नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अनुभवाच्या लेखमालेमधे तुमचे स्वागत आहे. तुम्ही लेखांना इतके प्रेम दिले आहे की, स्वामी महाराजांचे लेख हे साता समुद्रापार पोचले आहेत. तुम्हाला देखील स्वामी महाराजांचा अनुभव आलेला असेल, तो आपल्या पेजला मेसेज करून पाठवायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ ! महाराजांच्या सेवेकर्‍याच्या शब्दात पुढील अनुभव

नमस्कार मित्रांनो मी अविनाश, राहणारा संभाजीनगरचा. मी गेली अनेक वर्षे एका फार्मसीच्या कंपनीमध्ये काम करत होतो. सगळ्या गोष्टी एकदम छान चालल्या होत्या. कुटुंबात कलह नवता की हलाखीची परिस्थिती नवती. सगळ्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे चालल्या होत्या. स्वामी महाराजांनी आमच्या घरावर अगदी कृपाछत्र ठेवलेले होते पण आयुष्य आहे आणि काही गोष्टी पुढे वाढून ठेवलेल्याच असतात.

दिवस होता 17 जूनचा, मी नेहमी प्रमाणे कामाला गेलो पण अचानक जे व्हायचे नवते ते झाले. काम करत असताना माझ्या डोळ्यात, नाकात आणि पोटात फुल्ल प्रेशर ने अमोनिया नावाचे केमिकल गेले होते. अमोनिया हा खूप घातक असा आहे, त्याच्या वासाने देखील मळमळायला होते त्वचेवर पडला तर अनेक गोष्टी होतात. पण या भयंकर अपघातामधून स्वामींनी मला वाचवले. माझ्या शरीरावर एक साधी जखम देखील झालेली नवती.

पण माझ्या डोळ्यात गेलेल्या या पदार्थामुळे मला काहीही दिसेनासे झाले होते. मी मोठयाने ओरडत होतो आणि मी कसातरी कंपाऊंडच्या बाहेर आलो. मला तातडीने दवाखान्यामध्ये हल्व्ण्यात आले. मला ॲडमीट केले मग उपचार सुरू केले डॉक्टरांनी डोळे चेक केले तेव्हा त्यांच्या असिस्टंटला ते सांगत होते की दोन्ही डोळे 80 टक्क्यांपेक्षा जास्त जळाले आहेत. मी हे ऐकताच त्यांना विचारले की डॉक्टर माझे डोळे रिकव्हर होतील की नाही तर ते म्हणाले शक्यतो केमिकल चे डोळे रिकव्हर होत नाहीत पण आपण प्रयत्न करू पण गॅरंटी नाही देऊ शकत,

मी निराश झालो पण मी धीर सोडला नाही, हताश झालो नाही कारण मला माहिती होते की आपल्या पाठीशी गुरुमाऊली उभी आहे. 2 दिवस झाले त्रास काही कमी व्हायचे नावच घेत नव्हता लाईट चा प्रकाश पण सहन होत नव्हता डोळे खूप सुजले होते, डोळे उघडताच येत नव्हते आणि डोळ्यांमधून सतत पाणी चालू होते.

त्या दिवशी आमच्या जवळच्या केंद्रामधले बरेचजन मला भेटायला आले होते. अनेक जणांनी मला धीर दिला, स्वामी नक्कीच सगळे नीट करतील असेही सांगितले. केंद्रामधल्या एका दादांनी मला संगितले की स्वामी तुझी परीक्षा पाहत आहेत आणि ते मला म्हणाले की तु फक्त बेडवर पडल्या पडल्या स्वामींचा जप, महामृत्युंजय मंत्र आणि धुमावती मंत्र म्हणत रहा आणि मग मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे मंत्र चालू केले, तर तो जप चालू असताना मला सतत माझ्या डोळ्यांसमोर स्वामी महाराज दिसत होते.

मी 1 महिना हॉस्पिटलला ॲडमीट होतो मग माझ्यावर उपचार सुरू असताना हळू हळू माझे डोळे रिकव्हर झाले आणि मला 1 महिन्याने डिस्चार्ज मिळाला आता मी एकदम ठणठणीत आहे. स्वामींनी त्यांच्या भक्ताला काहीही होऊ दिले नाही आणि अगदी पहिल्यापेक्षा अधिक उर्मि मला दिली आहे. स्वामी महाराजांचा जयघोष करायला विसरू नका ! श्री स्वामी समर्थ..!!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *