नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!मित्रांनो शंकर महाराजांना आपण सगळ्यात जाणतो. तर मित्रांनो आज आपण शंकर महाराजांबद्दल जाणून घेणार आहोत. शंकर महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे काय नाते होते. ते देखील आज आपण जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात.

मित्रांनो नाशिक जिल्ह्यात अंतापुर नावाचे गाव आहे. त्या ठिकाणी चिमणाजी नावाचे गृहस्थ राहत होते. त्यांना पोटी मुल बाळ नव्हते ते शिवाचे एकनिष्ठ भक्त होते. त्यांना एकदा स्वप्नात दृष्टांत झाला की जंगलात जा तिथे तुम्हाला एक बाळ भेटेल तुम्ही घेऊन या. त्याप्रमाणे ते जंगलात गेले व त्यांना 2 वर्षाचे बाळ मिळाले. शकाराचा प्रसाद म्हणून त्यांनी त्याच नाव देखील शंकर ठेवले.

शंकर हा माता पिताजवळ काही दिवस राहिल्या नंतर त्याने माता पित्यांना आशीर्वाद दिला की तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल.

शंकर महाराज हे स्वामी समर्थांचे एकनिष्ठ भक्त होते. स्वामी समर्थांचा वारसा त्यांनी पुढे चालवला. स्वामी आणि शंकर महाराज यांचे अनेक प्रसंग आपल्याला वाचायला मिळतात. त्यातला एक प्रसंग म्हणजे एक दिवस शंकर महाराजांना स्वामींची खूप आठवण येत होती.

अस्वस्थ वाटत होतं त्यामुळे त्यांनी स्वामींचे नामस्मरण सुरू केले त्यावेळी स्वामी हे साक्षात वटवृक्ष खाली बसलेले दिसले त्यावेळी शंकर महाराजांनी जवळ जाऊन स्वामींचे दर्शन घेतले.स्वामींनी त्यांना हृदयाशी घेतलं व स्वामींच्या डोळ्यातून एक ज्योत निघाली होती ज्योत थेट शंकर महाराजांच्या हृदयात गेली.

शंकर महाराजांना कळलं व ते स्वामींना म्हणाले की स्वामी आम्हाला पोरक करून जाऊ नका स्वामींनी उत्तर दिलं आम्ही कुठे जात नाही, आम्ही तुझ्या मध्येच आहोत. हम गया गया नही जिंदा है. तो दिवस होता मंगळवार चैत्र वैद्य एकादशी एप्रिल 1878 ला स्वामींनी आपला वारसा शंकर महाराजांना देऊन वटवृक्षाखाली समाधी घेतली.

संस्कार महाराज नेहमी म्हणत मै कैलास का राहणे वाला हू नाम मेरा शंकर. शंकर महाराज जात धर्म कधी मानत नसतं, त्यामुळे त्यांच्याकडे प्रत्येक जात धर्माचे लोक येत असत व ते सगळ्यांना संकट मुक्त करत असत.

शंकर महाराजांनी अनेक वचने सांगितले. ते नेहमी म्हणत आई-वडिलांची सेवा व कुलदैवतची सेवा केली तर मनुष्याला आयुष्यात कुठल्याच गोष्टीची कमी पडत नाही.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *