नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!मित्रांनो, आपण सगळेजण आज आपल्या कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी, पैसा उपलब्ध करण्यासाठी दिवस-रात्र काबाडकष्ट करीत असतो. परंतु कितीही काबाडकष्ट करून मिळवलेला पैसा आपल्या घरातील कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी अपुरा पडत असतो म्हणजेच आलेला पैसा टिकत नाही. तो कोणत्या ना कोणत्या कारणाने खर्च होऊन जातो. त्यामुळे आलेला पैसा कमी पडत राहिल्याने आपण निराश होतो. मित्रांनो आलेला पैसा टिकून राहण्यासाठी भाग्याची देखील साथ असणे गरजेचे असते.

जसा पैसा उपलब्ध होतो तशा गरजादेखील वाढतच राहतात आणि या गरजा भागवताना पैसा कमी पडत राहतो. मित्रांनो आज मी तुम्हाला आलेला पैसा टिकून राहण्यासाठी एक प्रभावी उपाय सांगणार आहे. जो केल्याने तुमच्या घरात पैशाची कमतरता कधीच भासणार नाही घरात आलेला पैसा टिकून राहील.

मित्रांनो, पैसा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न देखील करावेच लागतील. फक्त आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये कायम टिकून राहण्यासाठी हा उपाय खूपच फायदेशीर ठरतो. आपल्याकडे भरपूर पैसा येतो परंतु अशी काही स्थिती उद्भवते ज्यामुळे आपला हा सर्व पैसा खर्च होऊन जातो. काही काही वेळेस अशी परिस्थिती जाणवते ज्यामुळे आपण बचत केलेले पैसे देखील आपणास खर्च करावे लागतात. त्यामुळे आपली तिजोरी रिकामी होते. आपल्या घरात लक्ष्मी राहत नाही. जर मित्रांनो तुमच्याही बाबतीत असे घडत असेल तर तुम्हाला लक्ष्मी आपल्या घरात कायम स्थिर रहावी, पैशाची कमतरता कधीच भासू नये असे वाटत असेल तसेच आपली तिजोरी कधीही रिकामी राहू नये असे वाटत असेल तर हा उपाय नक्की करून पहा.

मित्रांनो तुम्हाला या उपायासाठी एक लाल रंगाचे कापड लागणार आहे. हे लाल रंगाचे कापड तुम्हाला तुमच्या तिजोरीच्या कपाटामध्ये अंथरायचे आहे आणि या लाल कापडावर तुमचे जे काही दागदागिने असतील तसेच घरातील पैसा असेल तो पैसा तुम्हाला या कापडावरती ठेवायचा आहे. म्हणजेच तुमचा जो काही येणारा पगार वगैरे असेल तो सर्व तुम्हाला या लाल कापडावर ठेवायचा आहे. जेणेकरून तुमचा सर्व पैसा खर्च होणार नाही.

तुमच्या घरात लक्ष्मी वास्तव्य करेल व तुमच्या घरामध्ये पैशाची कमतरता कधीही भासणार नाही. तुम्हाला पैसा अपुरा पडणार नाही. माता लक्ष्मीला लाल रंग खूपच प्रिय आहे. या लाल रंगाकडे लक्ष्मी आकर्षित होत असते. त्यामुळे तुम्हाला लाल रंगाचे कापड अंथरायचे आहे. ज्यामुळे आपल्या खर्चाला आळा बसेल. लक्ष्मी निघून कधीच जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला लाल रंगाचे कापड तिजोरीच्या कपाटांमध्ये अंथरूनच जो काही पैसा असेल, मौल्यवान वस्तू, धनसंपत्ती, दागदागिने असतील ते सर्व ठेवायचे आहेत. तर मित्रांनो तुम्हाला पैशाच्या बाबतीत ज्या काही समस्या असतील तर त्या सर्व समस्या या उपायामुळे दूर होऊन जातील. घरात पैशामुळे कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. लक्ष्मीचे कायम वास्तव्य आपल्या घरात राहील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *