नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अमीषा पटेल यांचा ‘गदर २’ हा बहुचर्चित सिनेमा अलिकडेच प्रदर्शित झाला. ११ ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत या सिनेमाने अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावर केले असून पुन्हा एक नवीन रेकॉर्ड केला आहे. गदर २ ने कमाईच्या बाबतीत KGF-2 चा रेकॉर्ड मोडला आहे.

शनिवारी गदर २ ने १३.५ कोटींची कमाई केली असून sacnilkच्या वृत्तानुसार, आतापर्यंत या सिनेमाने एकूण ४३८.७० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. यापूर्वी KGF-2 (हिंदी) ने बॉक्स ऑफिसवर ४३५ कोटींची कमाई केली होती. परंतु, केजीएफ २ चा रेकॉर्ड मोडत गदरने ४३८.७० कोटींची कमाई केली आहे.

यापूर्वी शाहरुख खानच्या पठाणने ५४३ कोटी रुपये, बाहुबली-2 (हिंदीने) ५१० कोटी रुपये आणि केजीएफ २ ने ४३५ कोटींचं कलेक्शन केलं होतं. परंतु, आता केजीएफच्या कमाईचा रेकॉर्ड मोडत गदरने ४३८.७० कोटी रुपयांची कमाई करत सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत तिसरं स्थान मिळवलं आहे. इतकंच नाही तर येत्या काही दिवसात गदर २ लवकरच ५०० कोटींचा गल्ला जमवणार असल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, देशासह विदेशातही गदर २ धुमाकूळ घालत आहे. ऑस्ट्रेलिया, जर्मनी, अमेरिका आणि यूके सारख्या देशांमध्ये सुद्धा गदर २ पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. अनिल शर्मा दिग्दर्शित गदर २ हा सिनेमा ‘गदर एक प्रेम कथा’ चा सीक्वेल आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *