नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो बर्‍याच व्यक्तींना सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी यासोबतच बऱ्याच जणांना पोटाचे विकार नेहमी सतावत असतात. यामध्ये पोट गच्च होणे, पोट डंबारणे, पाद येणे सकाळी फोटो व्यवस्थित पणे साफ न होणे, पोटात दुखने अशा समस्या असतात. तसेच बऱ्याच जणांना पित्त होणे, उलटी मळमळ होणे तसेच सर्वात महत्त्वाचे ज्यांचे वजन वाढलेले आहे शरीरामध्ये चरबीचे प्रमाण वाढलेले आहे. बीपीचा त्रास आहे अशा या सर्व समस्येपासून कायमस्वरूपी सुटका मिळवण्यासाठी एकदम साधा सोपा उपाय पाहणार आहोत.

मित्रांनो या मिश्रणाचा सकाळच्या जेवणानंतर तुम्हाला अर्धा भाग घ्यायचा आहे आणि रात्रीच्या जेवणानंतर अर्धा भाग घ्यायचा आहे. तीन ते चार दिवस तुम्हाला या मिश्रणाचे सेवन करायच आहे. हे मिश्रण आपल्या घरामध्ये उपलब्ध पदार्थांच्या सहाय्याने करता येते. यासाठी तुम्हाला कुठूनही विकत आणण्याची आवश्यकता भासणार नाही. हे मिश्रण कशा पद्धतीने तयार करायच ? कस घ्यायचा आहे, किती दिवस घ्यायचा आहे आणि यामध्ये याची माहिती जाणून घेऊयात.

मित्रांनो, यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक लागणार आहे गुळ. गुळामध्ये कॅल्शिअम आणि लोहाचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. पोट साफ न होण्याची समस्या असेल तर रात्रीच्या जेवणानंतर गुळाचा खडा खा. तसेच हाडं कमकुवत झालेली असतील, सांधेदुखीचा, गुडघेदुखीचा त्रास असेल तो हा उपाय फायदेशीर ठरतो. मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे वजन नियंत्रणात राहते. हा उपाय तुमची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे खूपच असं मोलाचं आहे.

मित्रांनो गूळ शरीरासाठी फायदेशीर आहे. छातीमध्ये कफ झाल्यास फक्त गुळाचा एक खडा खाल्ला किंवा लहान मुलाला जर थोड्याफार प्रमाणात थोडासा गुळ खाण्यास दिला तर छातीतील कफ निघून जातो.

मित्रांनो या उपायासाठी आपल्याला एक चमचाभर गूळ घ्यायचा आहे आणि यात सर्वात महत्त्वाचा घटक घालायचा आहे तो म्हणजे जिरे. जेवणाला रुचकर चव आणण्यास जिऱ्याचा फार वाटा मोठा असतो. जिरे फक्त चवीसाठी नव्हे तर आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. जिरे वजन कमी करतात. त्याचप्रमाणे हे तुमची त्वचेवर डार्क सर्कल म्हणजे काळे डाग, चट्टे वगैरे आले असतील तर निघून जातील.

त्याचप्रमाणे मित्रांनो वाढलेलं वजन कमी करण्यासाठी देखील जिऱ्याचा खूपच मोलाचा वाटा आहे. या जिऱ्यात लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम जास्त प्रमाणात असते जे वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. यासाठी आपल्याला एक चमचा जिरे घ्यायचे आहेत. जिरे आपल्याला तव्या वरती भाजुन घ्यायचे आहेत. भाजलेल्या जिऱ्याची भरड करून घ्या. जास्त बारीक पावडर करायची नाही.

मित्रांनो सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे आल. यालाच अद्रक म्हटल जात. याचा वापर आपल्या रोजच्या चहामध्ये जर केला तर सर्दी, पडसे, खोकला कायमस्वरूपी बरा होतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आल्याच्या सेवनाने वजन देखील कमी होण्यास मदत होते. तसेच अनेक आजारांपासून बचाव करण्यासाठी, प्रतिकारशक्ती कमकुवत झालेली असेल ती प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील आल खूपच गुणकारी आहे. आल किंवा त्याला आद्रक देखील किसनीने किसून घ्या. साधारणता एक चमचाभर किस आपल्याला लागणार आहे.

मित्रांनो गुळ, जिरे आणि आल प्रत्येकी एक चमचा घ्या. हे तिन्ही घटक आपल्याला व्यवस्थित पणे एकजीव करायचे आहेत. हे तयार झालेल्या मिश्रणाचे साधारणत दोन भाग करायचे आहेत. सकाळच्या जेवणानंतर किंवा दुपारी जर जेवण करत असाल तर त्या जेवणानंतर तुम्हाला हे अर्धा भाग घ्यायचा आहे आणि रात्रीच्या जेवणानंतर तुम्हाला असा अर्धा भाग घ्यायचा आहे.

मित्रांनो अपचन, गॅस, पित्त, पोटाचे किरकोळ तक्रारी असतील तर हा उपाय तीन ते चार दिवसापर्यंत करा. ज्यांना वजन कमी करायचे त्यांनी साधारणतः सात दिवस ते 14 दिवसापर्यंत हा उपाय करा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *