नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!स्वामींचे सुखी राहायचे ५ नियम नक्की वाचा आणि फक्त वाचू नका तर ते आपल्या रोजच्या जीवनामध्ये अमलात आणा कारण यामुळे तुमचे रोजचे आयुष्य हे सुखी होईल. तर मित्रांनो स्वामींचा पहिला नियम असा आहे की, कधीही कोणाशीही आपली स्वतःची तुलना करू नका. की मी असाच का आहे तसाच का नाही त्याला सर्व काही काम मिळत. मला काहीच का मिळत नाही.

तर मित्रांनो अशी तुलना कधीही करु नका, कारण स्वामींनी तुम्हाला सर्वात वेगळ बनवलेल आहे सगळ्यांसारख नाही. स्वामींनी तुम्हाला खूप काही दिलेल आहे. त्यामध्ये सुखी राहा आणि दुसऱ्यांशी आपली तुलना कधीही करू नका. स्वामींचा दुसरा नियम म्हणजे स्वामी म्हणतात की, जास्त विचार करणे बंद करा. माझ काय होईल उद्या काय होईल जास्त काय होईल त्याच काय होईल आता विचार करणे बंद करा. मित्रांनो विचार करून काही होत नाही फक्त आपल शरीर खराब होत.

आपल्याला बीपीचा त्रास होतो, तर मित्रांनो स्वामींनी याप्रकारे सांगितलेले आहे की, विचार करणे बंद करा. विचार अजिबात करू नका आनंदी राहा सुखी राहा. मित्रांनो स्वामिनी सांगितलेला ३ रा नियम म्हणजे भूतकाळातील नको त्या गोष्टीचा विचार करणे व त्या गोष्टींना आठवत राहणे आजच टाळा. मित्रांनो काल काय झालेला आहे भूतकाळामध्ये काय झालेल आहे. हे आज का आठवत आहात जे झाल ते झालेल आहे. तर तुम्ही आज मध्ये राहा गेलेल्या गोष्टी आठवू नका आणि येणाऱ्या गोष्टीचा विचार करू नका.

फक्त आजच्या गोष्टी चालू आहे, त्या गोष्टीचा विचार करा आणि त्या गोष्टींमध्ये आपले आयुष्य जगा कारण मित्रांनो येणारी वेळ काय असेल हे कोणालाही माहिती नसते. कोणीही ती बघितलेली नाही किंवा सांगू शकत नाही. म्हणून मित्रांनो मागे गेलेल्या गोष्टी आणि पुढे येणाऱ्या गोष्टी यांची आठवण काढून आपले आज खराब करून घेऊ नका. फक्त आनंदी राहा.

चौथा नियम म्हणजे दुसरे आपल्या बद्दल काय बोलतात याचा अजिबात ही विचार करू नका. मित्रांनो बरेच लोक आपल्या तोंडावर किंवा आपल्या पाठीमागे आपल्याला काहीतरी बोलत असतात. ते लोक आपले ऑफिसचे लोक कॉलेजमधले लोक किंवा नातेवाईक किंवा मित्रमंडळी असू शकतात. आणि आपल्याला त्या गोष्टी कळत सुद्धा असतात की हा आपल्या बद्दल अस बोलला तो आपल्या बद्दल तस वाईट बोलला. परंतु दुसऱ्यांच्या गोष्टीसाठी आपल्याला काय देण घेण.

पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये बघितले पाहिजे दुसरे काय बोलत आहेत याकडे दुर्लक्ष करून टाका. कारण वर बसलेले स्वामी आणि आपल्या आजूबाजूला असलेले परमात्मा त्यांना सर्व माहिती असत की, कोण काय करत आहे आणि कोण काय करत नाही आहे. ते त्यांच्याकडे मनुष्याच्या चांगल्या आणि वाईट गुणांची एक डायरी असते. तर मित्रांनो आपल्याला फक्त आपले चांगले गुण मिळवायचे आहेत.

परंतु मित्रांनो दुसरे आपल्या बद्दल काय बोलतात याबद्दल कधीही विचार मनात आणू नका. त्यांना त्यांचे काम करू द्या फक्त तुम्ही कोणाबद्दलही वाईट बोलू नका. तुम्ही सदैव चांगला विचार करा आणि त्यांच्या बोलण्याकडे लक्ष असू देऊ नका. मित्रांनो स्वामींचा पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे सतत आनंदी राहा. हो मित्रांनो प्रत्येक गोष्टींमध्ये आनंद शोधा घरातील व्यक्तींमध्ये आनंद शोधा तुमच्या घरा मध्ये किती लोक आहेत.

आई वडील भाऊ-बहीण व नवरा किंवा बायको यामध्येच आनंद आहे. मित्रांनो त्यासोबत मित्रांमध्ये, ऑफिसच्या व्यक्तींमध्ये आनंद आहे. म्हणून निगेटिव्ह गोष्टीपासून दूर राहा. सदैव पोसिटीव्ही राहा. उद्याचा विचार करू नका आणि स्वामींचे हे पाच नियम नक्की अमलात आणा. तुमचे जीवन सुखी आणि आनंदी होईल

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *