नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!तुम्ही तुमच्या घरात किंवा दुकानात हत्ती ची मूर्ती ठेवली आहे का? किंवा अशी मूर्ती ठेवण्या चा तुमचा विचार आहे का? मग हि पोस्ट शेवट्पर्यंत नक्की वाचा ती तुमच्या साठीच आहे. या पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत की घरात किंवा व्यवसाया च्या ठिकाणी हत्ती ची मूर्ती ठेवणे नक्की लाभ काय होतो? चला तर मग सुरुवात करुया.

मित्रांनो, तुम्ही बर् याच घरांमध्ये हत्ती ची मूर्ती ठेवले ली पाहिला असेल. अगदी दुकानां मध्ये सुद्धा पाहिली असेल पण मग लोक ही हत्ती ची मूर्ती घरा मध्ये का ठेवतात? आणि त्या नी नक्की लाभ काय होतो? हत्ती सर्वात जास्त वर्ष जगतो म्हणून हत्तीला दिर्घ आयुष्याचं प्रतीक मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने अनेक लाभ होता.

घर असो, दुकान असो, फॅक्टरी असो, ऑफिस असो, प्रत्येक ठिकाणी हाती ठेवणं हे तितकच लाभदायक मानलं जातं. दुकानात हत्ती ठेवताना किंवा घरा सुद्धा ती ठेवताना तो नेहमी वर ती सोंड केलेला असावा. अर्थात ज्या हत्तीची सोंड वरच्या दिशेला आहे असा हत्ती घरात किंवा दुकानात ठेवावा. त्याचे सकारात्मक परिणाम मिळतात.

धर्मग्रंथानुसार चांदीचा भरीव हत्ती बनवून घरात ठेवल्याने घरातील वाईट ग्रहांचा प्रभाव निघून जातो आणि त्याचे चांगले परिणाम मिळतात. घराच्या दारावर वरती वर सोंड केलेला हत्ती आपल्या घरात प्रेम आणि आनंदी वातावरण निर्माण होतो.

घरात जर सतत वादविवाद भांडणे होत असतील तर घरातील वाद विवाद. आणि भांडण तंटे मिटवण्यासाठी तीन हत्ती घरात पूर्व दिशेला ठेवावे. हे तीन हत्ती घरात अशा ठिकाणी ठेवावे की सर्वात मोठा हत्ती पुढे आणि सर्वात छोटा ती मागे असावा असा उतर त्या क्रमाने ठेवावे. बेडरूम मध्ये पांढरा हत्तीची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे पती पत्नी मधील प्रेम वाढते.

माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी आणि पैशांची आवक आपल्या घरामध्ये वाढावी यासाठी चांदीचा एक भरीव हत्ती आपल्या घराच्या तिजोरीत सुध्दा तुम्ही ठेवू शकता. त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्या वर बसते.

आपली आर्थिक परिस्थिती सुधारते अशा प्रकारचा हत्ती तुम्ही ऑफिसच्या टेबल वरती सुद्धा ठेवू शकता. त्यामुळे तुमची निर्णय क्षमता सुद्धा वाढते. चांदीचा हत्ती बनवणे आपल्याला शक्य नसेल तर तुम्ही संगमरवराचा छोटा हत्ती सुद्धा घेऊ शकता आणि तोसुद्धा ऑफिस मध्ये ठेवू शकता. आपल्या हॉल मध्ये हत्तीची मूर्ती ठेवल्याने शांतता राहते.

त्याचबरोबर आपल्याला यश आणि प्रगती ही मिळते. जर तुम्हाला राहू दोष याचा त्रास असेल तर तुम्ही पाकिटात किंवा खिशात हत्तीचा फोटो सुद्धा ठेवू शकता. यामुळे आपल्याला राहू दोषापासून मुक्ती मिळते. तसंच आपल्या उद्योगधंद्यात ही प्रगती होते.

हत्ती हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. वेगवेगळ्या धातूचा सुद्धा असू शकतो. बर्याचदा तुम्हाला गिफ्ट म्हणून ही हत्ती मिळाला असेल तर तो सुद्धा तुम्ही तुमच्या हॉल मध्ये ठेवू शकता किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेऊ शकता.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *