नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!मित्रांनो, हिरव्या मिरचीचे आपल्याला जेवणात खूप फायदे होत असतात. जेवण चव वाढवण्यापासून ते आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या हिरव्या मिरचीला ज्योतिषशास्त्रातही खूप महत्त्व असल्याचे सांगितले आहे. हिरव्या मिरचीचा उपयोग फक्त दृष्ट काढण्यासाठीच होतो, असे नाही. त्यापेक्षाही घरातील वास्तुदोषांमध्ये हिरव्या मिरचीचा वापर प्रभावी ठरतो. ज्योतिष शास्त्रामध्ये हिरव्या मिरचीचे अनेक उपाय सांगितले आहेत, ज्याचा वापर करून आपण आयुष्यात येणारे अनेक अडथळे दूर करू शकतो.

हिरव्या मिरचीच्या उपायांनी तुम्ही अनेक समस्यांपासून कशी सुटका मिळवू शकता, याविषयी ज्योतिषी आचार्य आणि हस्तरेखाशास्त्रज्ञ विनोद सोनी पोद्दार सांगत आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार, हिरवी मिरची बुध ग्रहाचे प्रतिक मानली जाते, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या जीवनातील अनेक अडचणी दूर करू शकता.

आर्थिक संकट दूर होईल – मित्रांनो, तुम्ही पैसे चांगले मिळवत असाल, पण तुमची बचत मात्र होत नसेल तर यासाठी 3 हिरव्या मिरच्या तुमच्या पाकिटामध्ये ठेवा. त्या सुकल्यावर नवीन 3 हिरव्या मिरच्या ठेवत राहा, असे केल्याने तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही.

दृष्ट काढण्यासाठी उपाय – मित्रांनो, ज्योतिष शास्त्रानुसार दृष्ट लागणे, हा मनुष्यावर एक प्रकारचा नकारात्मक प्रभाव असतो. त्यामुळे माणसाच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. ज्या व्यक्तीला दृष्ट लागली आहे, त्याची दृष्ट काढण्यासाठी 7 मिरच्या घ्या आणि त्या 7 वेळा वरून खाली आणि 7 वेळा खालून वरती उतरवा आणि त्यानंतर रस्त्याच्या कडेला फेकून द्या. यामुळे त्या व्यक्तीला लागलेली दृष्ट निघून जाईल.

नोकरीत येणाऱ्या अडचणी – मित्रांनो, जर तुम्हाला ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी अनेक समस्या येत असतील किंवा तुमचे सहकारी तुम्हाला त्रास देत असतील तर 7 हिरव्या मिरच्या तुमच्या डेस्कवर किंवा ड्रॉवरमध्ये ठेवा. या हिरव्या मिरच्या कुणालाही दिसू नये हे लक्षात ठेवा. लाभ मिळेल.

वास्तु दोष दूर करा – मित्रांनो, तुमच्या छोट्या-मोठ्या कामांमध्येही अडचणी येत असतील. पूर्ण झालेली कामे खराब होत असतील आणि तुमच्या घरातून कोणतीही मौल्यवान वस्तू चोरीला गेली किंवा हरवली असेल तर यासाठी हिरव्या मिरचीचा वापर केला जाऊ शकतो. सकाळी एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात हिरवी मिरची बुडवून ठेवा. रात्री बाहेर फेकून द्या. हा प्रयोग काही दिवस नियमित केल्यास तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *