नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!हजारो वर्षांपूर्वी भारतीय ऋषीमुनींनी स्वप्न फल विचार हा ग्रंथ लिहून ठेवला. मनुष्याला जे स्वप्न पडतात त्या स्वप्नांचा नक्की काय अर्थ होतो. याचा या मध्ये सखोल विचार केलेला आहे. आज आपण काही अशी स्वप्न पाहणार आहोत. जी स्वप्न पाहिल्यास स्वप्न पाहणाऱ्या चा मृत्यू होतो. मित्रानो या ठिकाणी आपल्याला घाबरवण्याचा किंवा भीती निर्माण करण्याचा उद्देश नाही.

केवळ अशा प्रकारची स्वप्न पाहिल्यास आपण सावध व्हा. आणि महामृत्युंजय मंत्राचा जास्तीत जास्त जप करा. आपल्या इष्ट देवतेची आराधना सुरू करा. भगवान शिव शंकरना दत्तात्रेयांना शरण जा. अशा प्रकारच्या स्वप्न पासून ते आपल्याला मुक्ती प्रदान करतात. जाणून घेऊया कोणते स्वप्न पाहिल्यास पाहणाऱ्या चा लवकर मृत्यू होऊ शकतो.

जी व्यक्ती स्वप्नात पाणी पिते. तिला खूप कष्ट होऊ शकतात. पाण्यात बुडताना पाहिल्यास त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. स्वप्नात डोक्यावर पांघरून घेतलेले पाहणे हे एखाद्या संताच्या मृत्यूचे सूचक आहे. स्वप्नात एखाद घर किंवा इमारत पडताना पाहणे हे सुद्धा मृत्यूच सूचक आहे. एखाद्या स्त्रीने स्वतः ला जेवताना पाहणे हे अत्यंत वाईट असते. जर ती स्त्री गर्भवती असेल.

आणि ती स्वतः जेवताना पाहते तर तिच्या गर्भपाताची शक्यता असते. स्वप्नात स्वतः ला खेळ खेळताना पाहणे म्हणजे शोक, दुःख, पश्र्चाताप, धनक्षय म्हणजे पैशाची हानी, पुत्र मृत्यू म्हणजे पुत्राचा मृत्यू व त्या व्यक्तीच्या पत्नीला त्रास या गोष्टींचं सूचक आहे. स्वप्नात जर तुम्ही भांडण करत असाल, लढाई मारामारी करत असाल तर या गोष्टी पाहणे म्हणजे निरोगी माणसाला सुद्धा रोग होईल.

आणि जर रोगी माणूस अशा प्रकारचे स्वप्न पाहील तर त्याच्या मृत्यूची पूर्व सूचना समजावी. स्वप्नात तेलाने मालिश करून घेणे किंवा तेल पिणे या गोष्टी संकटाच्या किंवा मृत्यूच्या सूचक आहेत. रामायण मध्ये आणि महाभारतात रावणाला, कंसाला आणि त्यांच्या नातलगांना अशाच प्रकारचे स्वप्न पडल्याचे उल्लेख आहेत. स्वप्नात जर भूकंप पाहत असाल तर आपल्या देशावर आपल्या राज्यावर लवकर संकट येणार आहे.

आणि राजाचा मृत्यू होणार आहे. तो देश चालवतो त्या देशाच्या प्रमुखाचा मृत्यू होणार आहे. असा इशारा करते. स्वप्नात डोकं दुखणे ही आजारपणाची सूचना समजावी. स्वप्नात विचित्र मस्तक दिसल्यास हा १०० टक्के मृत्यू योग समजावा. अजूनही अशी काही स्वप्न आहेत की स्वप्नात काळया घोड्यावर स्वार होणे, काळे कपडे परिधान करणे किंवा काळे पदार्थ शरीरास लावणे या गोष्टी साक्षात् मृत्यूच्या सूचक आहेत.

जी व्यक्ती वारंवार तेल पिताना दिसते अशा व्यक्तीचा शेवट प्रमेह रोगाने मृत्यू होत असतो. तसेच स्वप्नात एखाद्या व्यक्तीच्या कानात साप घुसने किंवा एखादा घोन कामात शिरताना स्वप्न पाहिलं तर रोगाने मृत्यू होण्याचे हे लक्षण आहे. स्वप्नात चाकू दिसणे किंवा त्रिशूल दिसणे किंवा एखाद्या पक्ष्याकडून चोच मारणे या गोष्टी स्वप्नात दिसल्यास रोग होऊ शकतो. हानी किंवा प्रचंड नुकसान होऊ शकते. ही पूर्व सूचना आपण समजू शकता.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *