नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!!मित्रांनो आपण आज अचानक धनप्राप्तीचा उपाय जाणून घेणार आहोत. अचानक धन प्राप्ती याचा अर्थ आपण कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता झालेला धन लाभ. अगदी कोणत्याही मार्गाने तुमच्या जीवनात मोठ्या प्रमाणात पैसा प्रवेश करेल. लॉटरी असेल, नोकरीत मिळणारे प्रमोशन असेल, बिझनेस मध्ये एखादी मोठी डिल होणार असेल, चांगल्या किंवा वाईट कोणत्याही मार्गाने पैसा येईल. मित्रांनो आजचा जो उपाय आहे हा उपाय लहान असेल, मोठा असेल, स्त्री असतील किंवा पुरुष असतील, तरुण किंवा म्हातारे असतील अगदी कोणीही हा उपाय करू शकतात. तुम्हाला जॉब नसेल, कोणतं काम नसेल, तुमच्या आयुष्यात पैसा येत नसेल, तर हा उपाय केल्याने तुम्हाला अचानक पैसा मिळू लागेल.

हा उपाय केल्याने पैसा मिळवण्याच्या वेगवेगळ्या संधी निर्माण होतील. हा उपाय करण्यासाठी अट एकच आहे ती म्हणजे हा उपाय अगदी गुप्त पणे करायचा आहे. कोणत्याही प्रकारची वाच्यता किंवा बाहेर कोणालाही या उपाया बद्दल सांगू नका. कारण हा सिद्ध आणि प्रभाव शाली असा धन प्राप्ती साठीचा तोटका आहे. हिंदू धर्म शास्त्रात हजारो वर्षापासून अनेक उपाय सांगितले गेले आहेत.

आजचा आपला हा उपाय नाथ संप्रदायात सुद्धा सांगितला आहे. मित्रांनो अनेक लोकांनी हा उपाय करून आपल्या धना मध्ये प्रचंड वाढ केलेली आहे. मित्रांनो आपण सुद्धा मनात श्रद्धा ठेवून हा उपाय करा. मनात कोणत्या शंका ठेऊन जर हा उपाय करायला लागलात तर याचा फायदा होणार नाही.

आजचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला शुक्रवारचा दिवस निवडायचा आहे. शुक्रवारी आपल्या घराजवळ कुठेही रुईचे झाड असेल. याच झाडाचा उपयोग करून आपण आज अचानक धन प्राप्ती कशी करायची हे पाहणार आहोत. मित्रांनो रुई 2 प्रकारची असते. लालसर फुले येणारी आणि पांढरी फुले येणारी रुई.

आपल्याला पांढऱ्या फुलांची रुई या उपायासाठी वापरायची आहे. रुईचे झाड हे तंत्र मंत्र शास्त्रात अत्यंत महत्वाचे आहे. या झाडाच्या उपयोगाने अनेकांनी अनेकदा धन प्राप्ती केलेली आहे. मित्रांनो या रुईच्या झाडामध्ये अनेक देवी देवता वास करतात अशी मान्यता आहे. मित्रांनो असं सुद्धा मानलं गेलं आहे की काही विशिष्ट वर्षानंतर या रुईच्या झाडाच्या मुळांमध्ये श्री गणेशाची प्रतिमा बनते.

शुक्रवारी सकाळी किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर या रुईच्या झाडाजवळ आपल्याला जायचं आहे. जाताना आपल्या देवघरात आपण जो तांब्या वापरता त्या तांब्यातून एक तांब्या भर जल आपण घेऊन जायचं आहे. सोबत अगरबत्ती आणि हळदी कुंकू सुद्धा घेऊन जायचं आहे. मित्रांनो हा झाडाची आपण एखाद्या देवी देवते सारखी मनोभावे पूजा करावी. त्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची आहे.

प्रार्थना अशी करावी की हे कुबेर देवा आम्ही उद्या सकाळी शनिवारी तुम्हाला आमच्या घरी घेऊन जाण्यासाठी येणार आहोत. कृपया आमच्या बरोबर या आणि आमचं घर धन, ऐश्वर्य, संपत्ती ने भरून टाका. अशी प्रार्थना करून आपण घरी यायचं आहे. ही प्रार्थना करताना आपलं मुख हे उत्तर दिशेला असेल याची काळजी घ्या.

कारण उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर यांची दिशा आहे. घरी परत येताना मागे वळून पाहू नका. पुढच्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी उठून स्वच्छ स्नान करून, कपडे परिधान करून आपल्या देवघरात येऊन पूजा करून आपण आज जे कार्य करणार आहोत ते बोलून दाखवावे व प्रार्थना करावी. मित्रांनो प्रार्थना करून आपण पुन्हा एकदा रुईच्या झाडाकडे जायचं आहे आणि हात जोडून प्रार्थना करायची आहे.

आपण आदल्या दिवशी जी प्रार्थना केली होती तीच प्रार्थना पुन्हा एकदा करावी. प्रार्थना करून झाल्यानंतर हे रुईचे झाड मुळापासून उपटावे. त्यानंतर या झाडाचे मूळ काढून घ्यावे. हे मूळ काढून घेऊन आपल्या घरी यावं. घरी येताना मागे वळून पाहू नये. घरी आल्यानंतर हे मूळ साफ करावं. त्यावर गंगाजल शिंपडावे. गंगाजल नसेल तर साधे पाणी सुद्धा चालेल.

त्यानंतर एखाद्या लाल रंगाच्या कपड्यात हे मूळ गुंडाळून घ्या. हे लाल कपड्यात बांधलेले मूळ आपण आपल्या घरात पैसे, धन, सोने वगैरे जिथे ठेवता तिथे हे मूळ आपल्याला ठेवायचं आहे. हे मूळ मां’ साहार, व्य’स नी वस्तू, कातडी वस्तू यांपासून दूर ठेवावं. प्रत्येक शुक्रवारी याची मनोभावे पूजा करा. हा उपाय केल्याने काही दिवसातच तुमच्या जीवनात प्रचंड मोठ्या प्रमाणात धन प्राप्तीचे योग्य येतील. पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय करा याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.!!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *