नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! ईशा आणि अनिषच लग्न होऊन पाच वर्ष झाले.. सुरवातीची काही वर्ष संसार एकदम सुंदर कोणालाही हेवा वाटेल असा होता.. पण नंतर मात्र अनिषच वागणं बोलणं बदललं.. तो कित्येकदा ईशा सोबत वर आवाज करून बोलायचा.. ऑफिस मधील टेन्शन.. कामाचा दबाव.. रोजची होणारी धावपळ.. मुलांची आणि माझी सुद्धा जबाबदारी यामध्ये तो खूप थकत असेल आणि म्हणूनच त्याची चिडचिड वाढली असेल.. अस स्वतःला समजावून ईशा नेहमीच त्याला समजून घेत होती..

पण अनिष मात्र ईशाला काही आदर देत नव्हता.. त्यांच्यातील नात हे फक्त लोकांना दिसण्यासाठी होत.. त्या नात्यात काही संवाद नव्हता… काळजी, प्रेम, विश्वास, आदर हे सगळं ईशा कडून एकतर्फी होत. तिने खूप समजावण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यात काही बदल नाही.. या सगळ्याचा परिणाम ईशाच्या प्रकृतीवर झाला.. ती शरीराने तर उत्तम होती पण मनातून खचली होती.. सतत होणाऱ्या विचारांनी आणि काळजीने ती मानसिकरित्या कमजोर झाली होती..

आज फक्त ईशा नाही तर ईशा सारख्या अनेक बायका.. आणि बायकाच नाही तर अनेकांचे नवरे या परिस्थितीतून जात आहेत.. आपला जोडीदार जर आपल्या कितीही समजून घेण्याने सुधरत नसेल तर अशावेळी स्वतःला त्रास करून घेण्याऐवजी खालील प्रयत्न करून बघा..

१) दुर्लक्ष करा
आपल्याला जिथे त्रास होतोय.. आपण कितीही चांगल वागून जर त्याचा आपल्याला उपयोग होत नसेल.. आपण समजून घेऊन सुद्धा समोरचा आपल्यालाच त्रास देत असेल.. तर अशावेळी अशा जोडीदाराच्या वागण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करा.. जेणेकरून आपण लक्ष दिलं नाही की त्याला कळेल की त्याच्या वागण्याचा आपल्यावर काही परिणाम होत नाही… आणि कदाचित तो त्याच चुकीचं वागणं बदलेल आणि सरळ वागेल.

२) आपल्या इच्छा आकांक्षाना प्राधान्य द्या
आपण नेहमी स्वतःकडे दुर्लक्ष करतो.. आपल्या इच्छांना नेहमीच दुय्यम स्थान देतो आणि आपल्या जोडीदाराच्या इच्छा आकक्षांना महत्त्व देऊन सुद्धा त्याला याची जाणीव राहत नाही तेव्हा आपल्याला जास्त त्रास होतो.. म्हणून जर जोडीदाराला जाणीव नसेल तर आणि नेहमीच आपल्या इच्छा आकाक्षांना प्राधान्य द्यायचं.. म्हणजे आपल्याला पुढे वाईट वाटणार नाही, त्रास होणार नाही तर समाधानच मिळेल.

३) स्वावलंबी व्हा
आजच्या काळात पैसा कमावणे म्हणजे खूप शिक्षण पाहिजे अस नाही.. आपल्याला अगदी शून्यातून सुद्धा जग निर्माण करता येते.. आणि जर जोडीदार नीट वागत नसेल तर अशावेळी नक्कीच जिद्दीने आपण आपल्या हिमतीवर उभ राहून सक्षम बनलं पाहिजे.. जोपर्यंत आपण जोडीदारावर अवलंबून राहणार तोपर्यंत आपल्याला त्याच कसही वागणं बोलणं स्वीकारावं लागेल.. यापेक्षा आपणच स्वावलंबी व्हायचं जेणेकरून आपल्याला आपलं स्वतःचं मत असेल.

४) मुलांकडे लक्ष द्या
घरात जर वातावरण चुकीचं असेल तर त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणाकडे तसेच त्यांच्या विचारांवर सुद्धा होतो. आणि नवरा बायको मध्ये होणारे वाद.. एकमेकांविषयी असलेले मतभेद जर मुलांपासून लपले नाहीत तर त्यांच्या मनात सुद्धा चुकीचे विचार यायला वेळ लागत नाही.. म्हणून जोडीदार जरी चुकीचा वागत असेल तरी आपण आपल्या मुलांकडे पूर्ण लक्ष देऊन त्यांच्या आजची आणि भविष्याची चोख काळजी घेणं गरजेचं आहे. आणि बऱ्याचदा मुलांमध्ये गुंतल तरी चुकीचे आणि नको असलेले विचार येऊन आपल्याला त्रास देत नाही कारण आपल्याला तेवढा वेळ सुद्धा मिळत नाही.

५) मानसिक विकास
शरीराची आपण काळजी तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा आपण मानसिकरित्या सुदृढ असतो.. आणि मानसिकता जे बिघडली तर त्याचे परिणाम आपल्यावर तर होतातच पण त्यासोबत इतरांना सुद्धा सहन करावे लागतात.. म्हणून मनाने भक्कम राहण्यासाठी जास्तीत जास्त सकारात्मक वाचन.. योगासना.. विनोदी चित्रपट किंवा मालिका बघणे.. याकडे लक्ष देण्याची गरज असते. जर आपण स्वतःची मानसिक तयारी केली तर कोणी कितीही आपल्याला त्रास दिला तर आपण ती त्रास स्वतःकडे ओढवून घेत नाही.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *