नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!आपण अर्पण केलेला नैवेद्य स्वामी ग्रहण करतात का? एका शिष्याने आपल्या गुरूला विचारले खरच स्वामी आपण दाखवलेला नैवेद्य ग्रहण करतात का? तर स्वामी तो ग्रहण करतात तर ते पदार्थ नाहीसे का होत नाहीत? त्यावेळी त्या गुरुने त्या शिष्याला काहीच उत्तर दिले नाही. आपला नियमित पाठ शिकवत राहिले.

त्या दिवशी त्या पाठांमध्ये गुरुजींनी आपल्या शिष्याला एक श्लोक शिकवला. पाठ संपल्यावर गुरूंनी सर्व शिष्यांना पुस्तकात पाहून हा श्लोक कंठस्थ करायला सांगितला. काही वेळानंतर गुरूंनी प्रश्न विचारला. थोड्या वेळा नंतर गुरूंनी प्रश्न विचारणाऱ्या शिष्याजवळ जाऊन त्याला विचारले.

काय श्लोक पाठ झाला की नाही. त्यावर त्या शिष्याने गुरूंना तो श्लोक अचुक म्हणून दाखवला. तरीदेखील गुरुंनी नकारार्थी मान हलवली. त्यावर शिष्य आवर्जाने म्हणाला. तुम्हाला हव असेल तर पुस्तकात बघा. मी श्लोक बरोबर म्हटला आहे. त्यावर गुरु म्हणाले अरे हे श्लोक तर पुस्तकात आहे. मग तू कसा कंठस्थ केलास?

त्यावर शिष्य काहीच बोलू शकला नाही. त्यावेळी गुरुंनी त्याला समजावले की सध्या पुस्तकात जो श्लोक आहे. तो स्थूल स्थितीमध्ये आहे आणि तो जो श्लोक कंठस्थ केला. तो सूक्ष्म स्थितीत तुझ्या अंत:करणात प्रविष्ट झाला. म्हणजे तुझे मन ही त्याच स्थितीत असते. तू श्लोक कंठस्थ केलास. त्यावेळेस पुस्तकातील जे त्याचे स्थूल रूप आहे.

त्याचा काहीसा ऱ्हास झाला नाही. त्याच प्रकारे संपूर्ण विश्वास प्राप्त असलेला परिपूर्ण परमात्मा जेव्हा आपण अर्पण केलेल्या नैवेद्याचे सूक्ष्म स्थितीत गहण करतो. तेव्हा त्याच्या स्थूल रूपात काहीच ऱ्हास होत नाही. नैवेद्याचे ते स्थूल रूपच आपण नंतर प्रसाद म्हणून स्वीकारतो. तर हे त्या गुरुंनी त्या शिष्याला सांगितले.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *