नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!सध्या सगळीकडे हनुमान चालीसा विषयी चर्चा चालू आहे. तसे पाहिल्यास श्री हनुमान चालीसा चे महत्व खूप कमी लोकांना माहित आहे. हनुमान चालीसा ची रचना ही संत तुलसीदासांनी केली आहे. जे व्यक्ती हनुमान चालीसाचे पठण रोज करतात त्या व्यक्तीला कोणताही त्रास होत नाही. या कलियुगाचा अंत होईपर्यंत हनुमान या पृथ्वीतलावर असणार आहे असा आशीर्वाद प्रभू श्रीरामाने त्यांना दिला आहे. ते चिरंजीव आहेत. त्यांचं अस्तित्व बऱ्याच व्यक्तींना जाणवत आल आहे.

चला हनुमान चालीसा बद्दल आणखी सविस्तर जाणून घेऊ… आपण आधी कधीही न गेलेल्या एखाद्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी आपल्याला भीती वाटत असेल, किंवा आपल्याला कोणाची तरी जास्त भीती वाटते किंवा कुठल्यातरी गोष्टीचा आपल्याला त्रास होत असेल अस जर तुम्हाला वाटत असेल तर लगेच हनुमान चालीसा म्हणा. वाईट गोष्टींपासून रक्षण करण्यासाठी श्री हनुमान आपल्या मदतीला येत असते. काही व्यक्तींना बऱ्याच वेळेस रात्री झोपताना वाईट गोष्टींचा विचार मनात येतात वाईट स्वप्न पडतात, स्वप्नात ओरडून उठतात, रडतात, अशा व्यक्तींनी हनुमान चालीसा चा पाठ अवश्य करावा.

श्री हनुमान यांनी शनिदेवाचे रक्षण केले होते अशी कथा पुराणात दिसून येते त्यामुळे शनिदेव यांनी त्यांना वचन दिले होते की जो व्यक्ती हनुमानाची सेवा आराधना करेल त्या व्यक्तीला साडेसातीचा त्रास कधीच होणार नाही. एखाद्याने जर रोज हनुमान चालीसाचे पठण केले तर त्याच्या पत्रिकेतले दोष अर्थात राहु शनी दोष आहे असे दोष नाहीसे होतात आणि आनंदाचे दिवस त्याच्या आयुष्यात येतात. दुःख निघून जाते. जो व्यक्ती रोज हनुमान चालीसा वाचत आला आहे, अशांच्या कुंडलीत समस्या राहु शकत नाही तर कुठलेही रोग होण्याचे योग असतील तर तेसुद्धा नाहीसे होतात.

आपल्या अंतर्मनाची ताकद बुद्धी यांची वाढ होण्यासाठी सुद्धा हनुमान चालीसा उपयुक्त आहे. तसेच आपल्या मधील सकारात्मक शक्ती वाढविण्यासाठी, बळ मिळण्यासाठी तुम्हाला कधी कधी असं वाटतं की मी कुठेतरी कमी पडतोय मला दुर्बल वाटतंय, तर अशावेळी हनुमान चालीसा हा रामबाण उपाय आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या कर्तव्याची जाणीव होतेच. शिवाय आपले रोजचे काम करण्यासाठी आपल्याला शक्तीची आवश्यकता असते. कोणत्याही कामास होते पूर्ण करण्यासाठी चित्त महत्त्वाच असते आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला हनुमान चालीसा प्रदान करते.

विद्यार्थी दशेतील मुलांनी जर हनुमान चालीसाचे पठण केले तर त्यांची स्मरणशक्ती वाढायला मदत होते. त्याचबरोबर जय हनुमान चालीसा का पाठ करतात त्यांनी हाती घेतलेल्या प्रत्येक कामात त्यांना यश मिळत. तुम्हाला कितीही उदास वाटत असूया हनुमान चालीसा पठण सुरू करा तुम्हाला लगेच त्याचा परिणाम जाणवेल. सध्याच जीवन खूप ताण तणावाच आहे, कामाचं टेन्शन प्रत्येकाला असतं तसंच विविध ठिकाणी प्रवास करावा लागतो त्यामुळे मन एकाग्र होत नाही. जर आपण रोज हनुमान चालीसाचे पठण केलं तर ताण तणाव कमी होतो मन मजबूत होत, आणि रात्री शांत झोप लागते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *