नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!तुम्ही चमच्याने जेवता की हाताने??. तसेच दोन्हीपैकी योग्य पध्दत कोणती??. चमच्याने जेवल्याने काय नुकसान होतं आणि हाताने जेवल्याने काय फायदा होतो??. सगळ्या विषयांवर आज आम्ही माहिती सांगणार आहोत. आपल्यावर पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा इतका घट्ट होत चालला आहे की, आपण आपली संस्कृती आणि आपल्या सवयी विसरून इतरांच्या सवयीचा अंगीकार करू लागलो आहोत, आपल्या अशा अनेक सवयी आहेत ज्या आपण नकळत बदलू लागलो आहोत.

परंतु तुम्हाला माहिती आहे का, की स्वतःच्या हाताने जेवणाला खास महत्त्व आहे आणि त्यामुळे आपल्या शरीरातील पंचतत्व संतुलित राहतात. वेदानुसार हाताचे प्रत्येक बोट हे पाच तत्वांचा विस्तार आहे, त्यामध्ये अंगठा हा अंतराळाचे प्रतिनिधित्व करतो आणि तर्जनी हवेचे प्रतिनिधित्व करते, मधले बोट अग्नीचे प्रतिनिधित्व करते, अनामिका पृथ्वीचे प्रतिनिधित्व करते आणि सर्वात लहान बोट पाण्याचे प्रतिनिधित्व करते आणि म्हणूनच तज्ञांच्या मते, खाल्ल्याने खल्याने या 5 तत्वांना चालना मिळते.

आणि पचनक्रिया सुधारते. त्यामुळे अन्न खाण्यापूर्वी आणि नंतरही हात स्वच्छ धुतले पाहिजेत हे तर आपल्याला माहितीच आहे. हाताने खाल्ल्याने शरीरातील 5 तत्त्वांचे संतुलन बरोबर राहते, त्यामुळे हातांचा हे व्यायाम होतो. हाताने जेवण करून तुम्ही अनेक आजारांपासून दूर होऊ शकता. इतकच नाही तर यामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो.

तसेच हातानें अन्न खाल्याने हात, तोंड, पोट, आतडे आणि मेंदू यांच्यामध्ये संबंध निर्माण होतो, ज्यामुळे तुमच्या आरोग्याला फायदा होतो. संशोधकांच्या मते हाताने खाल्ल्याने पोट चांगले भरते, तसेच वजन कमी करण्यासाठी मदत होते. शरीर निरोगी राहते, हाताने खाण्याचा आणखी एक फायदा असा आहे त्यामुळे तोंड भाजत नाही.

कारण अन्नाला स्पर्श केल्यावर अन्न किती गरम आहे याची कल्पना आपल्याला येते. हाताने अन्न खाताना बोट आणि अंगठाच्या जोडणीमुळे तयार होणारी मुद्रा शरीरात विशेष ऊर्जा निर्माण करते, त्यामुळे शरीरही निरोगी राहते. मग तुम्ही कशाने जेवता हाताने की चमच्याने?

हाताने जेवणे ही आपली भारतीय संस्कृती. पण आपल्याकडे इंग्रजांचे राज्य आले आणि त्यांनी असे काही केले की आपल्यालाच आपल्या संस्कृतीचा लाज वाटू लागली. दीडशे वर्ष राज्य केलेल्या इंग्रजांचा आपल्या वरील प्रभाव इतका कायम आहे की आपल्याला अजूनही आपण त्यांची संस्कृती फॉलो करतो.

सहसा आपण हॉटेलमध्ये गेल्यावर हातांऐवजी चमच्याने खाणे पसंत करतो. बऱ्याचदा हॉटेलमध्ये हाताने खाण्याची लाज देखील वाटते. हॉटेल व्यतिरीक्त अनेक ठिकाणीही तुम्ही चमचा, काट्याने जेवण करत असाल. पण हे आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे असते. हाताने जेवताना आपले सारे लक्ष इतर कुठेही न जाता केवळ खाण्यावर केंद्रित होते.

तुम्हाला माहित आहेत का हाताने जेवण्याचे इतरही फायदे ? चला तर मग जाणून घेऊयात हातांनी जेवण करण्याचे फायदे –

जाड होण्यापासून बचाव होतो
हातांनी जेवल्यास कमी जेवणात लवकर पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे जाड होण्यापासून बचाव होतो.

चांगले पचन होते
हातांना असणारा गुड बॅक्टरीया पोटात गेल्यास पचनासाठी मदत करतो. त्यामुळे अन्नाचे पचन चांगले होते.

जेवणाला जास्त चव येते
हातांनी जेवल्यास तोंडातील लाळ आणि स्वाद ग्रंथी चांगल्या प्रकारे कार्यरत होतात. त्यामुळे जेवणाला चांगली चव येते.

अति आहार घेण्यापासून बचाव होतो
हातांच्या संपर्कात आल्याने अन्नाच्या बाबतीत मेंदूला सूचना मिळत राहतात. यामुळे अति आहारापासून बचाव होतो.

मल्टीटास्किंग पासून बचाव होतो
चमचा किंवा इतर कटलरीने जेवण लवकर होते, त्यामुळे शरीरातील साखरेचा समतोल बिघडतो. हातांनी जेवल्यामुळे मधुमेहापासून बचाव होतो.

पंचतत्वांशी जोडणी होते
आयुर्वेदानुसार पाच बोटे पंचतत्वांचे प्रतीक असतात. त्यामुळे हातांनी जेवल्याने आपण पंचतत्वांशी जोडले जातो.

जेवणावर लक्ष केंद्रित राहते
हातांच्या स्पर्शामुळे मेंदूद्वारे पोट आणि तोंडाला समजते की अन्न त्यांच्यापर्यंत येत आहे. यामुळे पाचक रस कार्यरत होतो.

प्रतिकारशक्ती वाढते
हातांना असणारा गुड बॅक्टरीया पोटात गेल्यामुळे शरीराची रोगांविरोधात लढण्याची क्षमता वाढते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *