नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो, दूध पिणे आवडत नसलेल्यांसाठी दही हा प्रोटीन, कॅल्शियम यासोबतच अ‍ॅसिडीटी शमवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. वेळी अवेळी खाणे, तसेच अरबट-चरबट पदार्थांच्या सेवनामुळे पोटातील ‘चांगल्या बॅक्टेरीया’चे संतुलन बिघडण्याची शक्यता असते.मात्र दह्याच्या सेवनाने हे नियंत्रण राखण्यास मदत होते. परंतू अनेकजण रात्रीचे दही खाणे टाळा असा सल्ला देतात. दह्यामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतानाही ‘दही’ खाणे टाळण्याचा सल्ला का दिला जातो हे तुम्हांला ठाऊक आहे का ?

आयुर्वेदानुसार दही हे कफ वाढवण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे रात्रीच्या वेळेस दह्याचे सेवन टाळले जाते. पण आहारतज्ञ नेहा चंदना यांच्या मते, ‘दही प्रत्येकालाच त्रासदायक ठरते असे नाही. त्यामुळे सर्दी-पडशाचा तीव्र त्रास असलेल्यांनी रात्रीचे दही टाळावे.’ कफाचा त्रास नसणार्‍यांनी रात्रीच्या जेवणात दही किंवा ताकाचा समावेश करणे फायदेशीर ठरतो. दह्यामुळे दात आणि हाडं मजबूत होतात. तसेच सकाळी पोटफुगी (ब्लोटींग)चा त्रास होत नाही.

कसा कराल दह्याचा रात्रीच्या आहारात समावेश ?
दही-भात –
गरम भातामध्ये दही मिसळा. त्यावर चवीनुसार साखर किंवा मीठ आणि मिरपूड मिसळा. तुम्हांला आवडत असल्यास या भातावर लाल मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी घालू शकता. यामुळे चटपटीत पण हेल्दी जेवणाचा आस्वाद चाखू शकाल. दह्याप्रमाणेच भात देखील रात्रीचा खाणे आरोग्यदायी आहे.

गोड दही –
तुम्हांला गोड खाणे आवडत असेल तर तुम्हांला साखर -दही हा झटपट प्रकार नक्की आवडेल. घट्ट दह्यामध्ये चवीपुरती साखर मिसळा. यामुळे दह्याची चव वाढेल. तसेच रात्रीच्या जेवणात त्याचा समावेश केल्यास पोटातील अतिरिक्त अ‍ॅसिडीटी नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल.

ताक –
जेवणानंतर ताक किंवा छास पिणे हा उत्तम पर्याय आहे. यामुळे पोटात थंदावा निर्माण होतो तसेच अ‍ॅसिडीटी वाढवणार्‍य बॅक्टेरियांवरही मात करण्यास मदत करते.

लस्सी –
गोड आणि घट्ट ताक म्हणजे लस्सी ! मलई आणि साखरेमुळे लस्सी घट्ट होते.

कढी –
पातळ ताकाला जिरं मोहरी आणि कढीपत्त्याच्या फोडणीमध्ये बेसन घालून उकळी काढणं म्हणजे कढी ! गरमागरम कढी भात किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता.

फ्रुट सलॅड –
केळी, डाळींबाचे दाणे, पपई किंवा सफरचंद अशी गोड फळं दह्यात मिसळून खाणे अत्यंत चविष्ट आणि आरोग्यदायी ठरते. तसेच हा झटपट होणारा डेझर्टचा प्रकार आहे.

रायता –
भारतीय जेवणात विविध प्रकारच्या रायताचा समावेश केला जातो. बीट, मुळा आणि गाजराची कोशींबीर केल्यानंतर त्यात थोडे दही मिसळा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *