचिती सर्वांना आली. स्वामींची भक्ती केल्यास ते आपल्याला जे पाहिजे ते नक्कीच देत असतात. म्हणून त्यांची नित्यनियमाने भक्ती करावी. त्यांची सेवा करावी. स्वामी आपल्या भक्तांना कधीही संकटामध्ये एकटे सोडत नाहीत. ते आपल्या भक्ताच्या पाठीमागे निश्चितच राहतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *