नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीला केवळ अद्भूत आणि अचंबित करणाऱ्या आहेत. स्वामींचा भक्त परिवार मोठा आहे. केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचे दिसते. यातून महाराजांचे चरित्र, त्यांचे संदेश, त्यांची शिकवण, त्यांच्या लीला यांचे श्रवण, कीर्तन, वाचन केले जाते.

स्वामी भक्तांना नियमित मठात जाता आले नाही, तरी ते घरी राहून स्वामींचे नामस्मरण, उपासना करत असतात. स्वामी समर्थ पाठीशी असल्याचे अनुभव आल्याचे अनेक स्वामी भक्त सांगत असतात. स्वामी समर्थांच्या लीला असतील, त्यांची कृती असेल, त्यांची वचने असतील, ही कायम समाजाला बोधप्रत ठरत असतात.

त्यातून काही ना काही शिकवण संदेश समाजाला मिळत असते. अशाच ब्रह्मांडनायक ‘श्री स्वामी समर्थ’ ह्यांनी आपल्या भक्तांना सन्मार्ग दाखवला. तसेच, ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’! आणि ‘अशक्यही शक्य करतील स्वामी’ या अमृतमय शब्दांची शक्ती फार विलक्षणीय आहे. स्वत: परमेश्वर व्हा.

असे सांगणारे थोर सिद्धपुरुष अठराव्या शतकात होऊन गेले. आणि ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. गाणगापुराचे नृसिंह सरस्वती कर्दळीवनात गुप्त झाल्यानंतर, तब्बल 300 वर्षांचा काळ उलटला आणि एक दिवस कर्दळीवनात लाकडे तोडणार्‍या एका इसमाच्या हातून कुर्‍हाड निसटली आणि तिथल्या वारुळावर पडली!

तिथून रक्ताची धार लागली आणि अडसर दूर केल्यानंतर, श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले. आणि भक्तहो इथून खर्‍या अर्थाने प्रवास सुरू झाला. आणि श्री स्वामी समर्थ सोलापूर येथील अक्कलकोट स्थानी पोहचले. आणि तेथील लोकांना त्यांच्या अद्भुत लीलांची आणि महानतेची प्रचिती येत गेली.

तर मित्रांनो, स्वामींची एक अप्रकाशीत पण बरीचशी माहिती असलेली एका लीलांमधील एक कथा आहे, जी श्रीमंत बाळाप्पां स्वामी सेवेकरीची आहे. त्यांच्याबद्दलची कथा आज तुम्हाला सांगत आहे. मित्रांनो, स्वामी सेवा कशी करावी? याच्याबद्दल बाळाप्पानी सर्व सेवेकरींना उत्तम मार्गदर्शन दाखविले.

जी स्वामीसेवा आजही कार्यरत आहे. एके दिवशी स्वामी सेवेत अनेक सेवेकरी उपस्थित होते. तेव्हा बाळाप्पानी स्वामी सेवेची नीट व्यवस्था ठेवली होती. रोज सकाळी स्वामी सेवेत बाळाप्पा महाराज, चोळाप्पा आणि सुंदराबाई हे सर्वजण देखील उपस्थित असायचे. प्रत्येकाची कामे ही ठरलेली असायची.

कोणीही कोणाच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करत नव्हते. रोज नित्यनेमाप्रमाणे स्वामींची आरती होत असे. मग स्वामी उपस्थित असो वा नसो त्यात कधीही खंड पडत नसायचा. आरती संपन्न झाल्यावर, नैवेद्याचा प्रसादाचा वाटप स्वतः स्वामी करत असायचे. आणि हा नैवेद्याचा प्रसाद वाटताना, नेहमी बाळाप्पा आपला हात पुढे करत असायचे.

<
परंतु कधीही स्वामिनी बाळाप्पांना प्रसाद दिला नाही. त्यामुळे बाळाप्पा नेहमी निराश व्हायचे. आणि आजही आपणास प्रसाद मिळाला नाही. म्हणून रडत बसायचे आणि आपल्या निवासस्थानी परत जायचे. असे करता करता बरीच वर्ष लोटून गेली. मात्र एक दिवस बाळाप्पानी ठरवले की, आज प्रसाद घेतल्याशिवाय माघारी जायचे नाही.

नेहमीप्रमाणे स्वामींची आरती झाल्यानंतर, सर्व स्वामीभक्त दर्शन आणि प्रसाद घेण्यासाठी रांगेत उभे राहिले. तेव्हा बाळाप्पानी काय केले? एका भक्ताच्या पायाखालून हात घातला आणि प्रसादाची वाट पाहू लागले. वास्तविक स्वामीच या सृष्टीचे पालनहार आहेत. मग स्वामींना या गोष्टीचा सुगावा लागल्याशिवाय राहील का?

स्वामी प्रसाद वाटत वाटत बाळाप्पाच्या हातापर्यंत आले. आणि तिथेच एक क्षणभरच स्वामी थांबले. आणि दुसऱ्या क्षणी बाळाप्पाच्या हातात एक मोठे खारीक पडले. लगेच बाळाप्पानी ते खारीक आपल्या हातात घट्ट पकडुन ठेवले. आणि कोणजाणे स्वामी पाहतील म्हणून, त्वरित तिथून धूम ठोकून, आपल्या निवास्थानी गेले.

आणि दरवाजा बंद करून, मोठ्या कष्टाने मिळालेला प्रसाद आपल्या हृदयाशी घट्ट धरून, स्वामींच्या प्रतीमेकडे पाहत रडू लागले आणि स्वामीना म्हणू लागले की, स्वामी का बरं मला गरिबाला तुम्ही प्रसाद द्यायला एवढा वेळ लावला? तेवढ्यातच दरवाजा जोरजोरात ठोकून एक आवाज ऐकू येऊ लागला.

‘बाळाप्पा दार उघडा’! बाळाप्पा दार उघडा’! स्वामींनी तुम्हाला आहे तसे बोलावले आहे! बाळाप्पानी लगेच ओळखले की, स्वामींनी का बोलावले असावे! लगोलग बाळाप्पानी दरवाजा उघडला. आणि स्वामींच्या भेटीस गेले. भेटीस गेल्यानंतर बाळाप्पा स्वामींच्या समोर मान खाली करून, खारीक हातातच पकडुन उभे राहिले.

स्वामी बाळाप्पाना पाहून म्हणाले, हरामखोर हमसे नजर बचाके प्रसाद लेके जाता है! ना तुम मुझे छोडोगे, ना मैं तुम्हे छोडूंगा! लाओ प्रसाद लाओ! त्यानंतर बाळाप्पानी स्वामीजींना ती खारीक परत दिली. आणि स्वामीजींनी ती खारीक घेऊन बाळाप्पाना प्रेमाने जवळ घेतले. आणि म्हणाले ‘अरे तु या प्रसादाच्या मागे काय लागला आहेस!जो प्रसाद तुला द्यायचा आहे, तो मी कधीच दिला आहे.

माझ्या मांडीवर तुला घेतले आहे, माझ्या मांडी शेजारीच मांडी घालुन बस हाच तुला प्रसाद! या नंतर बाळाप्पांनी कधीही प्रसादाचा हट्ट केला नाही! भक्तहो ओळखलात का? तो कुठला प्रसाद? स्वामींच्या समाधी शेजारीच समाधी घेण्याची परवानगी! जी कोणालाही मिळाली नाही! धन्य ते स्वामीगुरु अन धन्य ते शिष्य बाळाप्पा! तर भक्तहो, अशा स्वामींच्या अनेक लीला त्या शतकात प्रचलित झाल्या.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *