नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! प्रत्येकजण आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे आपल्याला देवाची पूजा करीत असतो आणि देवाची प्रार्थना करीत असतो. प्रत्येकांचे वेगवेगळे असतात. परंतु प्रार्थना ही सर्वजण एक प्रमाणे एकसारखीच करत असतो. प्रार्थना ही सर्व जण दोन वेळा जास्त करून करत असतात. पहिली वेळ म्हणजे जेव्हा आपण खूप सुखात असतो आणि आपण जे देवाकडे इच्छा मागितले असते ती इच्छा पूर्ण झालेली असते. त्यासाठी देवाचे आभार मानण्यासाठी ती प्रार्थना करीत असतो.

आणि दुसरी म्हणजे आपण जेव्हा खूप दुखत असतो किंवा आपल्यावर खूप मोठे संकट आले असते. त्यावेळी आपल्या मुखातून भगवंताचे नाव आपोआप येत असते. भगवंताची प्रार्थना करत असताना आपल्याला वेगळा असा वेळ द्यावा लागत नाही. ते आपण काम करता करता देखील करू शकतात. फक्त आपल्या मनामध्ये त्या दिवा विषयी श्रद्धा असली पाहिजे.

असे मानले जाते की, प्रार्थना केल्यामुळे आपल्या मनामध्ये अंतरपाठ व बाहेर पाठ शक्ती निर्माण होते. आणि ही शक्ती आपल्या मनातील नकारात्मक दूर करत असते आणि सकारात्मक भाव जागृत करत असते. विज्ञान असेही सांगते की, ज्या व्यक्ती प्रार्थना करीत असतात त्या व्यक्ती जीवनामध्ये संयमाने वागत असतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये ते आपल्यावर ताबा मिळवू शकतात. व क्रोध या मध्ये देखील क्रोध आपला सावरू शकतात.

प्रार्थनेतून आपल्याला शक्ती व सकारात्मकता देखील मिळते. पण त्यासाठी प्रार्थनाही व्यवस्थित रित्या व नियमानुसार द्यायला हवी. आपल्याला हे नियम माहीत नसतात. म्हणूनच आज आपण या लेखातून प्रार्थना करते वेळी कोणते नियम पाळावेत? त्याची माहिती जाणून घेणार आहोत.

अनेक वेळा आपण प्रार्थना करीत असताना देवाकडे असे मागतो की, आपल्याला ही वस्तू पाहिजेल आहे. ही वस्तू दुसऱ्याला मिळू नये. फक्त आपल्यालाच मिळावी. किंवा विद्यार्थी अशी प्रार्थना करत असतात की, आपलाच पहिला नंबर यावा. दुसरा कोणाचा येऊ नये. या प्रार्थनेमध्ये नकारात्मकता असते. ती इतर व्यक्तीवर असते. त्यामुळे आपल्या प्रार्थनेमध्ये नकारात्मक त्याचा प्रभाव जास्त प्रमाणात पडतो.

म्हणून आपल्या प्रार्थनेत कधीही नको, नाही अशा शब्दांचा उच्चारण कधीच करू नये. या शब्दाचे उच्चार न करता जर आपण प्रार्थना केली आणि ती प्रार्थना पूर्ण झाली तर त्यासाठी भगवंताचे आभार नक्की मानावेत. त्याच बरोबर आपल्याला काही तरी हवे असेल तरच भगवंताची प्रार्थना कधी हे करू नये आणि इतरां चे वाईट होऊन आपले चांगले व्हावे अशी प्रार्थना देवाकडे कधीच करू नये.

जर आपल्या प्रार्थनेमध्ये सकारात्मकता असेल तरच आपली प्रार्थना पूर्ण होत असते. म्हणून नकारात्मक तिचा प्रभाव आपल्या प्रार्थनेत कधीही पडू देऊ नये. अशाप्रकारे हे काही नियम आहेत जे प्रार्थना करताना आपल्याला पाळायचे आहेत. त्याप्रमाणेच या नियमांचे पालन करून प्रार्थना करीत जा. तुमची प्रार्थना नक्कीच देवाला पोहोचेल व त्याचे फळही तुम्हाला मिळेल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *