नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अनेक नियम, अनेक उपाय सांगितलेले आहेत. घरातील वातावरण कायम आनंदी ठेवण्यासाठी देखील काही उपाय सांगितलेले असतात. वास्तुशास्त्रामध्ये दिशांचे तसेच घरातील वस्तूंचे कोणते स्थान असावे? त्यांची दिशा कोणती असावी? याविषयी ची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. वास्तुशास्त्राला खुपच महत्व आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणींवर उपाय वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. मित्रांनो घरातील मुख्य दरवाजा याला वास्तुशास्त्रामध्ये खूपच महत्त्वाचे स्थान आहे.

मित्रांनो अनेकांना आपल्या जीवनात पैशाची कमतरता भासत असते किंवा येणारा पैसा अपुरा पडत असतील किंवा शत्रुपीडा असेल किंवा आपली मुले ही एखाद्या व्यसनाच्या आहारी गेलेले असतील तर त्यासाठीचा एक प्रभावी उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे. हा उपाय केल्याने तुमच्या या प्रकारच्या अडचणी दूर होऊन जातील. मित्रांनो घरातील मुख्य दरवाजा म्हणजेच या दरवाज्यावर आपल्या पीत्रांचे अस्तित्व असते. हे पित्र अमावस्या तिथीला येतात आणि आपली कोण आठवण काढत आहेत का हे पाहत असतात.

घरातील मुख्य दरवाजातूनच सकारात्मक ऊर्जा प्रवेश करीत असते. तसेच या मुख्य दरवाज्यावर कुलदेवता व कुलदेवतेचे वास्तव्य असते. आज मी तुम्हाला एक असा नंबर सांगणार आहे हा नंबर कोणीही जर तुमच्या मुख्य दरवाज्यावर लिहिला तर तुमच्या जीवनात पैसा कधीच कमी पडणार नाही.

मित्रांनो हा उपाय प्रभावी करण्यासाठी आपल्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक असणे गरजेचे आहे. हे स्वस्तिक जर उलटे असेल तर त्या घरांमध्ये वादविवाद, भांडणे सुरू होतात. मित्रांनो घरांमध्ये तुम्हाला जर शत्रुपीडा असेल तर अशा लोकांनी आपल्या मुख्य दरवाज्यावर अष्टगंधाने स्वस्तिक काढावे. जर तुम्हाला घरात गरिबी जाणवत असेल म्हणजेच पैसा अपुरा पडत असेल तर तुम्ही हळदीने हे स्वस्तिक काढावे तसेच जर तुम्हाला घरामध्ये सुख शांती, समाधान, समृद्धी प्राप्त करायची असेल तर कुंकू आणि चंदन यांच्या मिश्रणाने स्वस्तिक काढावे. या स्वस्तिक च्या दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषा काढायचे अजिबात विसरू नका.

आता मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढल्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाज्याच्या आतल्या बाजूने भाग्यांक तुमचा लिहायचा आहे. हा भाग्यांक तुम्ही जर शत्रुपीडा असेल तर अष्टगंध आणि गरिबी असेल तर हळदीच्या सहाय्याने तसेच एखादी इच्छा किंवा सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात असे वाटत असेल तर कुंकू आणि चंदन याने तुम्हाला आपला भाग्यांक लिहायचा आहे. आता भाग्यांक म्हणजे काय?तर तुमची पूर्ण जन्मतारीख म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर 23 डिसेंबर 1991 म्हणजेच 23 डिसेंबर म्हणजेच 12 आणि 1991 या सर्व अंकाची म्हणजेच 23 12 1991 याची बेरीज करून घ्यायचे आहे.2+3+1+2+1+9+9+1=28

जर समजा तुमच्या बेरीज 28 आली तर आठ आणि दोन यांची परत बेरीज करायची बेरीज केल्यानंतर 10 येते तर परत तुम्हाला 10 ची बेरीज करायची म्हणजेच 1+0=1 म्हणजेच 1 हा तुमचा भाग्यांक असेल. तर हा भाग्यांक घरातील कर्त्या व्यक्तीने मुख्य दरवाज्याच्या आतल्या बाजूला मोठ्या अक्षरात लिहायचा आहे आणि तुम्हाला घरातून ये जा करीत असताना भाग्यांक ला स्पर्श करून तो भाग्यांक उच्चारायचा आहे. ज्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. घरात पैसा कधीच कमी पडणार नाही.

जर तुमच्या घरातील मुलांच्या करियर बाबतीत काही अडचणी असतील तर या मुलांचा भाग्यांक जर मुलांच्या खोलीत असणाऱ्या दरवाज्याच्या आतल्या साईडला लिहिलात तरीही चालतो. तर मित्रांनो हा प्रभावशाली उपाय नक्की करून पहा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *