नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!
जीवनात यश मिळवण्यासाठी मनुष्याला कठोर परिश्रम घ्यावे लागतात.
ध्येय प्राप्ती मेहनत आणि शीस्तेशिवाय शक्य नाही- भागवत गीता
मेहनतीने व्यक्ती किंवा मनुष्याच्या आत्मविश्वासात वृद्धी होत असते.

आचार्य चाणक्य यांनी अनेक गोष्टींविषयी उपदेश दिले आहेत. चाणक्यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये अनेक अशी नियम, शास्त्र सांगून ठेवली आहेत ज्यातून आपल्याला नेहमी फायदा होतो आणि आपलं जीवन सुखकर होते. चाणक्यांनी जीवनातील यश कशाप्रकारे मिळत याविषयीही आपल्या चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे, आज आपण त्याचविषयी जाणून घेणार आहोत. जीवनात यश मिळवण्यासाठी व्यक्तीला किंवा मनुष्याला कठोर परिश्रम घ्यावे लागतात. जे व्यक्ती किंवा जे मनुष्य मेहनत न घेता यश मिळवत असतो, ते यश काही वेळेपर्यतच राहत असते. पूर्ण आयुष्य तो ते यश उपभोगू शकत नाही. यामुळे जर तुम्हाला आयुष्यभर यश हवे असेल तर मेहनत आणि शीस्त अंगीकारणं आवश्यक आहे.

गीता उपदेशात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, ध्येय प्राप्ती मेहनत आणि शीस्तेशिवाय शक्य नाही. जाणकारांच्या मते मेहनतीने व्यक्ती किंवा मनुष्याच्या आत्मविश्वासात वृद्धी होत असते. यश आणि ध्येय मिळवण्यात आत्मविश्वासाचा मोठा वाटा असतो.

शिक्षण
जाणकारांच्या मते, शिक्षण घेत असताना काही गोष्टी डोक्यात ठेवणं आवश्यक असते. या गोष्टी लक्षात असल्यानंतर शिक्षण घेण्यामध्ये ज्या अडचणी येतात, त्यापासून दूर राहण्यास मदत होते. आचार्य चाणक्यांनुसार, वाईट संगत आणि वाईट सवयींमुळे शिक्षण घेता येत नाही.
करिअर- मेहनतीमध्ये यशाचे रहस्य लपलेले असते. मेहनतीशिवाय करिअरमध्ये यश मिळत नाही. मेहनतीसह शिस्तेचे पालन केले पाहिजे. शिस्तेमुळे काम वेळेवर पूर्ण करण्यास प्रेरित करत असते. वेळ व्यवस्थापनात यश मध्ये विशेष भूमिका असते. याची नोंद घ्यावी.

काळाची उपयुक्तता
आयुष्यातील वेळेचे मूल्य एखाद्याने ओळखले पाहिजे. ज्यांना वेळेचे मूल्य माहित नाही त्यांना नंतर त्रास सहन करावा लागतो. जी वेळ निघून जाते ती पुन्हा कधीच येत नाही. म्हणून काळाची उपयुक्तता समजून घ्यायला हवी. जर तुम्हाला यश हवे असेल तर तुम्ही प्रत्येक काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *