नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!स्वच्छ दात फक्त दिसायलाच चांगले दिसत नाही, तर यामुळे तुमच्या पर्सनॅलिटीवरही परिणाम होतो. पिवळे दात, किड लागलले दात दिसायला चांगले दिसत नाहीत. याशिवाय दातदुखीचा खर्च वाढतो ते वेगळं. दातांमध्ये खड्डे तयार होतात. दातांनी किड लागल्यामुळे दात आतून पोकळ होतात. दातांनी किड लागल्यामुळे तोंडात बॅक्टेरिअल इन्फेक्शन आणि इतर आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. टूथ कॅव्हिटीमुळे दात खराब होतात. दात किडू नयेत यासाठी काही सोपे उपाय पाहूया.

मिठाचं पाणी

दातांमधील किड आणि वेदना दूर करण्यासाठी मिठाचं पाणी फायदेशीर ठरतं. यामुळे तोंडातील बॅक्टेरिया दूर होतात आणि कॅव्हिटीमधील चिकटपणा दूर होतो. मिठाचं पाणी एसिड दूर करून तोंडाचे पीएच लेव्हल सामान्य ठेवते.

लसूण

भारतीय स्वयंपाकघरात लसणाला फार महत्व आहे. पदार्थाची चव वाढवण्यासाठी लसूण फायदेशीर मानला जातो. आरोग्यासाठी लसूण अनेकदृष्ट्या फायदेशीर ठरतो. यात एंटी फंगल आणि एंटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. लसूण एखाद्या पेनकिलरप्रमाणे काम करतो. ज्यामुळे दातांतील किड दूर होते.

लिंबू

लिंबू व्हिटामीन सी चा एक चांगला स्त्रोत आहे. यातील एसिड जंतूंना मारून वेदना कमी करण्यात गुणकारी ठरतो. तोंडात लिंबाचा तुकडा ठेवून हा तुकडा चघळा त्यानंतर स्वच्छ पाण्याने गुळण्या करता. या उपायाने दातदुखीच्या वेदनांपासून आराम मिळतो.

लवंग

लवंगाने फफक्त कॅव्हिटीज दूर होत नाहीतर अनेक ओरल प्रोब्लेम्सही दूर होतात यात एंटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. जे वेदना कमी करण्यास मदत करतात. लवंगाच्या तेलाचा वापर करून तुम्ही दातांची किड काढून टाकू शकता.

दात किडू नयेत यासाठी काय करावे?

१) खूप जास्त चॉकलेट्स, साखर, गूळ असलेले पदार्थ खाणं टाळा

२) रोज दोनवेळा ब्रश करा. लहान मुलांनाही या सवयी लावा.

३) जास्त गरम किंवा थंड पदार्थ खाऊ नका यामुळे दात अधिक सेंसिटिव्ह होतात.

४) फास्ट फूड किंवा तेलकट पदार्थ खाऊ नका. दातांना पुरेपूर पोषण मिळेल असे पदार्थ खा.

५) दातांना किड लागणं, दात पिवळे होणं अशा कोणत्याही समस्या उद्भवल्यास आधी तज्ज्ञांशी संपर्क साधा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *