नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांना स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवून देत ही स्वामी चरणी मना पासून प्रार्थना श्री स्वामी समर्थ

महाराजांना त्रिवार वंदन करून आज मी तुम्हाला अक्षय राजेंद्र दबडे या स्वामी सेवेकरी दादांना देवी चा आलेला अनुभव. त्याच्या शब्दांत सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ.आष्टा मध्ये भाव यात्रा ही देवी चौण्डेश्वरी देवीची यात्रा असते. जी खूप उत्साहात पार पडते आणि आम्ही एकदा कॉलेज मधून सारे मित्र मंडळी यात्रा फिरायला गेलो होतो. सर्वजण मस्त दंगामस्ती करत होते आणि यात्रा फिरत होते. यात्रेत गेल्यानंतर आमच्या ग्रुप मधल्या मुला मुलींचा ठरलं की आकाशपाळण्यात बसायचे.

ठरला प्रमाणे आमच्या ग्रुप मधल्या सर्व मुली पाळण्यात बसल्या आणि पाळना सुरू झाला. सर्व नीट चाललं होतं आणि मी माझ्या मित्रा सोबत खाली थांबलो होतो तर माझा एक मित्र नकळत पणे एक वाईट गोष्ट बोलून गेला तर त्याने अचानक असं बोल ला की काय होईल जर हा पाळना खाली पडला तर आता या क्षणी अस तो वाईट बोलला तेव्हा माझ्या मनात भीती निर्माण झाली आणि मला काहीच कळेना माझं मन खूप घाबरल होत कारण माझे मित्रमंडळी त्या पाळण्यात होते. पण त्याचबरोबर खूप लोकं आणि लहान मुलं मोठ्या आनंदाने त्या पाळण्यात बसले होते तर माझ्या मनात एक विचार आला आणि मी देवी च्या मंदिराकडे बघून नमस्कार केला आणि मनात म्हणालो की हे आई माझ्या मनात एक भीती निर्माण झाली आहे. माझा मित्रामुळे आई तुझ्या सगळ्या भक्तांची काळजी घ्यायला तू स्वतः इकडे ये इथे कुणाचाही केसाला धक्का लागता कामा नाही आणि खरा चमत्कार तिथे घडला.

या यात्रेत खूप गर्दी होती आणि अचानक त्या गर्दीत देवी आली. माझ्या हाकेला धावून. देवीचे तीन लोक ते अचानक त्या गर्दीत आले आणि बरोबर माझ्या जवळ येऊन उभे राहिले. माझ्या खांद्यावर हात ठेवले आणि तिघे ही हसले तिघेपण त्या पाळण्याच्या तिन्ही बाजूला जाऊन उभे राहिले. तोपर्यंत पाळना सुरू होता. तोपर्यंत तिघे तिथेच उभे होते आणि माझ्याकडेच बघत होते. मी त्यांना नमस्कार केला कारण मी त्यांना ओळखलं होतं की ते कोण आहे? साक्षात चौंडेश्वरी देवी माझ्या मनातील भीती काढण्यासाठी आणि ती वाईट वेळ घालवण्यासाठी. तिथे आली होती. थोड्यावेळाने पाळना थांबला आणि मी त्यांना शोधू लागलो. कारण ते तिघे ही तिथे नव्हते. तिघे ही गायब झाले होते.

त्यावेळी माझ्या मनाला खूप आनंद झाला. खर देवी स्वता, येऊन थांबली होती तिथे फक्त आणि फक्त माझ्या एका हाकेसाठी. तर भक्तानो हा आहे आष्टा गावची देवी चौण्डेश्वरी देवी बद्दल चा मला आले ला अनुभव. श्री स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *