नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!अशी कथा आहे की, समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शीव यांनी विष प्राशन केले होते. तेव्हा त्यांच्या घश्यात जळजळ होऊ लागली. बेलाच्या पानामध्ये विष निवारक गुणधर्म आहेत म्हणून त्यांना डोक्यावर बेलाचे पान ठेवण्यात आले, जेणेकरून विषाचा प्रभाव कमी होईल. असे मानले जाते की तेव्हापासून भोलेनाथ यांना बेलाचे पान देण्याची परंपरा सुरू झाली. दुसर्‍या आख्यायिकेनुसार, बेलाच्या पानाची तीन पाने भगवान शिवच्या तीन डोळ्यांचे प्रतीक आहेत. म्हणजेच शिवचेच स्वरुप असलेले बेलाचे पान खूप पवित्र मानले जाते.

शिवपुराणातही नमूद केले आहे महत्व
भोलेनाथांच्या पूजेत बेलाच्या पानाचे महत्त्व आहे कारण बेलाचे पान अर्पण केल्यानेसुद्धा महादेव प्रसन्न होतात म्हणून त्यांना ‘आशुतोष’ असेही म्हणतात. बेलाच्या पानामध्ये तीन पाने एकत्र जोडलेली आहेत. हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते. तसेच, बेलाच्या पानांचा संदर्भ बऱ्याच पुराणात केला आहे. पण त्याचे वैभव शिवपुराणात सविस्तरपणे सांगितले आहे. शिवपुराणात म्हटले आहे की बेलाचे पान हे भगवान शंकराचे प्रतीक आहे. देव स्वत: त्याच्या महिम्याचा स्वीकार करतात. असा विश्वास आहे की जो कोणी बेलाच्या झाडाच्या मुळाजवळ शिवलिंग ठेऊन भोलेनाथाची पूजा करतो तो नेहमी आनंदी असतो. त्याच्या कुटुंबावर कधीही संकट येत नाही.

शिवपुराण व्यतिरिक्त या पुराणातसुद्धा उल्लेख
बेलपत्राच्या उत्पत्तीची एक कथा स्कंद पुराणात आढळून येते. एका पौराणिक कथेनुसार, एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली. बेलवृक्षाच्या मूळाशी गिरिजा देवी, खोडात महेश्वर देवी, फाद्यांमध्ये दक्षयायनी देवी, पानांमध्ये पार्वती देवी, फुलांमध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कात्यायणी देवीचा वास असतो, अशी मान्यता आहे. तसेच यामध्ये महालक्ष्मी देवीचा वास असतो, असेही सांगितले जाते. शिव-पार्वती पूजनात अर्पण केलेल्या बेलाच्या पानामुळे दोन्ही देवतांचे शुभाशिर्वाद लाभतात, अशी मान्यता आहे.

बेलपान अर्पण करतांना या मंत्राचा करा जप
भोलेनाथांना बेलाचे पान अर्पण करताना, ‘त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्रं च त्रिधायुतम | त्रीजन्मपापसंहारम बिल्वपत्रं शिवार्पणम ‘ या पौराणिक मंत्राचा जप करा. या मंत्राचा अर्थ असा आहे की तीन गुण, तीन डोळे, त्रिशूल धारण करणारे आणि तीन जन्मांचे पाप नष्ट करणारे हे भगवान शिव, तुम्हाला तीन पाने असलेले बेलाचे पान अर्पण करतो. रुद्राष्टाध्यायी असलेला हा मंत्र म्हणत असतांना बेलाचे पान अर्पण करण्याचे विशेष महत्व आहे.
या तारखांना बेलपत्र तोडू नये
बेलाच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. काही जाणकारांच्या मतानुसार, बेलाची पाने तोडताना शिवाचे नामस्मरण केले पाहिजे. याशिवाय, चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, संक्रांत आणि अमावास्या या तिथींना तसेच सोमवारी बेलाची पाने तोडू नयेत, असे सांगितले जाते. तीन पान असलेलेच बेलपत्र शंकराला अर्पण करावे. मात्र, तीन पाने नसलेले बेलाचे पान शंकराला वाहू नये, असेही सांगितले जाते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *