नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, खरोखरच जिथे स्वामी महाराजांची सेवा व परमपूज्य गुरुमाऊलींवर श्रद्धा असते तिथे नियतीलाही झुकावे लागते व काळही थांबतो याची प्रचिती म्हणून एक अनुभव तुमच्यासमोर मांडतो आहे.

मी एक दिवस ड्युटीवर जात असताना एक वृद्ध व्यक्ती मला रस्त्यात भेटले व त्यांनी सांगितले की बेटा तुझ्या पत्नीवर येता काही दिवसांमध्ये काळाचा घाला येणार आहे आणि त्यात तिच्या मृ’त्यू वाटला आहे पण तू घाबरू नकोस तू स्वामी महाराजांची सेवा करतोस फक्त या सहा दिवसांच्या आत तू तुझ्या पत्नीला दिंडोरीला गुरुमाऊलींकडे घेऊन जावं सोबत कोणालाही न नेता फक्त दोघांनीच जा काही झाले तरी स्वामी महाराजांवरील श्रद्धा आढळ ठेव.

मी तुला भेटलो हे सुद्धा यादरम्यान कोणाला सांगू नकोस! असे म्हणून ते व्यक्ती पुढे निघून गेले, त्यांनी मला त्यांचे नाव सुद्धा सांगितले नाही, पुढे गेल्यावर अचानक दिसेनासे झालेत, हा दिवस बुधवार होता आणि दुसऱ्या दिवशी गुरुवारी माझ्या पत्नीला गुरुवारी सेवा केंद्रातच श्वास घ्यायला खूप त्रास होऊ लागला, तेथील सेवेकर्यांनी तात्काळ नारळ उतारा वगैरे सेवा करून ताबडतोब दिंडोरी जावे असे सांगितले.

दुसऱ्या दिवशी आम्ही पती-पत्नी मुलगा येथे गेलो व तिथून दिंडोरीला जाण्यासाठी बसने निघालो. औरंगाबादला बस पोहोचल्यानंतर परत तिला श्वास घेण्यास त्रास जाणू लागला व बघता बघता तिचा श्वास बंद पडला, पण त्या वृद्ध व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे माझा ‘श्री स्वामी समर्थ’ मंत्र जप सुरूच होता.

बस पुढे जात होती, नाशिक येण्यापूर्वीच बसचा ड्रायव्हर कंडक्टरने मला तिला घेऊन खाली उतरावे लागेल कारण यांना आम्ही अशा अवस्थेत पुढे नेऊ शकत नाहीत असे सांगितले, तुम्ही यांना पहिले एखाद्या डॉक्टरांना दाखवा असं सांगितले व स्वतः त्यांनी ती बसच एका हॉस्पिटल जवळ आणली, तिथे आणल्यावर दोन ते तीन डॉक्टरांनी तिला तपासले व सांगितले की या महिन्याचा साधारणता: तीन तास पूर्वस मृ’त्यू झालेला आहे तुम्ही यांना घरी घेऊन जा!

“जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांच्या
नको घाबरु तू असे बाळ त्यांचा”

या उक्तीप्रमाणे मी न घाबरताना डगमगता तशाही परिस्थितीत पत्नीला घेऊन रिक्षाने दिंडोरी येथे जाण्यास निघालो, प्रवासात फक्त स्वामींचा जप तितका सुरू होता. रिक्षा दिंडोरी दरबाराच्या प्रवेशद्वारा जवळ जाऊन पोहोचली व त्या क्षणी माझी पत्नी ताडकन रिक्षात उठून बसली, प्रवेशद्वार ते मुख्य दरबारी के अंतर्गत स्वतः चालत गेली, समोरून परमपूज्य गुरुमाऊली आसनस्थ होते, घडलेला प्रकार आम्ही सांगितला नाही तरी परमपूज्य गुरुमाऊलींचा ऐका कृपा कटाक्षाने माझ्या पत्नीची प्रकृती बरी झाली.

आलो त्याच रिक्षाने परत नाशिकला यायला निघालो तर रिक्षा चालकांनी सांगितले की अशा बऱ्याच घटना येथे नेहमीच करतात कितीही आजारी असणारी लोक येथे येऊन अगदी बरे होतात माझी पत्नी तर मृ’त्यूच्या दारातून परत आली होती!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *