नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो, आपल्याला आपण केलेल्या देवपूजेचे संपूर्ण फळ मिळावं अशी प्रत्येकाची मनिषा असते. ज्या पण देव-देवतांची आपण दररोज नित्य आणि मनोभावे पूजा करत असतो, त्या देव देवतांनी आपल्याला प्रसन्न व्हावं, आपल्यावर, आणि आपल्या घरादारावर या देव-देवतांची कृपा दृष्टी बरसावी अशी प्रत्येकाची मनोकामना ही असतेच.

मित्रांनो, यासाठीच आपली देवपूजा संपन्न झाल्यानंतर आपण ही एक छोटीशी गोष्ट नक्कीच करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या पुजेचं योग्य ते फळ मिळेल. म्हणूनच अगदी दररोज आवर्जून आपण पूजा करत असतो. व देवी देवता आपल्याला प्रसन्न होत असतात. केलेल्या देवपूजेचे संपूर्ण फळ प्राप्त होत मानसिक शांती निर्माण होते.

आता ही गोष्ट नक्की कोणती आहे ते जाणून घेण्यापूर्वी आपण विचारलेल्या काही अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे अगदी थोडक्यात देऊ इच्छितो की हे सर्व प्रश्न देवपूजेची संबंधित आहेत. आपण देवपूजा करताना देवापुढे दिवा प्रज्वलित करतो किंवा समई लावतो हा दिवा किंवा समई चुकूनही आपण स्वतः फुंकून विझवू नये. त्यामुळे देवी-देवता रुष्ट होतात. अनेक प्रकारचे दो ष लागतात. देवपूजेचे जे निर्माल्य आहे, निर्माल्य म्हणजे काय तर देवपूजा करताना जी फूल पान किंवा धूप अगरबत्ती यांचा आपण वापर करतो.

जो पण भोग किंवा नैवद्य आपण देवाला अर्पण करतो. त्याचं देवपूजा संपन्न झाल्यानंतर काही कालावधीने याचं रूपांतर निर्माल्यत होतं. ही सर्व सामग्री काढून टाकून द्यावी लागते. अनेक जण हे निर्माल्य कचरा पेटीत टाकून देतात. ग्रामीण भागामध्ये हे निर्माल्य उकंड्यावर अगदी सहज फेकून दिले जात. त्यामुळे अनेक प्रकारचे दोष उत्पन्न होतात. कारण कचरापेटी किंवा उकिरडा ही नकारात्मक ऊर्जेची केंद्र आहेत. या दोन्ही ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर निगेटिव्हिटी बाहेर पडते आणि म्हणूनच आपण देवपूजेचं निर्माल्य हे वाहत्या पाण्यात प्रवाहित करा व नदी असेल, किंवा समुद्र असेल किंवा ओढा असेल यामध्ये निर्माल्य प्रवाहित करावं.

आणि जर तुमच्या परिसरामध्ये अशी सोय नसेल तर कोणत्याही झाडाजवळ छोटासा खड्डा करून त्यामध्ये सुद्धा आपण हे निर्माल्य पुरून टाकू शकता. मात्र ते कचऱ्यामध्ये चुकूनही टाकू नका. सोबतच देवाला फुले वाहताना अंगठ्या जवळच्या बोटांचा स्पर्श होऊ नये. हे खरं आहे का असाही प्रश्न एका भगिनीने विचारला आहे, ताई याच उत्तर असा आहे की ज्योतिष शास्त्र आणि हिंदू धर्मशास्त्रात जर आपण दाखला पाहिला तर आपल्या अंगठ्या जवळचे बोट हे सर्व प्रकारच्या शुभ कामांना शुभ कार्यांना वर्ज्य मानण्यात आलेल आहे आणि म्हणूनच फुले वहाताना अंगठ्याजवळचे बोट थोडक्यात तर्जनी ही फुलांना लावू नये.

फुले अंगठ्याने आणि मध्यमा आमच्याने जे मधले बोट आहे अंगठ्यानेआणि माध्यमने उचलून ती आपण देवाला वाहवित शक्यतो अंगठ्या जवळच्या बोटाचा स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या. जेव्हा तुम्ही देवाला गंध उगाळत आहात तेव्हा सुद्धा या बोटाचा स्पर्श चंदनाच्या खोडाला होणार नाही. याची काळजी घ्या. फुलांचा विषय निघाला आहे तर एका भगिनीने फुलाच्या कळ्या देवाला वाहिल्या तर चालत का असं विचारलं होतं. खरं तर फुलाच्या कळ्या कोणत्याही देवीला किंवा देवाला वाहिलेल्या जात नाहीत मात्र आपण जलकमल जलकमळाच्या कळ्या या देवी-देवतांना वाहू शकता.

जलकमल सोडून इतर कोणत्याही फुलांच्या कळ्या कोणत्याही देवतेस अर्पण केल्या जात नाहीत. प्रदक्षिणा विषयी एक प्रश्न वारंवार विचारला जातो की आमच्या घरात देव घरा शेजारी जागा खूप अपुरी आहे. तर कोणत्याही मंदिरात तुम्ही गेला तर त्या ठिकाणी प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा नसेल तर अशा वेळी आपण स्वतः भोवती सुद्धा प्रदक्षिणा घालू शकता. अगदी जागच्या जागी उभं राहून देव्हाऱ्यातच आपण स्वतःला स्वतः भोवती प्रदक्षिणा घाला. त्यामुळे ज्या देवतेची आपण पूजा केली आहे त्या देवतेसमोर आपण नतमस्तक झालेलो आहोत.

त्याच देवतेच्या प्रदक्षिणा घातल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होतं. वारंवार हा प्रश्न विचारला गेलेला आहे. यापूर्वी अनेकदा मार्गदर्शन केलेलं होतं मात्र पुन्हा पुन्हा विचारल्यामुळे सांगणं या ठिकाणी कर्तव्य प्राप्त होत की फुले वाहन यापूर्वी अनेक लोक पुष्प शुद्धी करून घेतात. तर ते आवश्यक आहे मित्रांनो फुले वाहताना देवाला फुले वाहण्यापूर्वी पुष्प शुद्धी करणे गरजेचे आहे.

मात्र प्रत्येकालाच शक्य होत नाही. आपण एक छोटीशी गोष्ट करत चला. आपल्या हातामध्ये फुले घेऊन त्या फुलावरती थोडं पाणी शिंपडा. ज्यां ठिकाणी फुले ठेवलेली आहेत. त्या पात्रामध्ये त्या फुलावर पाणी शिंपडावं. त्यांना थोडासा गंध लावावा आणि त्यानंतरही फुले आपल्या अंगठ्याने आणि जी माध्यमांमध्ये मधलं बोट आहे.

त्यांनी उचलून आपण देवतेस अर्पण करावी. याने सुद्धा पुष्प शुद्धी घडून येते. आणि जर तुम्हाला मंत्र म्हणायचे असेल. पुष्प शुद्धीचा तर “ओम पुष्पे महा पुष्पे सुपुष्प पुष्पे संभवे पुष्पे जया वोकिरणेच ओम फट स्वाहा” हा मंत्र आपण म्हणा. आणि त्या नंतर ह्या फुलांवरती पाणी शिंपडून गंध लावून ती देवी देवतेस अर्पण करू शकता. मात्र प्रत्येक वेळी मंत्र म्हणण आवश्यक नाही. त्याठिकाणी प्रोक्षण करून आपण थोडासा गंध लावून आपण वाहू शकता. अक्षतांच्या बाबतीत अक्षता म्हणजे तांदूळ यांचा फार मोठा महात्मे देवपूजेमध्ये आहे.

तर जे अखंड तांदूळ असतात ना तुटले फुटले त्यांना आपण अक्षत असे म्हणतो तर असे हे अक्षत आपण महादेवाला अर्पण करताना ते नेहमी पांढरी असावेत. सफेद असावेत आणि जेव्हा आपण इतर देवी-देवतांना हे अक्षता अर्पण करत आहात. तेव्हा ते कुमकुम मिश्रित करू शकता. कुमकुम मिश्रित म्हणजे काय तर त्यामुळे थोडासा कुंकू टाकून थोडे पाणी टाकून त्याला लाल रंग प्रधान करा आणि ते आपण इतर देवी देवतांना वाहू शकता. महादेवांना वाहताना मात्र शिवशंकरला वाहताना मात्र ते कूकुं मिश्रित नसावेत. आपल्या तुळशीमध्ये जे शाळीग्राम आहे त्या शालिग्रामाला अक्षत व्हावेत का?

असाही प्रश्न होता शालिग्राम जे आहे ते भगवान श्रीहरी श्री विष्णूचे रूप आहे. आपण या शालिग्राम सोबतच माता लक्ष्मी जी माता तुलसी आहे. त्यांचा विवाह लावून देत असतो. तर या शाळीग्राम ला चुकूनही अक्षता वाहू नयेत. इतर देवी देवतांना वाहताना सर्व प्रचारार्थ समर्पयामि सर्व प्रचारार्थ अक्षता समर्पयामि असा मंत्र म्हणून त्या देवी देवतेच्या मस्तकावर आपण त्या अक्षता वाहू शकता. तर हा मंत्र म्हणण्याचे कारण असे आहे की हा मंत्र म्हटल्यास आपल्या कोणत्याही थोड्याफार चुका राहतात.

उपचार ती नुण्यता राहते ती भरून निघते. मित्रांनो तुमच्या प्रश्नांची उत्तरे अजूनही काही शंका असतील नक्की विचारा. प्रत्येक शंकेचे निरसन हे हिंदू धर्मशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू आजचा आपला मुख्य विषय होता की देव पूजा झाल्यानंतर आपण नक्की काय करावं. हिंदूधर्मशास्त्र अस मानत की देवपूजा झाल्यानंतर आपण कमीत कमी आपले डोळे बंद करावेत आणि आपल्या देव ज्या देवी-देवतांना आपण स्थापित केलेला आहे त्यांना आपल्या हृदयामध्ये पाहण्याचा प्रयत्न करावा.

ते आपल्या अंतरआत्म्यात आहेत. आपल्यामध्ये आहेत असा प्रयत्न करा. मित्रांनो ही छोटीशी गोष्ट दररोज देवपूजा झाल्यानंतर लगबगीने उठून जाऊ नका. तुमच्या दैनंदिन कामांमध्ये व्यस्त होऊ नका. देवपूजा केल्यानंतरआपण थोडा वेळ डोळे बंद करून एक ते दोन मिनिटे ध्यानस्थ व्हा. ज्यांना शक्य आहे त्यांनी पाच दहा मिनीटे त्या परमेश्वराला या नियमत्याला स्वतःमध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. आपल्या हृदयात आहे आपल्यातच वास करत आहे. यासाठी यत्न करा प्रयत्न करा देव पूजेचं फळ नक्की मिळेल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *