नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!! नमस्कार मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचा वारसा चालवणारे आपण लोक. महाराजांच्या अनुभवाची प्रचीती घेतलेले लाखो करोडो लोक इथे आहेत. त्यामधून काही अनुभव निवडून तुमच्या भेटीला आणत आहोत, जर तुम्हाला हे लेख आवडत असतील तर शेअर करून कमेंट करायला विसरू नका. साता समुद्रापार आपल्याला महाराजांच्या भक्तांचा आवाज पोहचवायचा आहे, श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग हा अनुभूती चा मार्ग असल्याची प्रचिती श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र वाळकी – एकबुर्जी रोड या वाशिम जिल्ह्यातील महिला सेवेकरी ताई चा आजचा अनुभव आहे. ग्रामअभियान अंतर्गत सुरू असलेल्या केंद्रातील ताई चा परिवार स्वामी सेवेकरी आहे, ताईच्या मुलीचे लग्न सन 2019 मध्ये अतिशय मोठ्या उत्साहात संपन्न झाले काहीच दिवसांनी आपली मुलगी आई होणार अशी बातमी कळाली तेव्हा श्री स्वामी ची कृपा म्हणून सर्वांनी स्वामी चे आभार मानले

पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते, नियमित तपासणी करण्यासाठी डिसेंबर 2020 मध्ये ताई अमरावती येथे डॉक्टरांकडे गेल्या पण डॉक्टरांनी त्याना सांगितले की, ताईच्या पोटात ज्या बाळाचा गर्भ आहे तो खराब झाला असून जन्म घालू नये आणि तो लवकरात लवकर काढून टाकावा.

ताईंच्या मुलीने तो जर काढला नाही तर…बाळ तर वाचणार नाहीच नाही पण आईच्या पण जीवाला धोका निर्माण होईल नंतर त्या ताईनी आपल्या मुलीसाहित चार ते पाच डॉक्टरांचा सल्ला घेतला सर्वाचे तेच मत आले. अशात ताई आपल्या आईला घेऊन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र वाळकी – एकबुर्जी रोड वाशिम येथे आल्या त्यानी प्रश्नोत्तरी करणाऱ्या ताई ला आपला प्रश्न-कैफियत सांगितला.

सेवेकरी ताई नी त्याना स्वामी महाराजांना नारळ (श्रीफळ) ठेवायला सांगून सेवा दिली आणि त्यांना लगेच श्री क्षेत्र दिंडोरी येथे जाऊन प पु गुरुमाऊली दरबारात जायायला सांगितले. सेवेकरी ताईनी वेळ न जाऊ देता आपल्या आई बाबा सह श्रीक्षेत्र दिंडोरी दरबारी प पु गुरुमाऊली च्या समोर आपला प्रश्न मांडला गुरुमाऊली नी त्याना भरभरून आशिर्वाद दिला आणि ” लवकरात लवकर पेढा घेऊन यायल सांगितला “, आदरणीय दादासाहेबांनी पण ” तुमच्या मनासारखे होईल व लवकर बाळाला घेऊन या ” असा आपला कृपाआशिर्वाद दिला ,

दिनांक 05/05/2021 ला ताईने एक सुंदर मुलाला जन्म दिला आहे विशेष म्हणजे बाळ व आई दोघांची तब्बेत एकदम ठणठणीत आहे ,ताईनी प पु गुरुमाऊली , आदरणीय दादासाहेबांचा प्रसाद म्हणून स्वीकार केला. “जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरू होते “हा फक्त आणि फक्त प पु गुरुमाऊली चा कृपा आशिर्वाद. “अशक्य हि शक्य करतील स्वामी गुरुमाऊली”

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *