नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो, प्रत्येकाचीच कोणती ना कोणती इष्टदेवता कुलदेवता ही असतेच आणि आपल्या घरामध्ये देखील विविध प्रकारच्या देवी-देवतांच्या मूर्ती असतात. आपल्या घरामध्ये देवघर हे वेगळे पूजेसाठी केलेले असते आणि ही देवपूजा प्रत्येक जण हा करीत असतो. प्रत्येक कुटुंबातील एखादी व्यक्ती देवपूजा करीत असतात. अगदी मनोभावे व श्रद्धेने पूजा करून अनेक आपल्या इच्छा आपल्या देवांसमोर बोलून त्या पूर्ण करण्यासाठी प्रार्थना देखील करीत असतात. परंतु मित्रांनो काही वेळेस अनेकांच्या इच्छा पूर्ण झालेल्या देखील आपण पाहतो.

परंतु मित्रांनो असे काही लोक आहेत की ज्यांच्या इच्छा पूर्ण झालेले नाही व त्यांच्या पुजेमध्ये नेमके काय कमी पडले त्यामुळे त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत किंवा त्यांना यश प्राप्त होत नाही किंवा बेरोजगार राहतात. पैशाची कमतरता भासते. तर मित्रांनो अशा या अडचणी अशा लोकांच्या बाबतीत का निर्माण होतात तर यामागे आपणच जबाबदार असतो म्हणजेच आपण केलेल्या चुका यामुळे आपली पूजा देव स्वीकारत नसतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करीत नसतात. तर मित्रांनो अशा कोणत्या चुका आहेत या केल्यामुळे ईश्वर आपली पूजा स्वीकारत नाही आणि आपली इच्छा पूर्ण करत नाही. याविषयीची आज आपण माहिती घेणार आहोत.

आपण या चुकावरती उपाय कसे करायचे या चुका होऊ नयेत याकडे कसे लक्ष द्यायचे ते संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे. कुटुंबातील एक सदस्य हा देवपूजा करीत असतो. परंतु मित्रांनो या देवपूजेची काही वेळ, काळ ठरलेला असतो म्हणजेच प्रत्येक दिवशी काळ आणि वेळ याचा विचार करून देवपूजा जर केली तर मात्र आपली पूजा देव स्वीकारू शकतात.

चोवीस तासांच्या या काळामध्ये दोन काळ असतात. ज्यांना आपण राहुकाळ आणि केतू काळ असे म्हणतो. हे दोन काळ आपल्या ज्योतिष शास्त्रामध्ये खूप महत्त्वाचे मानले जातात. राहू आणि केतू हे प्रत्येक आठवड्याला प्रत्येक दिवशी राहू आणि केतू यांचा काळ हा वेगवेगळा असतो आणि या काळामध्ये केलेली कोणतीही पूजा आपली ही देवापर्यंत पोहोचत नाही. इष्टदेवता तिचा स्वीकार करत नाहीत. त्यामुळे राहू आणि केतू काळामध्ये तुम्ही पूजा करायची नाही.

तसेच राहू काळामध्ये अनोळखी ठिकाणी जाणे देखील टाकावे म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही नवीन जाणार आहात अशा ठिकाणी तुम्ही जाणे टाळावे. तसेच कोणतेही नवीन काम हे चालू करू नये. कारण हे काम कधीच यशस्वी होत नाही. त्या कामांमध्ये तुम्हाला अपयशच प्राप्त होणार आहे.

मित्रांनो राहू आणि केतू काळाचा प्रभाव हा पृथ्वीवरील प्रत्येक माणसांवर दिसून येत असतो. त्यामुळे राहू आणि केतू काळांमध्ये केलेली पूजा ही आपल्या देवते पर्यंत पोहोचत नाही.कारण राहू आणि केतू असे इच्छित असतात की त्यांच्या काळामध्ये त्यांची पूजा आणि त्यांची स्तुती करावी. जर राहू आणि केतू हे तुमच्यावर प्रसन्न झाले तर ते मात्र तुमची पूजा तुमच्या इष्ट देवतेचे पर्यंत पोहचवण्याचे काम करीत असतात.

त्यामुळे मित्रांनो राहू आणि केतू काळामध्ये इतर देवतांची पूजा करणे टाळावे. प्रथमतः तुम्हाला राहू आणि केतू यांना प्रसन्न करून घ्यावे लागेल. मित्रांनो जर तुमच्या जीवनामध्ये धनसंपत्तीचा अभाव होऊ नये, प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळावे, घरातील वाद-विवाद संपावेत असे वाटत असेल तर तुम्हाला राहू च्या काळामध्ये राहूचा मंत्र 108 वेळा बोलायच आहे. तसेच तुम्हाला केतूच्या काळामध्ये केतू मंत्राचा जप 108 वेळा करावा लागेल. जर मित्रांनो तुम्हाला राहू आणि केतू मंत्राचा जप करायचा नसेल तर तुम्ही या काळामध्ये श्री हनुमानाचा शक्तिशाली मंत्राचा जप देखील करू शकता.

हनुमानाच्या मंत्राचा जप केल्याने राहू आणि केतू हे प्रसन्न होतात आणि तुमच्या अडचणी देखील दूर करतात व तुमची पूजा हि इष्टदेवते पर्यंत पोहचवण्याचे काम करतात. तर मित्रांनो तुम्ही कुठेही, कधीही हनुमान च्या मंत्रांचा जप करू शकता. तुम्ही नोकरीच्या ठिकाणी करणार असाल तर तुम्ही मनातल्या मनात 108 वेळा या मंत्राचा जप करु शकता. जर तुम्ही सौम्य ओठ हलवून मंत्राचा जप करणार असाल तर त्या वेळेस मात्र तुम्हाला आपल्या पायातील चप्पल, बूट काढून या मंत्राचा जप करायचा आहे. तर मित्रांनो हा हनुमानाचा शक्तिशाली मंत्र कोणता आहे तो जाणून घेऊयात.

ओम नमो भगवते अंजनेयाय नमः

तर मित्रांनो हा हनुमानाचा मंत्र तुम्हाला राहू आणि केतू या काळामध्ये करायचा आहे. त्यामुळे राहू आणि केतू यांच्या प्रभावामुळे जो काही वाईट परिणाम आपल्या जीवनावर होणार आहे तो परिणाम पूर्णतः कमी होईल आणि आपली पूजा ही इष्ट देवतेचे पर्यंत पोहोचवली जाईल. त्यामुळे राहू आणि केतू काळामध्ये राहू आणि केतू यांना प्रथमतः प्रसन्न करून घ्यायला हवे. त्यासाठी या हनुमानाचा मंत्र जप 108 वेळा करायचा आहे. तर मित्रांनो अशी ही पुजा विधी आहे ज्या पूजेच्या वेळेनुसार राहू आणि केतू चा काळ आहे की नाही हे पाहूनच आपण पूजा करावी. जेणेकरून ही पूजा आपल्या इष्ट देवतेपाशी पोहोचली जाईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *