नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!मित्रांनो, आपण खुप श्रीमंत व आनंदी असावे असे सर्वांनाच वाटते आणि त्यासाठी सर्वांची धडपड चाललेली असते. त्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो परंतु कधीकधी असे होते कि काही केल्या कामात यश मिळत नाही. कोणतेही कार्य हातात घेतले तर ते पूर्णत्वास जात नाही.

प्रत्येक कामात काही ना काही अडथळे येत राहतात. कामात मन लागत नाही आपण कष्ट भरपूर पडतो परंतु कष्टाच्या मानाने तसे उत्पन्न मिळत नाही. त्याचे फळ मिळत नाही नोकरी व्यवसाय व्यवस्थित चालत नाही मनाप्रमाणे नोकरी मिळत नाही व्यवसाय असेल तर तो ठप्प होतो. विद्यार्थी असतील तर त्यांचे मन अभ्यासात मन लागत नाही.

कोणाला कर्ज दिलेले असेल आणि ती व्यक्ती पैसे देण्यास परत देण्यास टाळाटाळ करीत असेल खूप प्रयत्न करून बघितले असतील, परंतु त्यातून मार्ग निघत नसेल तर या सर्व अडचणी व समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आपण खूप सुंदर व साधा सोपा परंतु चांगला प्रभाव दाखवणारा असा एक उपाय बघणार आहोत. यासाठी आपल्याला फक्त तीन वस्तूंची आवश्यकता असणार आहे.

हा उपाय केल्याने त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळेल परंतु एका वेळी एकच इच्छा सांगून हा उपाय करायचा आहे. काहीना नोकरीच्या समस्या असतील, व्यवसायातील समस्या असतील, घरामध्ये कटकटी त्रास होत असेल किंवा आपली इच्छा पूर्ण होत नसेल त्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे.

जर एकाच वेळी अनेक इच्छा मनात ठेवून आपण हा उपाय केला, तर कोणत्याही इच्छाचे संपूर्ण समाधान आपल्याला मिळणार नाही एक इच्छा पूर्ण झाली हे दुसरीच्या किंवा अडचणीसाठी हा उपाय पुन्हा करावा.चला जाणून घेऊया तो काय कोणता आहे.

मित्रांनो, यासाठी आपल्याला एक बेलाचे पान घ्यायचे आहे आणि लाल चंदन घ्यायचे आहे लाल चंदन घेऊन ते उगाळून घ्यायचे आणि बेलाचा पानाची जी तीन पाने असतात. त्यातील मधले पान सोडून खाली जी दोन पाने असतात. त्या दोन पानांना हे लाल चंदन संपूर्ण लावून घ्यायचे आहे. संपूर्ण पाने चंदनाने झाकली गेली पाहिजेत.

दोन पांनाना लालचंदन लावल्यानंतर म्हणजेच मधल्या पानाला गाईचे शुद्ध तूप लावून घ्यायचे आहे. संपूर्ण पणाला लावून घ्यायचे आहे लक्षात ठेवावे. हे तुप गाईचेच असावे अशा प्रकारे हे पान तयार केल्यानंतर महादेवाच्या मंदिरात जावे आणि महादेवांच्या शिवलिंगावर आपण पाणी अर्पण केल्यानंतर ते ज्या ठिकाणाहून वाहत खाली जाते ती खोलगट पन्हाळी केलेली असते. त्या ठिकाणाला देवा आधीदेव महादेव यांची लहान कन्या अशोक सुंदरी हीचे स्थान म्हंटले जाते.

ते पान शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या स्थानावर अर्पण करायचे आहे आणि आपली जी काही इच्छा असेल ती भगवंतांना सांगायचे आहे आणि ती मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवंतांकडे प्रार्थना करायचे आहे. हा उपाय सोमवारी किंवा प्रदोषच्या दिवशी करायचा आहे. दोन सोमवारी किंवा प्रदोष मध्ये आपली इच्छा पूर्ण झालेली दिसेल. तर मित्रांनो खूपच साधा सोपा परंतु प्रभावी असा आहे.जरूर करून पहा. याचा फायदा तुम्हाला नक्की होईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *