नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!आज आम्ही तुम्हाला देवाकडे पाठ करून का बसू नये आणि याचे कारण काय आहे आणि आपण जर देवाकडे पाठ करून बसलो तर त्याचे काय परिणाम होतात याच्याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर देवबाप्पांचे दर्शन घेतल्यानंतर आपण देवासमोर काही क्षण तर थोडावेळ बसत असतो त्यांना नमस्कार करतो

आणि मंदिरात गेल्यावर आपल्याला नेहमी सांगितले जाते की देवाकडे पाठ करून बसू नये तरी यामागे नक्की कारण काय आहे असं का सांगितलं जातं देवाकडे पाहून आपण त्यांचं जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा त्यांचा आपल्यावर चांगला प्रभाव पडत असतो आणि धार्मिक कारणानुसार भगवंताकडे पाठ करून बसणं हा देवाचा अनादर केल्यासारखा आहे

देवाचा अपमान केल्यासारखा आहे त्यामुळे देवाकडे पाठ करणे म्हणजेच पावनते कडे त्यांनी दिलेला आशीर्वादाकडे आपण पाठ फिरवल्यासारखं असतं आणि हे अशुभ मानलं जातं तर त्यामुळेच आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा देवाकडे पाठ करून कधीही बसत नाही किंवा आपल्या घरात सुद्धा आपलं जिथे देवघर असेल तर त्या देवघराकडे आपण कधीच पाठ करून बसत नाही

म्हणजे आपल्या घराची रचना आपण अशी केलेली असते की जेणेकरून देव्हाऱ्याकडे देवघराकडे आपली पाठ येणार नाही असं आपल्याकडून बसले जाणार नाही आपण म्हणतो की ईश्वर सर्वत्र आहे देवबाप्पा हा सगळीकडे असतो आपले स्वामी हे सर्वत्र आहेत तरी मंदिरातच त्याची जी प्रतिमा असते तिच्यासमोर बसल्यावर अधिक सकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपल्याला मिळत असते

कारण काय आहे जेव्हा आपण मंदिरात जातो मंदिरात सगळीच लोकं येतात आणि जेव्हा मंदिरात कोणी येत तर कोणीच आपल्या मनामध्ये वाईट विचार घेऊनही येत नाही सगळेजण चांगले विचार घेऊन काहीतरी मनात चांगली इच्छा ठेवून चांगल्या विचारांनी चांगल्या मनाने मंदिरात येत असतात तर त्यामुळे मंदिरामध्ये पॉझिटिव्हिटी एनर्जी इतक्या प्रमाणात असते की आपण जेव्हा तिथे मंदिरात थोड्यावेळ जरी बसलो

तर आपल्यामध्ये ती जी सकारात्मक ऊर्जा असते ती सामावली जाते त्यामुळे आपण जेव्हा घरामध्ये देव्हाऱ्यासमोर बसून काही पूजाअर्चा केली तर ती पूजा अर्चा आणि आपण जेव्हा मंदिरामध्ये केंद्रामध्ये बसून काही सेवा करत आहोत काही पूजा अर्चा करत आहोत तर त्या दोघांमध्ये खूप फरक आहे कारण आपलं घर म्हटलं म्हणजे घरात भांडण येतात वादविवाद येतात घर असल्यामुळे काही ना काही दिवसभर तिथे चालूच असते

कारण आपण तिथे घरामध्ये राहत असतो रात्रंदिवस राहत असतो तर त्यामुळे घरातल्या मंदिरामध्ये जेवढी सकारात्मकक्षा असते त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त सकारात्मकता ही मंदिरामध्ये असते तर त्यामुळे जेव्हा आपण मंदिरांमध्ये बसतो तर त्यावेळेस आपल्याला खूप सकारात्मक ऊर्जा आपल्याला सामावून घेता येते आणि अधिक सकारात्मक ऊर्जा आपल्यालाही मिळत असते

तर याप्रतिमेकडे देवाकडे पाठ करून बसणे म्हणजेच देवाचा अपमान करण्यासारखं आहे बरेचसे नास्तिक लोक सुद्धा असतात आहेत ही बरेचसे नास्तिक लोक आपल्याला बघायला सुद्धा मिळतात आपल्या घरातच असतात कधी कधी किंवा आपल्या आजूबाजूला आपल्याला बघायला सुद्धा मिळतात की ज्यांचा देवावर विश्वास नसतो तर दर्शनासाठी ते मंदिरामध्ये प्रवेश करून सुद्धा कधी कधी देवाकडे पाठ करून बसतात

म्हणजे आपण बघितलं असेल की एखाद्या व्यक्तीला देवाला मानन हे त्यांना नाही आवडत पण कधी कधी घरातल्यांच्या फोर्समुळे ते लोक काय करतात की चला ठीक आहे तुम्ही म्हणताय म्हणून मी मंदिरात येतो पण ते मंदिरात नमस्कार करत नाहीत किंवा एक दिवस काहीतरी टाईमपास साठी आले आहेत असं म्हणून ते देवाकडे पाठसुद्धा करून बसतात तर त्यामुळे आपण नास्तिक नसल्याचं दर्शवण्यासाठी देवाच्या नजरेसमोर बसण्याची ही पद्धत आहे

तर त्यामुळे कधीही चुकून सुद्धा आपण देवाच्या समोर गेल्यावर चुकून सुद्धा पाठ करून देवाकडे बसू नये तो देवाचा अपमान असतो देव आपल्याला काहीतरी आशीर्वाद देत असतो आणि ते आशीर्वाद आपण नाकारल्यासारखं असतं तर त्यामुळे देवाकडे पाठ करून कधीही बसू नये

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *