नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे.. मित्रांनो, आपल्यातील प्रत्येक जण आपले घर बांधण्यासाठी असतो प्रत्येकाला आपले स्वतःचे घर व्हावे असे वाटत असते आणि घर बांधण्यासाठी तो वेगळी शक्कल लढवत असतो आणि आपले घर दरवाजा व उंबरठा यांचा विशेष आपण नियोजन करत असतो त्याची रूपरेषा कसे असेल त्याचे सौंदर्य कसे असेल याबद्दल अनेक अंदाज वर्तवत करत असतो आणि आपण ज्या ठिकाणी जास्त काळ वावरतो, जास्त काळ व्यतीत करत असतो अशी आपली वास्तु या वास्तूचा परिणाम आपल्यावर अनेकदा होत असतो.

मित्रांनो आपल्या घरातील वास्तुची दशा व दिशा यामुळे आपली परिस्थिती अवलंबून असते. छोट्या छोट्या गोष्टी व व काही चुका यामुळे आपल्या जीवनावर त्याचा परिणाम जाणवू लागतो म्हणूनच त्या चूका आपल्याला करायला नाही पाहिजेत. आजच्या लेखामध्ये आपण अशीच काही महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.मित्रांनो घराबाहेरील वास्तू दोष ही माणसासाठी तितकेच शारीरिक, मानसिक आणि आर्थिक हानी पोहोचणारे असतात, जितका घरातील वास्तू दोष असतो. वास्तू दोष घरात असेल तर उपाय तरी केले जातात, मात्र बाहेरचे वास्तू दोष कोण-कोणते असतात याची साधी माहितीय आपल्याला नसते.

घराबाहेर असलेल्या वास्तू दोषाबद्दलची माहिती असणं फार आवश्यक आहे. म्हणून जर आपण घर घेत असाल किंवा स्वत:चं नवं घर बांधून घेत असाल तर काही बाबींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर आपल्या घरातील शांतता भंग पावू शकते.घराच्या मुख्य दरवाज्यासमोरून किंवा घरासमोरून कोणताही सरळ रस्ता जात नसेल, तर तसं घर मालकासाठी अशुभ ठरतं. घराच्या प्रवेशदारासमोर एखादा खड्डा, तलाव किंवा कोणतीही खोल जमीन असू नये, असं असल्यास घरासाठी ते अशुभ संकेत देतात. घराच्या प्रवेशदाराजवळ कोणताही नाला किंवा नाली असू नये. असं असेल तर त्यामुळं धनसंपत्तीची हानी होऊ शकते असा संकेत समजावा.

घरासमोर विहीर असणं म्हणजे घरात आजारांना निमंत्रण देणं होय. घरासमोर किंवा घराच्या प्रवेशद्वारासमोर कोणताही खंबा असू नये. असं झालं तर तो घरातील महिलेला सतत आजारी पाडतो. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वार किंवा घरासमोर मंदिर पाहून आपल्याला खूप आनंद होत असेल. मात्र हे वास्तूच्या हिशोबानं चांगलं नसतं. घरासमोर मंदिर असेल तर आपल्या घरावर संकट आणि समस्या निर्माण करतं. घराच्या मुख्य दरवाज्यासमोर पायऱ्या असू नये. हे वास्तू दोषाचं एक मोठं कारण मानलं जातं. म्हणून घरासमोर पायऱ्या बांधू नये किंवा विकत घेतांना तसं घर घेऊ नये. घराच्या मुख्य दरवाज्याच्या अगदी वर दुसरा दरवाजा असू नये, यामुळं आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. आणि मित्रांनो घरावर म्हणजे घराच्या छतावर कधीही कोणत्याही झाडाची सावली पडणं वास्तूच्या हिशोबानं चांगलं नाही. घराचा मुख्य दरवाजा किंवा घरासमोर कोणतंही झाड असू नये, कारण असं असल्यास आपल्या विकासावर परिणाम होतो. तसंच घरासमोर झाड असल्यानं बाल दोष पण उत्पन्न होतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *