नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ हा मं त्रजप जर आपण केला तर आपली प्रत्येक दोषातून मु क्ती होते. आपण ज्या हिंदू धर्माचे पालन करतो, जिथे राहतो तिथे देवांचे वर्गीकरण आहे ते असे ” अ, ब, क, ड “. हे चार प्रकार म्हणजे देवांचे वर्गीकरण होय.

स्वामी समर्थ महाराज यापैकी ‘अ’ वर्गातील देव आहेत. अ वर्ग म्हणजे प्रत्यक्ष परब्रम्हस्वरूप ते स्वयंजा गृत देव होय आणि ते फक्त यासाठी फक्त पात्रच नाहीत तर महापात्र देव आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज हे साऱ्या विश्वाचे राजे आहेत, अनंतकोटी ब्रम्हंडाचे नायक आहेत, राजाधिराज योगी, सिद्ध पुरुष आहेत. त्यामुळे त्यांना शरण जाण्यासाठी मुजरा पद्धत अनुसरली जाते.

आणि मित्रांनो मुजरा करणे ही पद्धत म्हणजे स्वामींना शरण जाणे, अशा महान देवाला शरण गेल्याने आपल्यातील दोष नाहीसे होतात. आपला अहंकार पळून जातो व उरतो तो फक्त भक्तिभाव आणि अध्यात्मिक आनंद.. आणि मित्रांनो आपल्यातील अनेक स्वामी भक्तांना स्वामी दर्शन देत असतात.

त्यांच्या सर्व भक्तांनी त्यांना राजाधिराज, अनंत कोटी ब्रम्हांडनायक, राजाधिराज, योगीराज, कलियुग जाणते महाराज, सदैव पाठीशी राहणारा देव असे संबोधले आहेत. म्हणून अशा महान देवाला तीन वेळा मुजरा करून शरणागती पत्करून आपल्या गुरूला स्वतःला अर्पण करण्यासाठी नाक घासून दंडवत, नमस्कार केला जातो.

आणि मित्रांनो आपले स्वामी हे शरण येणाऱ्या भक्तांना स्वामी आपल्या जवळ घेतात, कुरवळतात व मायेने गों जारतात आणि डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवतात. मुजरा केल्यावर गुरुरब्रह्मचा सर्वार्थ नैवद्य प्राप्त होतो. म्हणून आपण हातपाय धुवून अवदुंबराला प्रदक्षिणा घालून आपण स्वामींच्या दर्शनासाठी जातो. आपला भाव, मन शुद्ध ठेवावे.

आचरण शुद्ध ठेऊन तीन वेळा मुजरा करावा. स्वामींना मुजरा करणे व नमस्कार करणे या दोन्ही शुद्ध गोष्टी आहेत ज्या आपण शुद्ध अंतकरणाने केल्या पाहिजेत. यो गीराज व राजाधिराज म्हणजे जणू आपला पालनकर्ता होय म्हणून फक्त नमस्कार न करता तीन वेळा मुजरा करावा तसेच नाक घासून वंदन करणे म्हणजे सर्वार्थाने स्वामींना शरण जाणे.

आणि मित्रांनी जेव्हा कधी जाल तेव्हा हे नक्की स्मरण करा की आपला भाव शुद्ध हवा आणि एक नियम म्हणून नव्हे तर सेवेकरी, शरणी म्हणून तीन वेळा मुजरा करून नाक घासून स्वामींना स्वच्छ अंतकरणाने स्मरण करा. मंदिरात प्रवेश करतेवेळी मनात शुद्ध, चांगले विचार मनात ठेवा. त्यासाठी स्वामींचा अखंड जयघोष करा, मनातल्या मनात स्वामींच्या मंत्राचा जप करा.

स्वामींच्या अथांग रूपाचे चिंतन करा तुमचं मन शांत होईल. अगदी नम्रपणे भक्तिमय वातावरणात, जयघोष, नामघोष करीत मठात प्रवेश करावा. घंटा वाजवून त्या ध्वनीलहरी ऐका त्यामुळे आपल्या शरीरातील सक्रिय असलेली चक्रे संतुलित होतात, हीच सात्विक ऊर्जा घेऊन स्वामींना समोरून नमस्कार न करता स्वामींच्या फोटोच्या उजव्या बाजूला उभे राहून नमस्कार करावा.

आणि मित्रांनो त्यावेळी स्वामींच्या फोटोची ते जस्वी कि रणे, सात्विक लहरींचा अनुभव घ्यावा व संपूर्ण मन, धन अर्पून स्वामींना शरण जावे. प्रदक्षिणा घालताना तिथली कंपने अनुभवावी, त्यामुळे तुमची सर्व नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल. मंदिरातील तीर्थ प्रसाद आवर्जून घ्यावा ज्यामुळे तुमचं मानसिक स्वास्थ्य नेहमीच चांगलं राहील. तसेच स्वामी हे कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्या पाठीशी उभे राहतात पण स्वामींना पाहण्यासाठी तशी दृष्टी सुद्धा आपल्याला हवी, श्री स्वामी समर्थ.!!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *