नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!!! मित्रांनो तूप हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आपल स्वयंपाक घर हे तूपाशिवय अपूर्ण आहे. तर मित्रांनो, प्राचीन काळापासून तुपाचा उपयोग वेगवेगळ्या कामासाठी केला जात आहे. त्याचबरोबर आपल्या आयुर्वेदानुसार सुद्धा तुपाचा आपल्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे असे दर्शविले आहे. गावरान तूप खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला वेगवेगळे फायदे होतात. गावरान तूप म्हणजेच गाईचे शुद्ध तूप. या तुपामध्ये विटामिन ए, फायबर, प्रोटीन असे वेगवेगळे घटक समाविष्ट असतात.

मित्रांनो, तूप हे आपल्या जीवनातील वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमात सुद्धा वापरले जाते जसे की देवापाशी दिवा लावण्यासाठी सुद्धा गावरान तुपाचा वापर केला जातो. त्याच बरोबर मोदक, पुरणपोळी आणि खीर यासारखे पदार्थ तुपाशिवाय अर्धवट आहे. तूप खाल्ल्यामुळे आपली त्वचा मऊ व ताजे टवटवीत राहते. नियमितपणे गावरान तुपाचे सेवन करणे हे आपल्या शरीराला त्याच बरोबर आपल्या त्वचेस अत्यंत लाभदायक ठरू शकते.

मित्रांनो, योग्य प्रमाणात गावरान तुपाचा वापर केल्यामुळे आपल्या मेंदूला चालना मिळते, त्याच बरोबर काम करण्यासाठी आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते. गावरान तुपामध्ये असलेल्या नैसर्गिक गुणधर्मामुळे आपले शरीर निरोगी राहते. त्याच बरोबर हाडांना बळकटपणा येतो, त्याचबरोबर तुपाचे अत्यंत महत्त्वाचे वेगवेगळे गुणधर्म सुद्धा आपल्या शरीरास मदतगार ठरू शकतात. पूर्वीचे लोक तुपाचे सेवन आपल्या आहारात नियमित प्रमाणे करायचे त्यामुळे त्यांचे आरोग्य सुद्धा चांगले रहायचे.

मित्रांनो, गावरान तुपामुळे त्वचेला योग्य पोषकतत्वे मिळतात, गावरान तूपाने त्वचेला मालिश केल्यामुळे देखील त्वचा ताजी राहते आणि त्वचा कोरडी पडत नाही. घरी बनवलेले आणि चांगले कढवलेले गावरान तूप अधिक वेळ टिकते. ते तूप लवकर खराब होत नाही.

मित्रांनो, जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब असे वेगवेगळे आजार किंवा समस्या असतील, तर तुम्ही तुपाचा नियमितपणे सेवन करावे. तुपामुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रण मध्ये येण्यास मदत होईल.

गावरान तूप खाल्ल्यामुळे होणारे शरीराला फायदे :-
तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत गावरान तूप खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होऊ शकतात ? चला तर मग बघूया!

पचनक्रिया सुधारण्यास मदत करते – मित्रांनो, बाहेरचे बाजारातील पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा अवेळी जेवण केल्यामुळे आपल्याला अपचन सारखा त्रास निर्माण होतो. अपचनामुळे पोटात गॅस निर्माण होते, ऍसिडिटी किंवा जळजळ होणे आणि पोट फुगणे अशा समस्या निर्माण होतात. जर आपण तुपाचे सेवन आपल्या आहारात केले तर आपली पचनक्रिया सुधारण्यास आपल्याला मदत मिळते आणि त्याच बरोबर आपल्याला अपचनाचा त्रास कमी होण्यास मदत होते.

शरीरातील उष्णता नियंत्रित राहते – हिवाळ्यात थंडीमुळे आपल्या शरीरातील उष्णता बऱ्याच प्रमाणात अनियंत्रित होते. या अनियंत्रित झालेल्या उष्णतेला नियंत्रित ठेवण्यासाठी तूप महत्त्वाचे कार्य करत असते. जर तुम्ही हिवाळ्यात तुपाचे सेवन केले तर तुमची शरीरातील उष्णता नियंत्रित राहील. कारण तुपामध्ये असलेल्या वेगवेगळ्या गुणधर्मामुळे शरीरातील उष्णता नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे हिवाळ्यात तुपाचे सेवन करणे हे आपल्या शरीरास उपयुक्त ठरू शकते.

सांधेदुखीचा त्रास होत नाही – मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना कामाच्या अति दबावामुळे किंवा वय झाल्यामुळे आपल्या सांधेदुखी सारखा त्रास उद्भवतो अथवा निर्माण होतो. सांधेदुखीचा त्रास हाडांमध्ये कमी प्रमाणात असणाऱ्या विटामिन,फायबर आणि असे वेगवेगळ्या पोषक तत्वांची कमतरता असल्यामुळे उद्भवतो. या सांधेदुखीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही जर तुपाचे सेवन आपल्या आहारात केले तर तुम्हाला पासून आराम मिळेल. कारण तुपामध्ये असणाऱ्या विटामिन ए त्याचबरोबर फायबर आणि असे बरेच पोषक तत्वे असतात. जे तुमच्या हाडांना मजबुती देण्यास मदत करतात.

जुलाब होत नाही – मित्रांनो, अनेक वेळा आपल्याला तापमानामध्ये झालेल्या बदलामुळे किंवा मग अन्न किंवा पाणी मध्ये झालेल्या बदलांमुळे किंवा मग हवापालट झाल्यामुळे आपल्याला जुलाबाचा त्रास होतो. या जुलाबाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी जर तुम्ही तुपाचे सेवन केले किंवा आपल्या आहारात तुपाचे योग्य प्रमाणात सेवन केले. तर तुम्हाला जुलाबा सारखा त्रास होणार नाही. तुपामुळे तुमच्या आतड्याला पुरेशा प्रमाणात पोषक तत्व मिळतात आणि त्यामुळे दुखण्याचा त्रास ही कमी होतो.

शरीरात नवीन उर्जेचा संचार होतो – तुपाचे सेवन केल्यामुळे शरीराला ऊर्जा देण्याचे काम सुद्धा तूप करते. तुपामध्ये असलेल्या विविध घटकांमुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळे वेगवेगळे काम करण्यास शरीराला मदत मिळते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *