नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो अनेक लोकांवर आयुष्यात खूप संकटे येतात, घरी पैसा नसतो, अशांती सगळीकडे पसरलेली असते, मात्र जर तुम्हाला तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा पाहिजे असेल तर तीन शुक्रवार हा उपाय करा, तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. मित्रांनो आपल्या सगळ्या देव देवतांमध्ये माता लक्ष्मीचे एक वेगळेच स्थान आहे. माता लक्ष्मीला धनाची देवता म्हणले जाते.

मित्रांनो ज्या माणसावर माता लक्ष्मीची कृपा बरसते तो माणूस कोणत्याच गोष्टींमधे अपयशी ठरत नाही. हातात पैसा असेल तर कोणतेही काम अडत नाही. प्रत्येक देवतेचे आपल्या आयुष्यात वेगळे स्थान आहे, माता लक्ष्मीची जर आपल्यावर कृपा असेल तर आपल्याला, धन, धान्य, समृद्धी, प्रतिष्ठा सर्व काही लाभत. मात्र आपल्याला जर माता लक्ष्मीची कृपा हवी असेल तर आधी आपल्याला भगवान श्री विष्णू यांना प्रसन्न करावे लागेल.

मित्रांनो आज आम्ही तुम्हाला जो उपाय सांगणार आहोत तो तुम्हाला पूर्ण श्रध्देने करायचा आहे. जर हा उपाय तुम्ही मनापासून केला तर तुमचे दिवस क्षणात बदलून जातील. दुःखाचे डोंगर दूर होऊन सुखाची सकाळ येईल. व्यापार व्यवसायात यश प्राप्त होईल. चला तर मग जाणून घेऊया काय आहे हा उपाय-

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मनात श्रद्धा ठेवावी लागणार आहे तसेच हा उपाय तुम्हाला सकाळी उठून करायचा आहे. मित्रांनो हा उपाय तुम्ही कोणत्याही महिन्याच्या सकाळी उठून करू शकता, यासाठी तुम्हाला ब्रह्म मुहूर्तावर उठणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे. हे स्नान तुम्ही तुमच्या घराशेजारी कुंड किंवा नदी असेल तिथे जाऊन करू शकता. अथवा तुम्ही घरी देखील स्नान करू शकता.

मित्रांनो यानंतर देवी लक्ष्मी समोर बसून तिची पूजा करायची आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे, देवीला प्रसन्न करायचे आहे आणि त्यांनतर ओम श्री श्रिये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. हा उपाय तुम्हाला सकाळी 8 वाजेच्या आधी करायचा आहे. या नंतर तुम्ही तुमच्या दैनंदिन कामाला सुरुवात करू शकता.

मित्रांनो शुक्रवारी सकाळी उठून स्नान करून पिवळ्या रंगाचे स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. तसेच मित्रांनो वरील मंत्राचा जप करताना नेहमी तुम्ही तुमच्या उजव्या हातात चांदीची अंगठी परिधान करावी. आणि त्या नंतर माता लक्ष्मीला शिऱ्याचा प्रसाद अर्पण करावा. सोबतच एखाद्या गरजू व्यक्तीला थोडे गहू तांदूळ दान करावे. हा उपाय जर तुम्ही तीन शुक्रवारी केला तर नक्कीच तुम्हाला याचा लाभ होईल.!!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *